'उत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी!

उत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एकहाती सतत संपादन करणाऱ्या भाजपने मुख्यमंत्री पदावर हिंदुत्ववादी चेहरा बसवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांनी आणि हिंदू धर्म निष्ठेमुळे नेहमीच चर्चेत असणारे आदित्यनाथ सामाजिक समतोल कसा साधणार हा प्रश्न प्रत्येक स्तरातून विचारला जात आहे. असे असले तरी अनेकांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करीत योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील वर्चस्व पाहता इतर दुसरा लायक व्यक्ती मुख्यमंत्री पदास पात्र नाही असे म्हटले आहे.

===

आणि हो, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून योगींचीच निवड का केली असेल, त्या मागे काय राजकारण असेल – हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा:

योगी, मोदी आणि युपीतील कात्रजचा घाट!

===

योगी आदित्यनाथ हे जरी एक मोठे नाव असले तरी महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला ते माहित नाही. त्यांची पार्श्वभूमी काय? त्यांचे राजकारणातील कर्तुत्व काय? अश्या अनेक प्रश्नांनी आपल्याला बेजार करून सोडले असणार. तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही सांगत आहोत योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल तुम्हाला काही माहित नसलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्यात!

yogi-aaditynath-marathipizza01

स्रोत

आदित्यनाथ यांचे मूळ नाव आहे ‘अजय सिंग’! संन्याशी झाल्यावर त्यांनी आपले नाव बदलले.

गरवाल विद्यापीठातून त्यांनी बी.एसस्सी.चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची वकृत्वशैली जबरदस्त आहे. त्यांच्या भाषणामुळे आणि मुद्देसूद बोलण्यामुळे ते झपाट्याने प्रसिद्धीस आले.

उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ सध्या खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. १९९८ सालापासून सलग ५ वेळा तेथील जनतेने खासदार म्हणून त्यांना निवडून दिले आहे यावरून लक्षात येते की पूर्व उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे किती अचाट वर्चस्व आहे. त्यामुळेच त्यांच्या मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी सर्वच्या सर्व ८ आमदार निवडून आणले.

१९९८ साली वयाच्या २६ व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा ते लोकसभेवर गेले तेव्हा ते लोकसभेतील सर्वात तरुण खासदार ठरले.

योगी आदित्यनाथ हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचे वारसदार आहेत. त्यांच्या वक्तव्यातून वारंवार हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे आवाहन दिसून येते. २००५ साली त्यांनी इटाह मधील ५००० लोकांना हिंदू धर्मात सामावून घेतले. यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य असे होते,

जोवर उत्तर प्रदेश आणि संपूर्ण भारत हिंदू धर्ममय करणार नाही तोवर मी माझे कार्य सुरूच ठेवणार.

yogi-aaditynath-marathipizza02

स्रोत

जरी त्यांचा हिंदुत्व विचारधारेकडे ओढा असला तरी संसदेमध्ये मात्र ते सर्वच मुद्द्यांवर चर्चा करतात. समाजाच्या विकासाच्या दृष्टीने संसदेमध्ये आपले म्हणणे ते अतिशय प्रभावीपणे मांडतात असे दिसून येते. विरोधक त्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना बगल देत आपल्या शब्दावर ठाम राहतात.

२००७ च्या गोरखपूर दंगलीमध्ये एका हिंदू मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू तरुणांनी बदल्याची भाषा केली. तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी हिंदुना न्याय मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यासाठी त्यांनी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. परंतु सरकारी यंत्रणेने त्यांना असे करण्यापासुन रोकले आणि आयुष्यात पहिल्यांदा योगी आदित्यनाथ यांना तुरुंगवास झाला.

आजवर योगी आदित्यनाथ यांच्यावर दंगली भडकवणे, प्रक्षोभक भाषणे, हत्या, आणि इतर अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पण आजवर एकही गुन्ह्याचा निकाल लागलेला नाही.

हिंदू युवा वाहिनी या तरुणांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी संघटनेचे ते संस्थापक आहेत. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये ही संघटना अतिशय प्रसिद्ध असून यात दलित हिंदूंचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ या संघटनेने आजवर अनेकवेळा कायदा हातात घेतला आहे.

yogi-aaditynath-marathipizza03

स्रोत

काही वर्षांपूर्वी एक व्हिडियो व्हायरल झाला होता ज्यात आदित्यनाथ म्हणतात,

जर एका हिंदू तरुणीला मुस्लीम धर्म घेण्यास भाग पाडले तर मी १०० मुस्लीम तरुणींना हिदू धर्मात आणेन. कोणीही जबरदस्तीने कोणाही व्यक्तीचे धर्म परिवर्तन करू शकत नाही, पण जर तसे करायचा कोणी प्रयत्न केला तर मी देखील त्याला तसेच उत्तर देईन.

योगी आदित्यनाथ हे जरी भाजपाचे खासदार असले आणि पक्षाबदल त्यांना प्रेम असले तरी बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून त्यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले आहे. अश्यावेळेस आरएसएस कडून हस्तक्षेप केल्यावर योगी आदित्यनाथ यांच्या मनासारखे करण्यात येते. २००७ च्या निवडणुकीमध्ये आदित्यनाथ यांना १० उमेदवार द्यायचे होते. पण पक्षाने या गोष्टीला इन्कार दिला. अखेर आरएसएस कडून तोडगा निघाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी स्वत:चे ८ उमेदवार दिले.

लव-जिहादच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ भलतेच आक्रमक आहेत. निवडणूक काळात प्रत्येक प्रचारसभेत ते या मुद्द्याला हात घालतात आणि लोकांचा प्रतिसाद मिळवतात. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एकहाती विजयामध्ये योगी आदित्यनाथ यांचा देखील मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते.

yogi-aaditynath-marathipizza04

स्रोत

असो आता योगी आदित्यनाथ कश्याप्रकारे उत्तर प्रदेशाचा विकास करतात ते येत्या काही काळात कळेलच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?