' भलत्याच प्रॉडक्टची जाहिरात करण्याचा फंडा: या तंत्रामागील शास्त्र जाणून घ्या...

भलत्याच प्रॉडक्टची जाहिरात करण्याचा फंडा: या तंत्रामागील शास्त्र जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात, जाहिरात हा एक महत्त्वाचा फंडा झाला आहे. आपली वस्तू विकली जायला हवी असेल, तर आपल्या संभाव्य गाहकांवर जाहिरातींचा मारा करणं, ही फारच महत्त्वाची बाब ठरते. वस्तूच काय, आपली एखादी कला जगासमोर मांडायची असेल, आणि त्यातून पैसा मिळवायचा असेल, तरीही जाहिरातींना पर्याय नाहीच.

 

chings-inmarathi

हे ही वाचा – फॉग डिओ ब्रँड इतका कसा काय टिकून आहे, एक अनोखी कहाणी!

अशा जाहिराती दाखवायच्या तर टीव्ही आणि सोशल मीडियासारखा दुसरा पर्याय नाहीच. या माध्यमांमधून सगळ्यांना आकर्षित करणं आता सोपं झालं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशा एखाद्या बड्या कलाकाराला किंवा खेळाडूला जाहिरातीत घेतलं, म्हणजे त्या सगळ्यांवर “इम्प्रेशन” पडणार हे नक्कीच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर, नुकत्याच एकत्र आलेल्या वोडाफोन आणि आयडिया या दोन बड्या मोबाईल कंपन्यांनी २-३ दिवस जाहिरातींचा नुसता भडीमार केला होता. लोक कंटाळले तरी त्या जाहिराती मात्र थांबत नव्हत्या.

सामाजिक संदेश देणाऱ्या सरकारी जाहिरातींमध्ये सुद्धा हा फंडा वापरला गेलेला पाहयला मिळतो.

अगदी Imperial Blue ची Men will be men ही जाहिरात सिरीज आठवतेय? आजवरच्या सर्वोत्तम विनोदी जाहिरातींमध्ये या जाहीरातींचा समावेश होतो. तुम्हाला देखील आठवत असतील या जाहिराती आणि त्यामध्ये वाजणारी ती मधुर गझल!

 

men-will-be-men-ad-inmarathi

 

कोमात गेलेल्या पेशंटच्या हार्ट बिट्स नर्स तपासायला आल्यावर वाढणं, रस्ता ओलांडण्यासाठी एका वृद्ध महिलेला मदत करत असताना समोरून सुंदर स्त्री आल्याने त्या महिलेला पुन्हा दुसऱ्या टोकाला घेऊन जाणारा युवक अशा कल्पनेचा वापर करून त्यांनी बनवलेली जाहिरात टीव्हीवर अनेकदा पाहायला मिळते.

फक्त टीव्हीच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा या जाहिराती मोठ्या प्रमाणात दाखवल्या गेल्या. लोकांना त्या प्रचंड आवडल्या आणि त्यांचा योग्य तो प्रभाव पडला. त्यानंतर मग Carlsberg सारख्या कंपनीने ग्लासेसची जाहिरात करून लोकांच्या मनावर त्यांचं नाव ठसवायला सुरुवात केली.

 

carlsberg-inmarathi

हे ही वाचा – कुणाचं काय तर कुणाचं काय! ब्रँडचं उलटं नाव आकर्षित करतं कोट्यवधींचा रेव्हेन्यू!

पण समजा आम्ही तुम्हाला विचारलं की Imperial Blue कोणत्या प्रोडक्टची जाहिरात करते? तर तुम्ही म्हणाल – म्युजिक सीडीज, कारण ते जाहिरातीच्या शेवटी म्हणतात Imperial Blue Music CDs किंवा Imperial Blue Superhits! पण तुम्हाला खरंच सांगतो – हा तुमचा गैरसमज आहे.

आता दुसरं एक उदाहरण म्हणून Royal Challenge कडे पाहू. यांच्या जाहिराती देखील उत्तम असतात. आता पुन्हा तुम्हाला विचारलं की Royal Challenge कोणत्या प्रोडक्टची जाहिरात करतं? तर तुम्ही म्हणाल खेळासंबंधी काहीतरी आहे. पण हा देखील तुमचा गैरसमज आहे.

खरंतर Imperial Blue आणि Royal Challenge हे दोन्ही ब्रँड मद्य उत्पादन आणि विक्रीच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांचे अनुक्रमे प्रोडक्ट्स आहेत – Imperial Blue Whisky or Royal Stag Whisky.

हीच गोष्ट Carlsberg च्या बाबतीत सुद्धा घडताना दिसते. आधी म्हटल्याप्रमाणे, ते जाहिरात करतात ती केवळ ग्लासेसची! मात्र त्यांचं मूळ प्रॉडक्ट आहे, बियर.

अर्थात, ही गोष्ट तशी बऱ्याच जणांना माहित आहे. पण हे ब्रँड जाहिरातींमधे कधीच आपल्या खऱ्या प्रोडक्ट्सची नावं घेत नाहीत, कारण तसं ते करूच शकत नाहीत. चला जाणून घेऊया असं का?

 

Imperial-Blue-Brand-Champ InMarathi

 

१९९५ सालापासून मद्य आणि सिगारेट्सच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे आणि हेच कारण आहे की हे विख्यात ब्रँड आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात करू शकत नाहीत. म्हणून या अश्या ब्रँडना स्वत:चा ब्रँड टिकून रहावा, लोकांच्या डोक्यात आणि ओठी त्याचं नाव असावं म्हणून brand extension किंवा extended products च्या प्रमोशनचा आसरा घ्यावा लागतो.

या जाहिरातींमधून ते कधीकधी अश्या गोष्टीची जाहिरात करतात जी मार्केट मध्ये उपलब्ध नसतेच.

फक्त आपला ब्रँड प्रमोट करावा आणि लोकांमध्ये त्याचा हटके जाहिरातींच्या माध्यमातून प्रसार व्हावा या यामागचा एकमेव उद्देश असतो. अश्याप्रकारच्या जाहिरातीला Surrogate advertising म्हणतात. म्हणजे जे आपलं नाहीच आहे त्याची जाहिरात करत सुटायची.

अश्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये आपलं जे मुख्य प्रोडक्ट आहे त्याच्याशी संबंधित प्रोडक्ट्सची निवड करून त्यांच्या मार्फत जाहिरात केली जाते.

 

royal-challenge-whisky-marathipizza

 

उदा. Royal Challenge चं मुख्य प्रोडक्ट आहे व्हिस्की.

म्हणून ते क्लब सोडा, मिनरल वॉटर यांच्या नावाखाली आपल्या ब्रँडचा प्रसार करतात.

तर दुसरीकडे Imperial Blue मात्र म्युजिक सीडीज किंवा प्लेयिंग कार्ड्स सारखं अगदीच वेगळ प्रोडक्ट घेऊन जाहिरात करते. यामागे त्यांचा एकच उद्देश असतो ती म्हणजे लोकांच्या डोक्यात आपलं नाव अगदी घुसवायचं आणि याबाबतील Imperial Blue यशस्वी देखील झालीये म्हणा.

त्यांच्या हटके जाहिराती आणि त्यामध्ये वाजणारी गझल यांमुळे खासकरून पुरुषांमध्ये Imperial Blue हे नाव सगळ्यांच्याच तोंडी आहे आणि मुख्य म्हणजे व्हिस्की प्रोडक्टसाठी त्यांचा प्राथमिक ग्राहक हा पुरुष वर्गच असल्याने त्यांची ही चाल अगदीच योग्य ठरली आहे.

 

liquor ban inmarathi

 

१९९५ च्या नियमानुसार मद्य आणि सिगारेट्सचा जाहिरातींच्या माध्यमातून थेट प्रसार करण्याची बंदी असली तरी त्यात कुठेही असा उल्लेख नाही की मद्य आणि सिगारेट्स विकणाऱ्या ब्रँडनी जाहिरात करूच नये.

त्यामुळे खोट्या प्रोडक्ट्सचं पांघरूण घालून जाहिरात करणाऱ्या या ब्रँडना कोणीही अडवू शकत नाही आणि एकदा का लोकांच्या मनामनात आपल्या ब्रँडचं नाव कोरण्यात ते यशस्वी झाले की लोक आपोआप त्या ब्रँडशी आणि त्यांच्या खऱ्या प्रोडक्ट्सशी जोडले जातात.

याला म्हणतात जाहिरातीचा चक्रावून सोडणारा जबरदस्त फंडा!!

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?