'सरकारी अधिकाऱ्याने केला 'टाकाऊपासून टिकाऊचा' असा अनोखा आणि उपयुक्त प्रयोग!

सरकारी अधिकाऱ्याने केला ‘टाकाऊपासून टिकाऊचा’ असा अनोखा आणि उपयुक्त प्रयोग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागे रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्याचा उपयोग शाळेसाठी इमारत नसलेल्या भागात शाळा शिकवण्यासाठी केला गेला तेव्हा रेल्वे डब्यात शाळा भरवणारे ते शिक्षक बरेच चर्चेत होते.

शाळेत असताना टाकाऊपासून टिकाऊसारखे अनेक प्रयोग आपण केलेले असतात. खऱ्या आयुष्यात त्यातले आपण किती प्रत्यक्षात उतरवतो ते स्वतः विचार करून बघा.

रेल्वे, बसचे आउटडेट झालेले डब्बे, पत्रे तसेच पडून पडून सडून जातात आणि नंतर त्याला स्क्रॅप केलं जातं. आतापर्यंत आपल्याला हे माहीतच आहे.

असचं आऊटडेट झालेला प्रकार म्हणजे ट्राम! ट्राम म्हटलं की आठवतं रस्त्यावरून चालणारी छोटेखानी ट्रेन आणि त्यातल्या त्यात कोलकात्याच्या प्रसिद्ध ट्राम.

 

culcutta tram inmarathi

 

पण हल्ली वाढलेली लोकसंख्या आणि त्यामानाने उरलेले रस्ते आणि रस्त्यावरची गर्दी बघता ट्रामचं रस्त्यावर दिसणं कमी कमी होत गेलं. परिणामी ट्रामचे डब्बे पण एका कोपऱ्यात पडून ‘स्क्रॅप’ व्हायची वाट बघत आहेत.

तुकाराम मुंढे हे नाव आज कोणाला माहीत नसणार असे होणार नाही.

तर ते जेव्हा पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) प्रमुख झाले तेव्हा मंडळाच्या बसेसचे खराब होण्याचे प्रमाण, बसचे रस्त्यावर धावण्याचे कमी झालेले तास, रुटीन रोड वर कमी झालेल्या प्रवाशांची संख्या यावर सडेतोड उपाययोजना करत महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची वाढ करून आणली होती.

एकंदरीत प्रशासक कसा असावा याचे बेस्ट उदाहरण हे सांगता येईल, त्याच्या सोबत अजून एक नाव जोडा, राजनवीर सिंग कपूर.भा.प्र.से.

पश्चिम बंगाल परिवहन मंडळाचे (डब्लूबीटीसी) चेअरमन. वर सांगितलं त्याप्रमाणे ट्रामचं अस्तित्व आज कलकत्ताच्या रस्त्यावर देखील कमी झालेलं, आणि पडून राहिल्येल्या ट्रामच्या डब्याना सडण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यांना जीवदान द्यायचं काम केलं ते कपूर यांनी. कपूर यांनी या ट्रामच्या डब्याना चालत्या फिरत्या लायब्ररी मध्येचं बदलून टाकलं.

 

tram library inmarathi

 

ट्राममध्ये झालेल्या या बदलामुळे कलकत्तावासीयांना वाचनासाठी एक नवीन स्थान मिळालं आहे जे ऐतिहासिक वारसा आणि साहित्य यांचे एकत्रीकरण आहे.

इतिहास पाहिला तर ब्रिटिशांनी त्यांच्या पद्धतीच्या शिक्षण संस्था या बंगाल मध्ये स्थापन केल्या. आजही त्या संस्था मानाने तिथे उभे आहेत.

तर याच शिक्षण संस्थाच्या परिसरात ही लायब्ररी ट्राम फिरणार आहे. श्यामबाजार-एस्प्लानेड या रूट वर ही ट्राम आता धावणार आहे.

राजनवीर सिंग कपूर ट्राम बद्दल बोलताना सांगतात, कलकत्त्याचा वाचन इतिहासात अजून एक पान जोडलं जाणार आहे.

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच ऐतिहासिक ट्रामची सफर आणि वाचनाची आवड जोपासण्यासाठी या ट्राम मध्ये हे बदल केले गेल्याचे डब्लूबीटीसीचे अधिकारी सांगतात.

वाचनालयात विविध शैक्षणिक संस्थांमधील वाचकांना आकर्षित करण्यासाठी पुस्तके, मासिके आणि विविध स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या विशेष आवृत्त्या या ट्राम लायब्ररी मध्ये आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की इथली पुस्तके ही नियमितपणे अद्ययावत केली जातील. प्रवाश्यांना विनामूल्य वाय-फाय देखील उपलब्ध आहे.

 

library inmarathi

 

प्रसिद्ध लेखकांचे ‘बुक लॉन्च इव्हेंट’ आणि ‘बुक रिडींग सेशन’ सारखे कार्यक्रम ऑर्गनाईझ करण्याची योजना देखील मंडळाने आखली आहे.

ज्या दिवशी या ट्रामचे उद्घाटन झाले त्या आठवड्यात सर्व प्रवाशांना मोफत पेनचे वितरण केले गेले होते. ट्रामच्या या लायब्ररीचा वापर जास्तीत जास्त व्हावा म्हणून नोव्हेंबरमध्ये ट्राम लिटरेचर फेस्टिव्हलचे नियोजन करण्यात आले आहे.

श्यामबाजार-एस्प्लानेड मार्गावर सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या नंतर या ट्राम लायब्ररीचे उद्घाटन झाले होते. मे महिन्यात अ‍ॅम्फॅन चक्री वादळामध्ये नुकसान झालेल्या ट्राम मार्गांपैकी हा पाचवा मार्ग आहे.

मंडळाचे अधिकृत वक्तव्य आहे की कोरोनाच्या या साथीच्या दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ट्राम स्वच्छ करण्यासाठी सर्व निकष पाळले जात आहेत.

प्रत्येक फेरीच्या आधी आणि नंतर ट्रामच्या डब्यांची नियमित निर्जंतुकीकरण केली जात आहे.

कलकत्ता ट्राम हे आशियातील सर्वात जुने इलेक्ट्रिक ट्राम आहे. शिवाय हे सध्या ट्राम नेटवर्क असलेले एकमेव भारतीय शहर आहे.

शासकीय इमारती,जनरल पोस्ट ऑफिस,सेंट अँड्र्यू चर्च, ब्लॅक पॅगोडा, रवींद्र भारती परिसर, जैन मंदिर, प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता युनिव्हर्सिटी, आशुतोष संग्रहालय आणि कॉफी हाऊस अशा अनेक ऐतिहासिक आणि विशेष इमारतींना भेट देत देत ही ट्राम फिरणार आहे.

 

reading in tram inmarathi

 

महामंडळाने नुकतेच ट्राममध्ये काही चित्रं रंगवली आहेत. ज्यामध्ये ह्या ट्राम चा इतिहास सांगितला गेला आहे. १८७३ मध्ये ट्राम कशी सुरू झाली. नंतर तिचे विद्युतीकरण आणि पुढचा विकास इत्यादी.

तर एकूणच राजवीर सिंग कपूर यांच्या पुढाकाराने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे यात काही शंका नाही. आपल्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेली कलकत्ता ट्राम आता लायब्ररीसाठी जगप्रसिद्ध होईल हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?