' या ७ टीप्स वापरल्यात तर गॅसवर ठेवलेलं दूध कधीही ऊतू जाणार नाही – InMarathi

या ७ टीप्स वापरल्यात तर गॅसवर ठेवलेलं दूध कधीही ऊतू जाणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कधीकधी आई आपल्याला दुधाच्या भांड्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगते आणि थोडे लक्ष चुकले म्हणजे संपूर्ण दूध ओट्यावर सांडते. यामुळे सकाळचा चहा तर नशिबात येतच नाही, पण आईचा ओरडादेखील खावा लागतो.

ही चूक तुमच्या बहिणीकडून, भावाकडून आणि कदाचित बाबांकडून पण झाली असेल आणि प्रसंगी त्यांनासुद्धा आईने फटकारले असेल. विनोदाचा भाग म्हणजे कामाच्या घाईगडबडीत बर्‍याचदा ही चूक तुमच्या आईकडूनपण होते.

 

milk inmarathi

 

थोडक्यात काय तर दूध उतू जाणे ही खरच खूप मोठी समस्या आहे, म्हणूनच या समस्येने ग्रासलेल्या सर्वांसाठीच आम्ही सोपे आणि साधे, तुम्हाला जमतील असे उपाय शोधून आणले आहेत.

दूध उतू गेल्यानंतर बऱ्याचदा ते भांड्याला चिकटते, त्यामुळे भांडी घासताना कटकट होते, हे टाळण्यासाठी सुद्धा आम्ही काही उपाय देत आहोत.

उपाय १

भारतीय संस्कृतीत विशिष्ट खाद्यपदार्थ बनवण्यासाठी काही विशिष्ट भांड्यांचा वापर केला जातो, त्या खाद्यपदार्थांना उत्तम चव मिळावी हा त्यामागचा हेतू.

भारतीय संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या या विशिष्ट भांड्याच्या टेक्निकचा वापर आपल्याला दूध उतू जाणाच्या बाबतीतही करता येतो. दूध गरम करताना तुम्ही नेहमी स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरले पाहिजे.

नेहमी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दूध गरम करावे. दूध गरम करताना गॅस हाय फ्लेम् वर ठेवू नये. हाय फ्लेममुळे दूध भांड्याला चिकटते आणि त्यामुळे काळे डाग तयार होतात जे घासण्यासाठी कठीण जातात.

उपाय २

 

milk boiling inmarathi1

 

दो बूँद जिंदगी के आपण नेहमीच ऐकले आहे, पण इथे उपाय नंबर २ मध्ये आम्ही तुम्हाला दोन चमचे पाण्याचे सुचवत आहोत.

पाणी आपल्या दैनंदिन कामांमध्ये किती महत्त्वाचे आहे हे मला काही सांगायची गरज नाही. याच पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दूध ओतण्याआधी त्यामध्ये एक ते दोन चमचे थंड पाणी टाकावे.

एक ते दोन चमचे थंड पाणी काय करू शकतं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर हे लक्षात घ्या की पाण्यामुळे दूध थेट भांड्याच्या संपर्कात येत नाही, त्यामुळे भांड जळण्याची शक्यता वाचते.

उपाय ३

आत्ताच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय अगदी तुमच्याच हातात आहे, ते म्हणजे गॅस फ्लेमचे स्विच. दूध गरम करताना गॅस फ्लेम नेहमी कमी ठेवा.

बासुंदीसारखे पदार्थ करायचे असतील तर, चमच्याने दूध ढवळत राहावे त्यामुळे दूध वर येत नाही.

उपाय ४

 

 

सॅन्डविच बनवताना आपण ब्रेडच्या स्लाईस वर एक्स्ट्रा बटर लावतो किंवा पावभाजी खाताना, न्याहारी करताना आपण दुकानदाराला म्हणतो “भैया जरा मखन मार के देना!”

बरोबर हीच मक्खन म्हणजेच बटर लावण्याची टेक्निक आपल्याला दूध सांडण्याच्या समस्येवर करता येऊ शकते. ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करत असाल, त्या भांड्याच्या कडेला किंचित बटर (लोणी) लावावे. हे केल्यामुळे दूध भांड्याला चिकटणार नाही आणि ते उतू जाणार नाही.

उपाय ५

पुन्हा आपल्याला मदतीसाठी पाण्याची मदत घ्यायची आहे. आपल्याला करायचे असे आहे, की जेव्हा दूध गरम होऊन त्यावर बुडबुडे येऊ लागतील तेव्हा त्यावर थोडे पाणी शिंपडा म्हणजे दूध बाहेर सांडणार नाही.

 

उपाय ६

 

milk boiling inmarathi

 

आपण सगळे शाळेत शिकलो आहोत, की धातु ऊर्जेचे उत्तम प्रवाहक आहेत आणि लाकूड हा ऊर्जेचा वाईट प्रवाहक आहे. त्यामुळे दूध सांडताना आपल्याला मदत होऊ शकते एका लाकडी चमच्याची.

हल्ली बाजारात सहजपणे लाकडी चमचे मिळतात. दूध गरम होत असताना हा चमचा दुधाच्या भांड्यावर ठेवावा म्हणजे दूध सांडणार नाही.

उपाय ७

उपाय नंबर ७ आहे एकसे भले दो. एकापेक्षा दोन गोष्टींचा वापर करणे हे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. थोडक्यात तुम्हाला करायचे असे आहे, की दूध गरम करण्यासाठी एका ऐवजी दोन भांड्यांचा वापर करायचा आहे. कसे ते वाचा.

दूधाच्या भांड्यापेक्षा एक मोठे भांडे गॅसवर ठेवावे. त्यात थोडे पाणी टाकावे आणि मग त्यामध्ये दूधाचे भांडे ठेवून मग गॅस चालू करावा यामुळे देखील दूध बाहेर सांडणार नाही.

या टिप्स तुमची नक्की मदत करतील! करताय ना ट्राय?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?