' कूल वाटतं म्हणून चे ग्वेराचे टी शर्ट्स, फोटोज घेणाऱ्या तरुणांना या माणसाचं क्रूर रूप माहितीच नाहीये

कूल वाटतं म्हणून चे ग्वेराचे टी शर्ट्स, फोटोज घेणाऱ्या तरुणांना या माणसाचं क्रूर रूप माहितीच नाहीये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

काही व्यक्तींना एका वेळी दोन आयुष्य जगायचं भाग्य लाभलेलं असतं. आपण जसं आपल्या काही सिनेमांमध्ये बघतो की, एखादा हिरो हा खरं तर दुष्कृत्य करत असतो.

पण, त्यामागे त्याचा काहीतरी उदात्त हेतू असतो जो की आपल्याला फार उशीरा कळतो. एक उदाहरण सांगायचं तर, सलमान खान चा काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘किक’ हा सिनेमा सांगता येईल.

लहान मुलांना मदत करण्यासाठी आपला हा हिरो त्यात जगभरातून किती तरी भ्रष्टाचारी लोकांना मारतो आणि त्यांनी वाम मार्गाने गोळा केलेली संपत्ती सत्कारणी लावतो.

पोलिसांच्या नजरेत तो गुन्हेगार असतो. पण, ज्यांना तो मदत करतो त्यांच्यासाठी तो ‘मसीहा’ म्हणजेच ‘देवदूत’ असतो.

Che Guevera हे क्युबा देशातील असंच एक व्यक्तिमत्व आहे. गोल टोपी, मानेवर रुळणारे केस, तोंडात सिगार आणि आपल्या ‘रणदीप हुडा’ सारखा चेहरा.

हा चेहरा तुम्ही कित्येक टी-शर्ट्स वर बघितला असेल. त्याच्या जगभरातील कित्येक लोकांसाठी तो आजही एक ‘स्वातंत्र्यसैनिक’ आहे. जो कायम सत्याच्या बाजूने लढला.

 

che guevera featured inmarathi

 

कायद्यासाठी मात्र तो फक्त एक रक्तपिपासू होता ज्याने कित्येक लोकांचा जीव घेतला.

क्युबा या देशाचा हिरो असलेल्या Che Guevera चे अर्जेंटिना मध्ये किती तरी पुतळे उभारण्यात आले आहेत. अमेरिका आणि इतर देशात मात्र आजही ग्वेरा ला एक अतिरेकीच समजतात.

ग्वेरा बद्दल हे दुमत असल्याचं अजून एक कारण म्हणजे, माहितीचा अभाव. जितकी माहिती उपलब्ध, त्यावरून लोकांचे मत तयार व्हायचे. आज तसं नाहीये, कोणत्याही व्यक्तीबद्दल ‘क्लिक ऑफ या बटन’ वर माहिती उपलब्ध आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ग्वेरा बद्दल अशी काही माहिती आता उपलब्ध आहे ज्याने या गोष्टीवर शिक्कामोर्तब होते की, तो कोणाचाही हिरो होण्याचा लायकीचा नव्हता. त्याने काही चांगली कामं केली असतील.

पण, चांगली कामं आणि वाईट कामं या तराजूत त्याची पारख केली तर ही वाईट कामच जास्त ठळकपणे उठून दिसतात :

१. बॅटिस्टा विरुद्ध पुकारलेलं युद्ध :

 

batista inmarathi

 

क्युबा चे प्रेसिडेंट बॅटिस्टा हा एक क्रूर नेता होता. त्याचं वर्चस्व संपवण्याचा चंग कॅस्ट्रो आणि ग्वेरा या दोघांनी बांधला होता. त्यांनी पुकारलेल्या या बंडाला ’26th July Movement’ असं नाव देण्यात आलं आहे.

जुलै १९५३ मध्ये सुरू झालेली ही मोहीम डिसेंबर १९५८ पर्यंत सुरू होती. २६ जुलै हा दिवस क्युबा या देशात एक क्रांती दिन म्हणून मानला जातो.

रक्ताशिवाय क्रांती होत नाही हे जगभरातील इतिहास सांगतो.

पण, ग्वेरा ने या लढ्यात असं विधान केलं होतं की, “कोणताही क्रांतिकारी हा एक कोल्ड किलिंग मशीन बनला पाहिजे आणि त्याच्यामध्ये केवळ तिरस्काराचीच भावना असावी.”

असं विधान कोणताही चांगल्या विचारांची व्यक्ती करू शकत नाही. या लढ्यात कुठेही गोळ्यांनी भरलेल्या पिस्तूलाची गरज नव्हती.

केवळ ग्वेरा मुळे त्याची सुरुवात करण्यात आली. त्याच्या मते, पुरावा वगैरे तुच्छ गोष्ट होती. ‘ऑन द स्पॉट निर्णय’ ही त्याची पद्धत होती.

२. मृत्युदंड देण्याची आवड :

 

violnace inmarathi

 

ग्वेरा ने एका व्यक्तीला मारल्या नंतर असं विधान केलं होतं की, “गनपावडर आणि रक्ताचा वास घेतला की नाक असल्याचं समाधान वाटतं.”

ग्वेरा च्या रस्त्यात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची त्याने कधीच गय केली नाही आणि त्याच्या कारकिर्दीत त्याने कित्येक पत्रकार, बिजनेसमन आणि जुन्या सहकारी जे त्याच्या मताशी सहमत नाहीयेत त्यांचा ग्वेरा ने खात्मा केला.

पूर्ण आयुष्यात त्याने कमीत कमी शंभर लोकांना मारल्याची नोंद आहे.

 

३. क्यूबा क्रांती मधील योगदान :

 

cuba inmarathi

 

‘गौरीला’ या युद्धकलेचा ‘मास्टरमाईंड’ म्हणून ग्वेरा याचा झालेला गौरव हा स्वघोषित असल्याचं काही वर्षांनी सिद्ध झालं होतं. कारण, ग्वेरा ने पुढाकार घेतलेल्या प्रत्येक युद्धात त्याला हार पत्करावी लागली होती.

मसेटी या ग्वेरा च्या एका सहकार्याने अर्जेंटिना मध्ये उठाव पुकारला होता. पण, तो कोणत्याही प्रभावाशिवाय पोलिसांनी हाणून पाडला होता. त्यानंतर मसेटी हा लोकांच्या सोबत न राहता जंगलात पळून गेला होता.

 

४. अर्थव्यवस्था मोडकळीस आणली :

 

cuba economy inmarathi

 

 

ग्वेरा आणि कॅस्ट्रो यांनी मिळून बॅटिस्टाला १९५९ मध्ये सत्तेवरुन काढलं. पण, त्या प्रोसेस मध्ये हजारो लोकांचा सुद्धा जीव गेला आणि त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

औद्योगिक आणि शेतीबद्दल प्रगती पूर्णपणे थांबली. ग्वेरा हा स्वतः जेव्हा नॅशनल बँकेचे प्रेसिडेंट झाला तेव्हा त्याने नोकरदार लोकांचे आधी असलेले सगळे benifits काढून टाकले आणि किती तरी उद्योग बंद पडले.

 

५. डॉक्टर नसतांना ही तसं दर्शवलं :

 

doctor inmarathi

 

आर्मी चा मेडिकल सपोर्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या ग्वेरा चा कुठेही डॉक्टर असल्याचा रेकॉर्ड नाहीये.

एका व्यक्ती ने चौकशी केलेली असता, ते पेपर चोरीला गेले आहेत असं त्यांच्या कॉलेज मधून सांगण्यात आलं होतं.

६. योद्धा नव्हता :

 

che guevera inmarathi

 

योद्धा त्याला म्हणतात जो लढतो आणि रणांगणावर गरज पडल्यास जीव द्यायला मागे पुढे बघत नाही.

Che Guera हा जेव्हा एकदा सैनिकांच्या तावडीत सापडला होता तेव्हा तो लढण्यापेक्षा शरण गेला होता आणि स्वतःच्या जीवाची याचना करत होता.

याउलट, नोंद अशी आहे की, “मी इथे एकटाच शूरवीर आहे. मला गोळी मारा” असं तो बोलला होता अशी प्रसिद्धी करण्यात आली आणि Che Guera ला हिरो करण्यात आलं होतं.

Che Guera हा स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता हा अगदी चुकीचा विचार होता. क्युबा च्या लोकांना जास्त तासांसाठी कामाला लावणे आणि पगार न देणे यात Che Guera ला काहीच गैर वाटत नव्हतं.

सत्तेवर आल्यानंतर त्याने भाषण स्वातंत्र्यावर बंदी आणली, धार्मिक कार्यात बंदी आणली, लोकांच्या एकत्र येण्यास बंदी आणली.

अशी व्यक्ती काही लोकांच्या प्रसिद्धीमुळे एक ‘लीडर’ म्हणून नावारूपास आली आणि चुकीचा आदर्श लोकांसमोर ठेवला गेला.

पुढच्या वेळी Che Guera चे टी-शर्ट्स घेताना किंवा घरात फोटो लावताना वरील गोष्टींचा नक्की विचार करा आणि त्यापेक्षा एखादा भारतीय खादीचा ड्रेस विकत घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?