' ‘आज कोणता ड्रेस घालू?’ या कन्फयुजन मधून सुटका करण्यासाठी वापरा या ७ टीप्स! – InMarathi

‘आज कोणता ड्रेस घालू?’ या कन्फयुजन मधून सुटका करण्यासाठी वापरा या ७ टीप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही पार्टीत, पिकनिकला, मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर लंच किंवा डिनर, ऑफिस कुठेही जायचे असो स्त्रियांना तयार होण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्या वेळेत तर घरीच एखादी डिश बनवून तयार होईल.

अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते. आणि हो वेळ लागतो सुद्धा.

कधी मेकप मुळे, केसांमुळे तर कधी कपड्यांमुळे. कपाटात कपड्यांचा ढीग लागलेला असताना, बेडरूम मध्ये कपडे चहू बाजूला लोळत असतानासुद्धा “आज काय घालू? माझ्याकडे घालायला सुटेबल कपडेच नाहीत” हे तुम्ही भरपूर स्त्रियांच्या तोंडून ऐकले असेल.

 

women choosing clothes inmarathi

 

आणि ड्रेस ठरवता ठरवता त्यात त्यांचा भरपूर वेळही वाया जाताना पहिला असेल. तोच वेळ जर व्यायामात लावायचा झाला तर एक वेळचे वर्कआऊट होईल इतका वेळ कपडे निवडण्यात जातो.

स्त्रियांना हा प्रश्न पडणे पण फार साहजिक आहे. कारण पुरुषांच्या पोषाखापेक्षा स्त्रियांच्या पोषाखात भरपूर व्हरायटी असते.

स्त्रियांना कलरिंग सेन्स पुरुषांच्या तुलनेत जरा जास्त असतो व प्रेझेंटेबल, अप टू डेट आणि फॅशन ट्रेण्डला अनुसरून कपडे वापरणे हे स्त्रियांना आवडते.

त्यामुळे तुम्हालासुद्धा सारखा हा प्रश्न पडत असेल की “आज मी काय घालू?” त्यावर समाधान म्हणून आम्ही काही उपाय घेऊन आलोय. तर चला ते उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

१) टॉक्सिक वॉर्डरोब –

टॉक्सिक वॉर्डरोबचा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल.

पण तुमच्या वॉर्डरोब मध्ये जर अस्ताव्यस्त कपड्यांचा खच असेल आणि तरी तुम्हाला काय घालावे यात कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला टॉक्सिक वॉर्डरोबच्या समस्येवर उपाय शोधण्याची गरज आहे.

याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे आपल्या कपाटातील एकूण एक कपडा खाली जमिनीवर काढून घ्या व उपयोगानुसार कपडे सॉर्ट करा.

 

toxic wardrobe inmarathi
youtube.com

 

तुम्हाला होणारे, न होणारे, नवीन, जुने सगळ्या सगळ्या कपड्यांचे विभाजन करून घ्या. जितके वापरण्या जोगे असतील तितकेच कपाटात असू द्या.

बाकी गरजूंना दान करा किंवा रीसायकाल करा. अशाने कपाटातला पसारा कमी होईल व घालण्यासाठी कपडे पटकन सापडतील.

२) रंगानुसार कपड्यांची निवड –

तुमच्या घरात जिथे कुठे नीट प्रकाश असेल तिथे आरसा असू द्या. जो ड्रेस घालायचा आहे तो आरशासमोर उजेडात ट्राय करून बघा. तो रंग तुमच्यावर कसा दिसतो हे तुम्हाला कळेल.

३) शरीरयष्टी नुसार ड्रेस निवडा –

तुमचा बॉडी टाईप ओळखून कपड्यांची निवड केली की तुम्ही किती सुंदर दिसता या प्रतिक्रिया तुम्हाला हमखास मिळतील. कपड्यांवरून आपला कॉन्फिडन्स ठरत असतो.

त्यामुळे तुमच्या शरीर यष्टी प्रमाणे कपडे व रंग निवडा. लठ्ठ व्यक्तींनी छोटे छोटे पोल्का डॉट असलेले, छोटे बुट्टे असलेले, गडद रंगाचे कपडे निवडावे.

बारीक व्यक्तींनी फार सैल कपडे निवडू नये. आपली शरीर यष्टी जशी आहे तसे कपडे निवडा.

 

women clothing inmarathi

४) वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करणे –

ठराविक कपडे असतील तर कधी वेगळे टॉप आणि वेगळी जीन्स घालून बघा. २ – ३ प्रकारच्या सरीज accessories असतील तर त्यांची आलट पालट करून बघा.

यानी त्याच त्याच पद्धतीचे कपडे घालणे होणार नाही व तुम्हाला ही फ्रेश वाटेल आणि तुमच्या ड्रेसिंगमध्ये नाविन्य राहील.

५) आठवड्याचे प्लॅनिंग –

रविवारी आपल्याला वेळ असतोच. कॉलेज, ऑफिस सुरू झाल्यावर घाई गडबड करण्यापेक्षा रविवारीच आठवडा भराचे कपडे निवडून ठेवा. याने वेळ वाया जाणार नाही.

वेगवेगळी कॉम्बिनेशन ट्राय करायला तुम्हाला वेळ मिळेल व गोंधळही होणार नाही व एखादा ऑड ड्रेस घालून फजितीसुद्धा होणार नाही.

६) ट्रेंड ओळखा –

लेटेस्ट फॅशन नुसार ड्रेसिंग करणे फार महत्त्वाचे समजले जाते. आजकाल ढोपरापर्यंत ब्लाऊज घालण्याची फॅशन आली आहे. पूर्वी सारख्या दंडापर्यंत असलेल्या ब्लाऊजचा ट्रेंड नाही.

त्याचप्रमाणे लेटेस्ट ट्रेंड काय सुरू आहे त्यानुसार कपडे निवडा. जुन्या कपड्यांना अल्टर करा, बदल करा किंवा ते कोणाला तरी दान करा.

 

alia bhatt inmarathi

७) वयोमानानुसार कपडे वापरा –

वयाप्रमाणे कपडे घालण्याची पद्धतही बदलली पाहिजे. आपण ज्या वयात असतो काही विशिष्ट कपडे त्या वायालाच शोभतात. लहान मुलांना ज्या प्रमाणे कार्टून प्रिंटचे ड्रेस छान दिसतात ते तसेच मोठ्या मुलींना किंवा पोक्त महिलांना शोभत नाहीत.

त्यामुळे आपल्या वयानुसार कपडे निवडा. आपले खरे वय न कळू देणे ह्यात महिलांना फार रुची असते. पण आपले कपडे निवडताना वयाचे भान असणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यामुळे न लाजता, आपण ज्या वयात आहात तसेच कपडे घाला.

८) कॉपी करणे थांबवा –

आपल्या एखाद्या मैत्रिणीने एखादा छानसा ड्रेस आणला आणि तसाच आपल्याला घ्यायची इच्छा झाली त्यात काहीच वावगे नाही. पण सतत कोणाच्या कपड्यांची पद्धत पाहून जशीच्या तशी अजिबात कॉपी करू नका.

एखाद्या व्यक्तीला जे चांगलं दिसतं ते तुम्हाला ही सूट होईल असे नाही. त्यामुळे स्वतःची वेगळी स्टाईल बनवा.

वरील सगळे उपाय करून झाल्यावरही समाधान मिळत नसेल, काय घालावे हा प्रश्न कायम असेल तर नक्कीच तुम्हाला कपाटातील कपडे खरोखर कमी करण्याची गरज आहे. आपल्या कपड्यांचे या तीन प्रकारांमध्ये विभाजन करा –

 

clothing inmarathi
youtube.com

 

१. आवडते, स्पेशल कपडे – असे कपडे जे तुम्हाला तुमच्या प्रियजनांनी भेट दिले आहेत किंवा तुम्ही अविस्मरणीय सहलीवरून ते विकत घेतले आहेत, असे कपडे जे तुमच्या आयुष्यात विशेष महत्त्व ठेवतात.

२. अल्टर करावयाचे कपडे – असे कपडे ज्यांवर थोडेफार काम करून ते पुन्हा घालण्यासारखे होतील , नवीन ट्रेंडशी मॅच होतील व जे व्यवस्थित फिटींग चे आहेत.

३. दान करावयाचे कपडे – असेही काही कपडे असतात जे तुम्हाला आता होत नाहीत किंवा तुम्हाला आवडत नाहीत. जे तुमच्या कोणत्या तरी मैत्रिणीवर तुमच्यापेक्षा अधिक छान दिसतील.

या तीन प्रकारांमध्ये कपड्यांचे विभाजन करा, कपड्यांचा पसारा कमी करा आणि वरील नियम लाऊन कपडे निवडा. तुमचा प्रश्न नक्कीच सुटेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?