'टीव्ही मालिकांना "डेली सोप्स" म्हणण्यामागचं 'हे' कारण वाचून आश्चर्य वाटेल!

टीव्ही मालिकांना “डेली सोप्स” म्हणण्यामागचं ‘हे’ कारण वाचून आश्चर्य वाटेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रोज दिसणाऱ्या टीव्ही सिरियल्सना “डेली सोप” का म्हणतात बरं?

म्हणजे – रोज दिसतात म्हणून “डेली” – हे ठीकाय. पण हे “सोप” कुठून आलं?

Maza-Hoshil-Na InMarathi

 

खरंतर हा प्रश्न स्वाभाविक आहे – पण हा शब्दप्रयोग इतका अंगवळणी पडलाय की प्रश्न ऐकल्यावर विचित्र वाटावं! म्हणजे एखादी शंका म्हणून हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला तर चार चौघात तुमचं हसू केलं जाईल. असो.

पण हा प्रश्न आपल्याला वाटतो तितका विचित्र अजिबात नाही.

कारण टीव्ही मालिकांना डेली सोप्स हे नाव का पडलं, यामागे एक रंजक कारण आहे, जे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.

अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटत असेल की, केवळ भारतातच यांना डेली सोप्स म्हटलं जातं. पण असं नाहीये.

संपूर्ण जगभरात दरोरोज प्रक्षेपित होणाऱ्या मालिकांना डेली सोप्स असंच म्हणतात.

 

daily-sops-marathipizza01

स्रोत

या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा आपल्याला थेट १९२० सालामध्ये घेऊन जातो. याच काळात अमेरिकेमधील रेडियो स्टेशन्समध्ये जाहिरातींच्या माध्यमातून स्वत:ची पत वाढवण्याची जोरदार स्पर्धा सुरु होती.

परंतु त्याकाळी कोणत्याही कंपनीकडून जाहिराती मिळवणे तसे सोपे नव्हते. त्यामुळे जाहिरातींसाठी सर्वच रेडियो स्टेशन्समध्ये चढाओढ असायची.

त्या काळी MNC ब्रँडस नसल्याने साहजिकच या रेडियो स्टेशन्सचा ओढा घरगुती वस्तू विकणाऱ्या कंपन्यांकडे असायचा.

 

daily-sops-marathipizza02

स्रोत

रेडियो स्टेशन्सचे मॅनेजर देखील अगदी हातापाया पडायचे. तेव्हा कुठे या कंपन्या रेडियो स्टेशन्सवरचे शो स्पॉन्सर करायला तयार व्हायच्या. परंतु हे तेव्हाच व्हायचं जेव्हा श्रोत्यांना देखील त्या कंपनीमध्ये आणि त्यांच्या प्रोडक्टमध्ये रस असायचा.

म्हणजे रेडियो स्टेशनला स्पॉन्सरशिप देण्यापूर्वी कंपन्या पडताळून पहायच्या की त्या श्रोत्यांना घरगुती वस्तू खरेदी करण्यामध्ये किती रस आहे. म्हणजेच त्या काळी या कंपन्यांचे मुख्य टार्गेट असायच्या गृहिणी!

दरम्यानच्या काळात Procter & Gamble (P&G) या कंपनीला अशी संधी चालून आली की, ते सोप डीटर्जंट मार्केटमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी Lever Brothers यांना मागे टाकू शकतात.

त्याच दृष्टीने १९३३ साली P&G कंपनीने Ma Perkins नावाच्या रेडियो शो ला स्पॉन्सर करत स्वत:च्या Oxydol नावाच्या  सोपची (साबणाची) जाहिरात केली.

 

daily-sops-marathipizza04

स्रोत

Ma Perkins हा शो एका लाकूड व्यवसाय करणाऱ्या महिलेवर आधारित होता. या शो च्या दरम्यान Oxydol च्या जाहिराती चालवल्या जायच्या. पहिल्यांदा अगदी काहीच शहरांमध्ये हा प्रयोग करून पहिल्यानंतर P&G कंपनीच्या लक्षात आलं की लोकांचा प्रतिसाद वाढला आहे.

Ma Perkins हा शो नियमित ऐकणाऱ्या श्रोत्यांना Oxydol च्या जाहिरातीने भुरळ घातली आणि त्याचा परिणाम Oxydol च्या विक्रीवर दिसू लागला. हे अभूतपूर्व यश बघून P&G कंपनीने हाच फॉर्म्युला आपल्या इतर सोप प्रोडक्ट्ससाठी देखील वापरायचे ठरवले.

 

daily-sops-marathipizza03

स्रोत

सोबतच इतर कंपन्यांनी देखील आपली विक्री वाढवण्यासाठी याच मार्गाचा वापर केला आणि त्या काळी प्रत्येक शो च्यामध्ये सोप्सच्या जाहिराती ऐकू येऊ लागल्या. म्हणूनच त्याकाळच्या मिडीयाने या शोजना डेली सोप्स हे नाव दिलं.

पुढे हळूहळू रेडियोचा जमाना गेला, टीव्हीचा जमाना सुरु झाला. सर्व सोप्सच्या कंपन्या आपल्या जाहिराती टीव्ही वरून दाखवू लागल्या. तेव्हापासून टीव्ही शोज आणि सिरियल्सना जे डेली सोप्स नाव पडले ते आजतागायत कायम आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?