' तोल जाऊन “तोंडावर पडताना नेमकं काय होतं” हजारोंना पडलेल्या शंकेचं उत्तर वाचा – InMarathi

तोल जाऊन “तोंडावर पडताना नेमकं काय होतं” हजारोंना पडलेल्या शंकेचं उत्तर वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पडणं हा शब्द ऐकला की काय आठवतं? लहान माझी बाहुली या आपल्या लहानपणी म्हटलेल्या बडबडगीतातील धपकन् पडली त्यात.. पडले पुढचे दात ही ओळ!

मयसभेत जमीन समजून पाण्यात पडलेल्या दुर्योधनाला अपमानास्पद बोलणारी द्रौपदी, धारातीर्थी पडलेले बाजीप्रभू देशपांडे.. जिन्यावरून गडगडत खाली पडलेल्या मुलांचा व्हिडिओ..

या सर्वात समान धागा म्हणजे पडणे. बाहुली आडात पडली. दुर्योधन पाण्यात पडला. हे सारं पडणं अनावधानाने होतं. मुद्दाम कुणी पडेल का? शक्यतो नाही.

कारण अनावधानाने कुणी पडलं तर चेष्टेचा आणि मुद्दाम पडलं तर कुचेष्टेचा विषय होऊ शकतो.

 

slipping-inmarathi

खूपदा चालता चालता एकदम माणसं पडतात. तोल जातो आणि माणसं पडतात. हे तोल जाऊन पडणं काय असतं? शरिरात काही केमिकल लोच्या होतो का?

अशी कशी पडतात माणसं? काय होत असेल बरं? चार लोकांत अशी लाजिरवाणी बाब कशामुळे होत असेल?

बाळ जन्माला येतं. हळूहळू मोठं होऊ लागतं. पहिले काही महिने नुसतं ते सायकल चालवल्यासारखे पाय मारत राहतं. मग एका अंगावर होऊ लागतं. पालथं पडू लागतं. रांगू लागतं. मग उभं रहायला लागतं. कशाचा तरी आधार घेऊन चालू लागतं.

 

kid-walikng-inmarathi

 

पण जेंव्हा तो आधार सोडून त्याला चालायला सुरुवात करायची असते तेंव्हा ते बाळ खूपदा तोल जाऊन पडतं. पण ते परत परत चालू लागतं. आणि पडून पडूनच व्यवस्थित  न पडता चालायचं कसब त्याला येऊ लागतं.

मोठ्या माणसांची पण अशीच गत असते. व्यवस्थित चालता चालता अचानक पाय घसरतो.. तोल जातो आणि पडतात. कधी-कधी तर बसल्या बसल्या तोल जाऊन पडतात.

शरीरातील एकूण अवयवांचं काम एकमेकांशी ताळमेळ साधून चालतं. हा निसर्ग आहे. अतिशय मोठा किमयागार!

शरिरांतर्गत असलेले स्नायू, हाडं सांधे डोळ्याला दिसणारे अवयव जसं डोळे, हात पाय हे सर्व हृदय, रक्तवाहिन्या, मज्जातंतू, अंतर्कर्ण या सर्व अवयवांशी सुसंगतपणे ताळमेळ राखत आपलं काम करत असतात.

मेंदू या सर्वांना सूचना आणि आदेश देत असतो. एकंदरीत शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदू या सर्व अवयवांच्या मदतीने करत असतो. यापैकी एकाचा जरी ताळमेळ चुकला की आपल्याला काहीतरी वेगळं होतं आहे असं वाटू लागतं.

बहुतांश वेळा हे काम व्यवस्थित चालू असतं. आपणही तोवर निर्धास्त असतो. जेंव्हा हा तोल जाण्याचा किंवा अंतर्गत गडबडीचा प्रश्न येतो तेंव्हा त्याची सुरुवात अंतर्कर्णात होते.

 

brain-coordination-inmarathi

 

अंतर्कर्णातील तीन हाडांचा एक सांधा जोडलेला असतो तो बारीक सारीक हालचालींची सूचना मेंदूला देत असतो.

इथं जर काही बिघाड झाला तर तुमच्या मेंदूला सूचना पोचायला वेळ लागतो किंवा चुकीचे संदेश पोचतात. आणि मग ही गडबड सुरू होते. आणि पडझडीचे कारण ठरते.

याशिवाय इतरही काही कारणं आहेत जी तुमच्या शरीराचा तोल बिघडवू शकतात. काय आहेत ही कारणं?

शरीराचा तोल बिघडला आहे असं सांगणारी लक्षणं-

१. चक्कर येणे. (व्हर्टिगो)

२. डोळ्याला अंधारी येणे.

३. तोल गेल्यासारखं वाटणे.

४. पडल्याचा भास होणे.

५. गरगरल्यासारखं होणे.

 

vertigo-effect-inmarathi

 

६. नजरेला अंधूक दिसणे.

७. गोंधळल्यासारखं होणे.

या प्रत्येकाचं कारण वेगळं असतं आणि त्याची लक्षणंही वेगवेगळी असतात.

व्हर्टिगो हे एक प्रमुख कारण. यात‌ चक्कर येऊन रुग्णांना दुखापतीच्या घटनांना तोंड द्यावे लागते.

यातच वेस्टबुलर न्युरोटिस हा एक प्रकार आहे.

नजरेला अंधूक दिसणे-

यामुळे नेमकं काय पाहतोय तेही लक्षात येत नाही.‌ यामुळे तोल जाण्याचा धोका राहतोच. कधी-कधी यामुळे पायांच्या शिरांना धोका निर्माण होतो. सांधे, हाडं, आणि दृष्टीदोष निर्माण होतो.

एखाद्या आजारपणामुळे त्यात दिलेली औषधं त्याच्या दुष्परिणामांचा भाग म्हणूनही शरिराचा तोल बिघडतो. चेतातंतू, मज्जारज्जू यांना धक्का बसला असेल तर शरीरात बिघाड होऊन तोल ढळू शकतो.

अंतर्कर्णात जर काही बिघाड झाला असेल तर त्याचा परिणाम म्हणून चक्कर येण्याचा परिणाम दिसतो.

कधी-कधी अचानक धाप लागते. शरीराला आॅक्सिजन कमी पडला की धाप वाढते. त्यानंही शरीराचा तोल जातो.

नैराश्य किंवा इतर काही मानसिक रोग हे सुद्धा गरगरण्याचं किंवा शरिराचा तोल बिघडायचं कारण असू शकतं.

 

stress-inmarathi

 

कानाला दडे बसणं, वेगवेगळे आवाज येणं याचाही परिणाम होऊन मेंदूला सूचना नीट पोहोचत नाहीत. आणि तोल जाऊ शकतो.

अंतर्कर्णातील द्रव पदार्थ गळून जर बाह्यकर्णात आला तर त्याचाही परिणाम म्हणून हा तोल जातो.

पण योग्य वेळी योग्य उपचार घेतले तर हे आजार बरेही होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नाहक त्रासलेल्या लोकांना आधार देऊ शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?