' या तरुणीनं एकविसाव्या वर्षी असा केला पराक्रम की गिनीज बुकात झाली नोंद! – InMarathi

या तरुणीनं एकविसाव्या वर्षी असा केला पराक्रम की गिनीज बुकात झाली नोंद!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पर्यटन ही आपल्या सर्वांची आवडती गोष्ट आहे. वातावरण थोडं जरी आल्हाददायक झालं की, आपल्याकडे नेहमीच ट्रॅव्हल प्लॅन्स होत असतात.

ज्यांना शक्य असतं ते जवळपास चे ठिकाणांना भेट देतात तर काही लोक इतर देशात सुद्धा वर्षातून एकदा फिरून येत असतात. मागच्या काही वर्षात Travelers ही एक कम्युनिटी तयार झाली आहे.

हे लोक नियमितपणे ट्रॅव्हलिंग करत असतात आणि फोटो, ब्लॉग्स च्या माध्यमातून अपडेट्स देत असतात.

ट्रॅव्हलिंग ची आवड असणाऱ्या पण कोणत्यातरी कारणामुळे फिरणं शक्य नसणाऱ्या लोकांना ही एक पर्वणी असते. काही जण या ‘ट्रॅव्हलिंग’ च्या प्रवासात इतके पुढे जातात की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागते.

लेक्सि अल्फोर्ड या अमेरिकेच्या २१ वर्षीय तरुणीची या यादीत नुकतीच अव्वल स्थानावर नोंद झाली आहे. लेक्सि अल्फोर्ड ला जगातील १९६ देशांना भेट दिल्याने तिला हा बहुमान मिळाला आहे.

 

lexi alford inmarathi

 

इतके देश आहेत हे सुद्धा आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट असेल. कारण, जगातील प्रमुख देशांचे नाव विचारले तर आपल्याला दहा नावाच्या वर पटकन सांगता सुद्धा येणार नाही.

ते सुद्धा वयाच्या २१ व्या वर्षी जेव्हा आपण आपल्या शिक्षणाची दिशा शोधत असतो तेव्हा लेक्सि अल्फोर्ड त्या वयात ही दाही दिशा फिरून आली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. हे कसं शक्य झालं असेल 

लेक्सि अल्फोर्ड चे वडील हे कॅलिफोर्निया मध्ये एक ट्रॅव्हल एजन्सी चालवतात. लहानपणा पासूनच पर्यटन हे लेक्सि च्या आयुष्याचा भाग होतं.

इन्स्टाग्राम LexieLimitless या नावाने असलेल्या अकाउंट वरून लेक्सि ने एकदा लिहिलं आहे की,

“शाळेत विनंती करून माझे वडील काही दिवसांसाठी माझे वडील मला दुसऱ्या देशात फिरायला घेऊन जायचे आणि प्रत्येक वर्षी अभ्यास करण्यासाठी मोकळं सोडायचे.”

लहान असतानाच त्यांनी पूर्ण परिवारा सोबत कम्बोडिया ते बुर्ज खलिफा दुबई किंवा अर्जेंटिना ते इजिप्त चे पिरॅमिड अल्फोर्ड फॅमिली ने जगाचा एकही कोपरा सोडला नाहीये.

पर्यटन म्हणजे इतर लोकांच्या आनंदात सहभागी होणे आणि स्वतः आनंदी रहाणे ही व्याख्या या लोकांच्या मनात पक्की आहे.

रेकॉर्ड मोडण्यासाठी कधीच प्रवास केला नाही आणि प्रवासाची आवड म्हणून प्रवास केला हे लेक्सि अल्फोर्ड ने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

 

lexi alford 2 inmarathi

 

जग हे फार सुंदर आहे आणि ज्याप्रकारे मीडिया दाखवतं तसं जग क्रूर नाहिये हे सुद्धा लेक्सि अल्फोर्ड ला जगाला सिद्ध करायचं होतं.

२०१६ मध्ये लेक्सि अल्फोर्ड ही १८ वर्षांची झाली आणि तोपर्यंत तिने ७२ देशांना भेट दिली होती. ऑक्टोबर २०१६ म्हणजे आजपासून चार वर्षांपूर्वी लेक्सि ने ठरवलं की हा रेकॉर्ड आपल्या नावावर करायचा.

तेव्हापासून तिने शाळा, कॉलेज सगळं सोडून फक्त रेकॉर्ड साठी आपला वेळ दिला. कमालीची गोष्ट म्हणजे हे सगळे टूर्स लेक्सि ने स्वतःच्या पैश्याने केले आहेत. कसे? ती तर काही काम करत नव्हती.

१२ व्या वर्षीपासूनच लेक्सि अल्फोर्ड ने छोटे मोठे काम करत पैसे वाचवायला सुरुवात केली होती. काही ब्रँडस् आणि कॅम्पेन सोबत तिने करार करून त्याद्वारे सुद्धा तिने कमाई केली.

बचत केलेल्या पैशातून तिने तिच्या पहिल्या वर्षातील सर्व प्रवासाचा खर्च केला होता आणि त्यानंतर स्वतःच्या वडिलांच्या कंपनी मध्येच तिने ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून तिने काम करायला सुरुवात केली होती.

प्रवास करताना सतत फोटोग्राफी आणि ब्लॉगिंग करणे हे लेक्सि अल्फोर्ड चा छंद आहे.

 

lexi inmarathi

 

प्रत्येक वेळी बेस्ट डिल मिळवणे, पॉईंट्स कमावणे आणि स्वस्त ठिकाणी रहायचं हे लेक्सि अल्फोर्ड ने चांगल्या प्रकारे फॉलो केलं आहे.

“जेव्हा प्रवास करत नाही तेव्हा मी आई वडिलांसोबतच वेळ घालवत असते आणि कोणताही वायफळ खर्च करत नाही, न मी कोणतं लोन घेतलं आहे.” हे लेक्सि अल्फोर्ड आवर्जून सांगते.

कोणत्याही नवीन देशात गेल्यावर लेक्सि कधीच तिथलं सिम कार्ड घेत नाही. त्याऐवजी ती तिथल्या लोकांशी बोलून आवश्यक ती माहिती घेत असते.

ज्या देशांबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आणि दहशत आहे त्या देशांमध्ये सुद्धा लेक्सि अल्फोर्ड चं स्वागत झाल्याचं ती नमूद करते. कोणतीही अपेक्षा न करता नवीन ठिकाणी हे एक लेक्सि अल्फोर्ड ची कामाची पद्धत आहे.

जगातील इतक्या देशांपैकी केवळ पश्चिम आणि मध्य आफ्रिका या देशात फक्त व्हिसा मिळवण्यात त्रास झाला होता.

या देशांमध्ये फिरताना झालेला अजून एक त्रास म्हणजे हे देश छोटे आहेत, तिथे भाषेच्या अडचणी सुद्धा बऱ्याच आहेत आणि प्रवासाचा खर्च सुद्धा खूप जास्त आहे असं लेक्सि ने सांगितलं आहे.

१९६ देशांच्या यादीतील सर्वात शेवटचा देश असलेल्या नॉर्थ कोरिया ला भेट देणं हे एक आव्हान होतं. अमेरीकेने प्रवासावर आणलेल्या निर्बंधांमुळे नॉर्थ कोरिया चा प्रवास करणं लेक्सि अल्फोर्ड ला अवघड जात होतं.

तेव्हा एका कॉन्फरन्स च्या निमित्ताने व्हिसा मिळवून त्या देशात जाण्याचा प्लॅन लेक्सि अल्फोर्ड ने यशस्वी करून दाखवला ज्याचं कौतुक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा केलं होतं.

 

lexi 3 inmarathi

 

प्रत्येक देशातील अनुभवांबद्दल सध्या लेक्सि अल्फोर्ड ही एक पुस्तक लिहीत आहे. प्रत्येक देशातून काहीतरी एक शिकवण मिळाल्याचं लेक्सि अल्फोर्ड ने सांगितलं आहे.

सध्या लेक्सि अल्फोर्ड ही एक TEDx ची स्पीकर सुद्धा आहे.

आपल्या शिकवणीपैकी या काही गोष्टी लेक्सि अल्फोर्ड ने सांगितल्या आहेत :

१. तुमचे पैसे व्यर्थ खर्च करू नका.

२. जगात वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टी अधिक आहेत.

३. कोणत्याही देशात आपण जाऊ शकतो आणि तिथून काहीतरी शिकू शकतो.

४. तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता, गरज आहे ती ठरवण्याची.

५. वायफाय मधून डिस्कनेक्ट झालात तरच सुंदर जगाशी कनेक्ट होऊ शकतात.

लेक्सि अल्फोर्ड च्या प्रवासाने आणि दिलेल्या टिप्स मधून खूप काही शिकण्यासारखं आहे. कोरोना निघून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा एक यादी तयार करा आणि “बॅग भरो और निकल पडो..”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?