' या टिप्स वापरल्या तर प्रत्येक गृहिणी आपल्या छंदांमधून अवाढव्य व्यवसाय उभा करू शकेल! – InMarathi

या टिप्स वापरल्या तर प्रत्येक गृहिणी आपल्या छंदांमधून अवाढव्य व्यवसाय उभा करू शकेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दररोजच्या ठरलेल्या वेळेत नोकरी करण्यापेक्षा आपल्या हॉबीनुसार काम करणे किंवा स्वतःचा एक बिझनेस सेटअप सुरू करावे असे भारतातल्या बऱ्याच महिलांना वाटते. त्यांचे ते स्वप्न असते.

जर बिझनेस तुमच्या हॉबीनुसार असेल तर रोजचे काम रटाळ आणि बोअरिंग न वाटता दररोज तुम्हाला काम करण्यात उत्साह वाटेल.

पण कोणताही बिजनेस करायचा असेल तर त्यात पैसे इन्वेस्ट करावे लागतात आणि त्यामुळे त्यात रिस्क फॅक्टर अधिक असतो. म्हणूनच, तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी बिझनेसचा विचार मनात येऊनही टाळला असेल.

पण जर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिले, तर तुमच्या मनासारखा बिझनेस तुम्ही उभारू शकता. आज अशाच काही गोष्टी या आर्टिकल मधून आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत.

 

women hobbies inmarathi

 

तुम्ही जर तुमच्या हॉबीशी संबंधित जॉब करत असाल जसे की चित्रकारी लेखन तर याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला हे करण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घ्यावे लागणार नाही.

उदाहरणार्थ तुम्हाला जर शिक्षक व्हायचे असेल तर त्याआधी तुमच्याकडे बीएडची डिग्री असणे गरजेचे आहे वा तुम्हाला सीए व्हायचं असेल तर त्यासाठी संबंधित अभ्यास करणे आवश्यक आहे.

पण जर तुमचा बिजनेस हॉबी बेस्ड असेल तर अशा कोणत्याही प्रशिक्षणाची तुम्हाला गरज भासणार नाही! तुमच्यातही अशीच काही होगी असू शकते ज्यावर तुम्ही बिझनेस करू शकता!

खाली आम्ही अशाच काही ओबीसी रिलेटेड बिझनेस सुचवत आहोत जे तुम्हाला इन्स्पायर करतील.

 

फोटोग्राफी :

 

mukta barve inmarathi

तुम्हालाही विविध गोष्टी, लहान-मोठे क्षण हसरे चेहरे, निसर्गरम्य ठिकाण फ्रेममध्ये मध्ये कॅप्चर करायला आवडतात तर तर मग या फोटोग्राफीच्या हॉबी ला बिझनेस बनवण्याचा विचार तुम्ही केला पाहिजे.

सर्वप्रथम तुम्ही तुमचे उत्तम उत्तम फोटो शोधा आणि आणि ते विकण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन साइट्स मिळतील.

जर तुम्हाला पोर्ट्रेट्स काढायला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या घराचे रूपांतर एका छोटेखानी स्टुडिओमध्ये सुद्धा करू शकता.

 

वाचन :

 

girl reading inmarathi

तुम्हाला वाचनाची आवड आहे? जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही या या आवडीमुळे पैसेही कमवू शकता.

हो बरोबर ऐकले तुम्ही काही पुस्तके वाचून त्यांचा बुक रिव्यू दिल्यामुळे तुम्हाला पब्लिशर्स आणि आणि काही ऑनलाईन साइट्स पैसे पुरवतात. त्यामुळे तुमची ही आवडसुद्धा तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकते.

 

गार्डनिंग :

 

gardening-tips-featured-inmarathi

 

तुम्हालाही अंगणात विविध फुलझाडे लावणे, दुर्मिळ वनस्पतींची लागवड करणे इंटरेस्टिंग वाटते. तर तुमची गार्डनिंगची आवड सुद्धा तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकते.

ज्या लोकांना आकर्षक गार्डन ची गरज असेल त्यांना मदत करून किंवा सल्ले देण्यातून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता.

थोडक्यात काय तुमच्याच आवडीचे काम करून तुम्हाला आनंद मिळेल आणि त्याचे पैसेही मिळतील.

 

आर्ट क्रिएटिव्ह :

 

women painting inmarathi

 

जर तुम्हाला पेंटिंग विविध आर्टिस्टिक पॉटस, शोभेच्या वस्तू बनवण्याची हौस असेल तर यातूनही रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

तुम्ही अशी प्रोडक्टस बनवून त्यांची विक्री करू शकता तुम्हाला फक्त एवढेच करावे लागेल की तुम्ही बनवलेल्या आर्टिस्टिक वस्तूंचे फोटो व्हाट्सअप फेसबुक यांवर पोस्ट करून त्याची जाहिरात करा.

जाहिरातीमध्ये तुम्ही या गोष्टी बनवू शकता अशा स्वरुपाची आकर्षक जाहिरात असली पाहिजे. तुम्हाला योग्य वाटेल ती किंमतसुद्धा लिहायला विसरू नका.

जाहिरात ही आकर्षक करणे गरजेचे आहे आहे कारण त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक तुमच्या प्रोडक्टकडे खेचले जातील. अन्यही अशा ऑनलाईन साईट्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह वस्तूंची विक्री करू शकता.

 

प्राणी :

 

pet caretaker inmarathi

 

आपल्यापैकी बऱ्याच जणींना प्राणी आवडतच असतील त्यांची काळजी करणे, त्यांच्याबरोबर खेळणे, त्यांना फिरवणे, वेळच्यावेळी खाऊ घालणे इ. या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद दडलेला असतो.

जर तुम्हाला प्राण्यांची आवड असेल तर याला तुम्ही व्यवसाय बनवू शकता. आपल्या आजूबाजूला बऱ्याच लोकांना प्राण्यांची आवड तर असते पण नोकरीधंद्यामुळे त्यांचा सांभाळ करण्यासाठी पुरेपूर वेळ नसतो.

त्यामुळे अशावेळी या लोकांना पेट केअरटेकर ची गरज लागते जर तुम्हाला प्राणी सांभाळण्याची आवड असेल आणि याचा अनुभवही असेल तर तुम्ही याचे व्यवसायात रूपांतर करू शकता.

पहिल्यांदाच प्राणी आणि पाळणाऱ्यांना प्राण्यांची काळजी घेतानाचे सल्ले पुरवून ही तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या कामाची जाहिरात करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता.

वरील दिलेल्या ऑप्शन्सपैकी किंवा त्या संबंधित एखादी आवड तुमचीही असू शकते आणि तिला तुम्ही बिजनेस बनवू शकता. पण त्याआधी जाणून घ्या आवश्यक टिप्स…

कोणताही बिझनेस सुरु करताना तुम्हाला सगळ्यात आधी काही गोष्टींची तपासणी केली पाहिजे. 

१) तुम्ही जी सुविधा किंवा प्रॉडक्ट देणार आहात त्यासाठी मार्केट आहे का?

२) तुम्ही पुरवत असलेल्या वस्तू किंवा सुविधाची योग्य वेळ निश्चित करणे.

३) किती वेळ काम करणे गरजेचे आहे याचा पडताळा

४) कच्चामाल कुठून येणार ? त्याचा दर आणि त्याचा दर्जा

५) वस्तू किंवा सुविधेची उत्तमोत्तम जाहिरात कशी करता येईल?

एकदा तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे तुम्हाला तुमचा बिजनेस सेटअप सुरळीत चालू करू शकता. पण कोणत्या समस्या तुमच्या बिझनेस साठी हानिकारक ठरू शकतात हेही ध्यानात घेतले पाहिजे.

 

business set up inmarathi

 

१) तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स प्रोफेशनल कामांपासून दूर ठेवणे तुम्हाला जमले पाहिजे.

२) योग्य आर्थिक योजना राबवल्या पाहिजेत.

३) ग्राहकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरायला हवे. त्यामुळे ग्राहकांना आपले प्रॉडक्ट कसे आवडेल यावर लक्ष दिले पाहिजे.

४) जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये असाल तर पार्टनरशिप संपल्यावरही ही तुमच्या स्वबळावर बिजनेस स्थापन करण्याची क्षमता असली पाहिजे.

भले तुम्ही वरील सर्व गोष्टी वाचल्या तरी तुमच्या डोक्यात कुठे तरी हा प्रश्न सतावत असेल की मी दिलेले प्रोडक्ट किंवा मी देत असलेली सुविधा ही मार्केटमध्ये विकली जाईल का?

कारण बिजनेस करताना हाती निराशा सुद्धा येऊ शकते . पण यावर आम्ही तुम्हाला एकच सुचवू की हॉबी रिलेटेड जॉब मध्ये रिस्क आहेच पण, तुम्ही तुमच्या बिजनेसला थोडा वेळ दिला पाहिजे कारण प्रॉफिट मिळवण्यासाठी वेळही लागतो.

टाईम इज द सोल्युशन फॉर एवरीथिंग हे इथेही तितकेच लागू होते. लक्ष्य निर्धारित करा आणि त्यानुसार काम करा. तुम्ही घेतलेल्या डिसिजन्स चा हाती काय परिणाम लागतोय यानुसार योजना तयार करा.

हताश न होता स्वतःला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ होईल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?