' सावधान : रोज ‘काढा’ घेताय? आधी हे वाचा, नाहीतर… – InMarathi

सावधान : रोज ‘काढा’ घेताय? आधी हे वाचा, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात एक महामारी आली आणि आपल्या विस्मरणात गेलेल्या सगळ्याच चांगल्या सवयींची जसे, बाहेरून आल्यावर हात पाय धुणे, गोष्टी स्वच्छ करून वापरणे या सगळ्यांची पुन्हा आठवण करून दिली आहे.

याच बरोबर एक गोष्ट ही पण शिकवली, की जीवनात कितीही धावपळ असली तरी थोडा निवांत वेळ काढावा व आपल्या माणसांची, आपल्या शरीराची काळजी घ्यावी. त्यासाठी माणसांसोबत वेळ घालवणे, पौष्टिक अन्नाचे सेवन कारणे व व्यायाम करणे हे धडे या महामारीने आपल्याला दिले.

हल्ली आपल्याला सगळ्याच गोष्टींचे परिणाम सुद्धा पटकन हवे असतात. त्यामुळे आपण फास्ट फूड व फास्ट मेडीकेशन यांच्याकडे भरपूर वळलो.

 

tablets medicine inmarathi 1

 

या दोन गोष्टींवरच अवलंबून राहिल्याने पारंपरिक आयुर्वेदिक अभ्यासाशी आपला संबंध येणे बंद झाले. आता आपण आपली रोगप्रतीकारशक्ती बळकट बनवण्यासाठी पुन्हा त्याच आयुर्वेदाकडे वळलो आहोत, पण आपल्याला असलेले अर्धवट ज्ञान घेऊन.

कोरोनापासून वाचण्यासाठी काढे, चूर्ण, वेगवेगळे औषध युक्त चहा या सगळ्यांचा आपण शरीरावर माराच सुरू केला आहे. कुठलीही गोष्ट मर्यादा राखून केली तरच ती फायद्याची असते. ती अती झाली की तिचा विपरीत परिणाम होणे सुरू होते, तसेच काढ्याचेही आहे.

काढा पिणे काही लोकांना आवडत असले तरीही अतिरेक वाईटच! त्यामुळे काढा घेत असाल, तर काय काळजी घ्यायला हवी व अती प्रमाणात काढे घेतल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात आपण आज ते पाहणार आहोत.

१) काढ्याचा गुणधर्म –

 

Ayurveda kadha InMarathi

 

काढ्यात ज्या प्रकारची औषधे टाकाल, त्याप्रकरचा त्याचा गुणधर्म असतो. म्हणजे थंड प्रवृत्तीची औषधे व वनस्पती जसे आवळा, दुर्वा, वेलची इत्यादी घालून केलेला काढा उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांवर उपयोगी पडतो.

काळी मिरी, सुंठ, दालचिनी ह्या प्रकारचे मसाले असलेला काढा शरीरातील उष्णता वाढवतो व रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. उष्ण, शित, वातुळ हे काढ्याचे गुणधर्म. त्यामुळे आपण काढ्यात काय घालतोय हे त्या काढ्याचा गुणधर्म ठरवते.

२) उष्ण काढे –

सध्या आपण उष्ण काढे घेतो आहोत. जे मिरे, सुंठ, दालचिनी, लवंग आणि तमालपत्राचा वापर करून बनवलेले असतात.

ह्या सगळ्या मसाल्यांना पाण्यात उकळवून ते पाणी अर्धे होई पर्यंत आटवून जो काढा तयार होतो, तो उष्ण असतो. याच्या अती सेवनामुळे खालील त्रास होतात –

१) अॅसिडिटी –

 

acidity inmarathi

 

गरजेपेक्षा व आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त काढे घेतल्याने शरीरातील उष्णता वाढते. विशेषतः पित्त प्रवृत्तीच्या लोकांना छातीत, पोटात जळजळ होणे, पित्त वाढणे असे त्रास होऊ शकतात.

२) तोंडाला छाले येणे –

अती उष्णता वाढल्यामुळे तोंडाला छाले येतात. हे छाले कधी कधी इतके विदारक असतात की जिभेपासून, गाल, हिरड्या, घसा कुठेही येऊ शकतात.

३) नाकातून रक्तस्त्राव होणे –

शरीरातील उष्णता वाढली, की बऱ्याच जणांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो.

४) पाळीच्या वेळी अधिक रजस्त्राव होणे –

 

period inmarathi

 

 

 

काढ्याचा अधिक मारा केल्यामुळे उष्णता वाढते, ज्यामुळे पाळीच्या वेळी दर वेळेस पेक्षा अधिक रजस्त्राव होतो. नॉर्मल पाळी ४-५ दिवसांपर्यंत असते, पण उष्णतेमुळे तिचा कालावधी वाढून ७-८ किंवा जास्त दिवसांपर्यंत वाढू शकतो.

५) अपचन होणे –

अत्याधिक काढे घेऊन अॅसिडिटी होते, ज्यामुळे पचनशक्ती बिघडते व अपचनाचा त्रास होतो.

६) लघवीचा त्रास/ उन्हाळी लागणे –

काही लोकांना उष्णतेमुळे उन्हाळी लागण्याच्या समस्या होतात. ज्यामुळे लघवीच्या वेळी वेदना होतात.

७) त्वचा कोरडी होणे- 

 

dry skin inmarathi

 

उष्णता वाढली, की आपल्या शरीराला त्याचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात आणि अधिक घामाच्या स्वरूपात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे कार्य सुरू असते.

यामुळे शरीरातील पाणी कमी होते व त्वचा कोरडी पडते, फाटते आणि भेगा पडतात.

८) चेहऱ्यावर किंवा संपूर्ण शरीरावर पुरळ किंवा फोड येणे –

अधिक उष्णतेमुळे शरीरावर जसे बगलेत, डोक्यात, गुडघ्याच्या खालच्या बाजूस, चेहऱ्यावर मोठाले फोड किंवा पुटकुळ्या, पुरळ येणे सुरू होते.

 

काढे घेण्याची योग्य पद्धत –

 

ginger tea inmarathi

 

व्यक्तीच्या वयोमानानुसार काढ्यात घातल्या जाणाऱ्या सामग्रीचं प्रमाण बदलतं. त्यामुळे काढा करताना, तो घेणाऱ्या व्यक्तीच्या वयाचा विचार करायला हवा.

काढा कधीही ५० ml पेक्षा अधिक प्रमाणात घेऊ नये. यासाठी आधीच १०० ml पाणी घेऊन ते ५० ml पर्यंत आटवून घ्यावे.

काढ्यामुळे शरीरातील उष्णता २००% नी वाढते त्यामुळे काढा कधीही सकाळी उपाशी पोटी घेऊ नये.

त्यामुळे जरी काढा आवडत असला, कोरोना काळात अत्यंत महत्त्वाचा वाटत असला तरीही ह्या नियमांचे पालन नक्की करा. काढ्याचा अतिरेक करून इतर आजार मागे लागतील. त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित रहा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?