' पंजाबमधील सुताराने बनवलेल्या “इको फ्रेंडली सायकलला” थेट परदेशातून मागणी… – InMarathi

पंजाबमधील सुताराने बनवलेल्या “इको फ्रेंडली सायकलला” थेट परदेशातून मागणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा समाजाभिमुख व समाजप्रिय आहे. त्याला माणसांना भेटावे, त्यांच्यात मिसळावे, त्यांच्यांशी बोलावे असे वाटते. त्यांची जीवनशैली,परंपरा,पद्धती जाणून घ्याव्यात असे अगदी मनापासून त्याला वाटत असते.तो एकाकी जगू शकत नाही.

माणूस प्रवासप्रिय असतो. त्याला प्रवास करणे आवडते. कधी आवड म्हणून तर कधी गरज म्हणून तो प्रवास करतो. सुरुवातीला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना तो चालतच जायचा.

चालत जाण्याचा प्रवास चाकाच्या शोधानंतर थोडा सुकर झाला. बैलगाडीने, बस, विमान असा प्रवास त्याने करायला सुरुवात केली. काळ जसाजसा पुढे सरकू लागला तसातसा त्याचा प्रवास सुखकर होऊ लागला.

 

transport evolution inmarathi

 

मग रस्ता रुंदीकरण, वृक्षतोड, डांबरीकरण यामुळे शहरेच नव्हे तर आता गावेही चकचकीत झाली खरी पण प्रदूषण वाढले.

सोयी तितक्या गैरसोयी या उक्तीची सत्यता पटू लागली.वाहनांचा धूर,धूळ,आवाज यामुळे हवा,ध्वनी प्रदूषण वाढीस लागले. श्वसनाचे आजार,अॅलर्जी इत्यादी आजार माणसाच्या ठायी आपसूक येऊन वस्ती करू लागले.

यावर उपाय सापडेना! मग ‘झाडे लावा,झाडे वाढवा’,प्रत्येकाने एक झाड लावा व संवर्धन करा,’अशा पाट्या जागोजागी दिसू लागल्या.

एक वाहन वापरा, इंधन वाचवा, गर्दी टाळा असे प्रबोधन सुरू झाले खरे पण प्रत्यक्ष कार्यवाही होईना. म्हणून खरे, तळमळीचे कार्यकर्ते पुढे सरसावले.

सायकलीचा वापर सुरु झाला. पुणे जसे विद्येचे तसेच सायकलींचे माहेरघर होते.आताही वरील सर्व गोष्टींसाठी, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी काहीजण सायकलींचा वापर करतात.

‘जुने ते सोने’ या म्हणी प्रमाणे १० ते २० % सायकली दिसू लागल्या आहेत, ही एक चांगली सुरवात म्हणावी लागेल.

 

cycling inmarathi

 

आपल्याला माहित आहे गेल्या मार्च २०२० पासून सर्व विश्वावर कोरोनाचे जागतिक संकट आले आहे. करोडो लोक या महामारीच्या तडाख्यात सापडले, कित्येक मरण पावले.

जगावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.‌ भारत कसा अपवाद असेल याला? त्यामुळे भारत सरकारने लॉकडाऊन प्रक्रिया सुरू केली होती.

यात सगळे व्यवहार ठप्प झाले, लोक बेकार झाले, मजूरांना आपापली गावे गाठावी लागली, कुटुंबेच्या कुटुंबे पायी चालत, रणरणत्या उन्हातून, आपला संसार घेऊन गावी परतून गेली. व्यवसाय थांबले,आर्थिक घडी विस्कटली.

अशा या खडतर काळात एक अनोखी गोष्ट घडली. ही व्यक्ती गाव सोडून गेली नाही, या व्यक्तीचे नाव होते धनीराम सग्गू!

पंजाबात रहाणारी ही व्यक्ती व्यवसायाने सुतार आहे. नूरा इंटेरिअर नावाच्या लाकडाच्या कंपनीत हा माणूस कामाला आहे.मोठ्या मोठ्या कोठ्यां (मोठी घरे) ची दारे, खिडक्या, कपाटे ही कामे तो करत असे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीला धैर्याने तोंड देण्यासाठी त्यांनी लाकडी पर्यावरण पूरक सायकल बनवण्याचे ठरवले.

झिरकपूर मध्ये रहाणारा पण पंजाब मध्ये काम करणाऱ्या ह्या बुध्दिमान व्यक्तीने बेकारीचा काळ असाच वाया न घालवता प्लायवूड व इतर साहीत्याचा वापर करून सायकल करण्याचा निश्चय केला.

लहानपणी सायकल वापरावी ही इच्छा अपुरी राहील्याने, कुटुंबाची जबाबदारी असल्याने सायकली बद्दल पूर्ण माहिती नव्हती.

त्यामुळे आजूबाजूला निरीक्षण करून, मित्रांना भेटून, सायकलीचे सुटे भाग काढून पुन्हा लावणे, त्यात सुधारणा करणे या गोष्टी ते करत होते.

लाकडाची सायकल तयार करण्याचे अजब व अनोखे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न सुरु होते.

 

dhaniram saggu inmarathi

 

द बेटर इंडिया या वर्तमानपत्राशी बोलताना धनीराम सग्गू म्हणाले –

‘सुतारकाम ठप्प झाले होते, दोन वेळ खाण्याची भ्रांत! अशा वेळी स्वतःला कामात गुंतवून काहीतरी वेगळे करावे अशी मनापासून इच्छा होती. पण प्लायवूड, हत्यारे, जुन्या सायकली हा एवढाच कच्चा माल! परिस्थितिने माझे हात बांधून ठेवले होते.’

माझ्या १४ १६ वर्षांच्या दोन मुलांचा विचार डोक्यात आला. त्यांच्यासाठी तरी आपण काहीतरी केलंच पाहिजे. गरज ही शोधाची जननी आहे.

गरज पडून गळ्याशी आल्याशिवाय माणूस कामाला लागत नाही हेच खरं. मग मी काम सुरू केले. नेहमीच्या सायकलींची मोजमापे घेतली, लाकूडकाम सुरू झाले.

चाके लाकडाची बनवली पण सायकल खूपच जड झाली. दुसऱ्या प्रयत्नात केल (kail) नावाचे लाकूड जे सागाच्या लाकडाप्रमाणे दणकट, टिकाऊ पण हलके असते व किंमत कमी! कॅनडातून व भारताच्या डोंगरातून लाकूड आणून काम सुरू झाले.

राकेश सिंग नावाचे मित्र व सायकल प्रेमी धनीरामांच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांनी मत दिल्यानंतर मडगार्ड, हँडलबार चे काम झाले. मग समोर बास्केट बसवण्यात आली.

हे काम पूर्ण व्हायला ४ महीने लागले. ही सायकल राकेश सिंग यांनी खरेदी केली. चंदीगड मध्ये ते ती सायकल चालवित असत. PGIMER या कंपनी मध्ये ते व्यवस्थापन अधिकारी होते.

सायकल अजून हलकी कशी होईल या प्रयत्नात ते होते. मुंबईचे विजय मल्होत्रा यांच्या ब्लॉग मध्ये म्हणतात, नेहमीच्या रस्त्याना २० ते २२ किलो सायकल जड होते.

अशा सायकली सादरीकरणासाठी वापरात येत नसून.संग्राहक वस्तू म्हणून ठेवल्या जातात. नेदरलँडच्या बाऊ बाईक्स(BoughBikes)कंपनीने लाकडी साच्यातील सायकल बनवली होती पण धनीरामला सायकल मार्केटचा अंदाज नव्हता.

त्यांनी आपल्या कल्पना शक्तीप्रमाणे सायकल तयार केली अन् त्याची मेहनत रंग लायी!

 

wooden cycle inmarathi

 

सग्गूने १० सायकली ग्राहकांना दिल्या, ६ देणे बाकी आहे. प्रादेशिक वर्तमानपत्रातून ही बातमी पस़रल्यावर हिरो सायकल चे मॅनेजिंग डायरेक्टरनी त्यांचे अभिनंदन केले.

आता त्यांच्या सायकलींना जागतिक बाजार पेठेतून मागणी येत आहे. लुधियाना बाजारपेठेतून सुटे भाग त्यांना मिळू लागले आहेत. ब्रेक मध्ये बदल करून सायकलला गियर बसवणार आहेत.

अशी ही सायकल गुळगुळीत रस्त्यावर,कोरड्या हवमानात मस्त चालते. आता शोरूम मध्ये जागा घेऊन जास्तीतजास्त लोक ही सायकल खरेदी करतील हे त्यांचे स्वप्न आहे, आपली स्वप्ने पूर्ण होवोत ही सदिच्छा!

एका साध्यासुध्या माणसाच्या असामान्य कामगिरीची दखल किती मोठ्या प्रमाणावर मोठ्या कंपनीने घेतली आहे! यश म्हणजे दुसरं काय असतं?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?