' वर्तमानपत्रावरील हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब नेमकं काय दर्शवतात?

वर्तमानपत्रावरील हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब नेमकं काय दर्शवतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही लोकांना दिवसभरातल्या काही सवयी असतात ज्या अंगवळणी पडलेल्या असतात.

अगदी सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंतच्या. मग ते खाण्या बाबतीत असो, झोपेतून उठ्ण्याबाबतीत असो, चहा पिणे वगैरे वगैरे.

त्या जर वेळेवर किवा योग्य रित्या होत नसतील तर मग दिवसभर होणाऱ्या चीड चीडीचे ते स्वतः आणि आजूबाजूची माणसं शिकार होतात. अश्याच सवयीपैकी एक फेमस सवय म्हणजे वर्तमानपत्राचे वाचन.

काही लोकांना सकाळी पेपर हवा म्हणजे हवाच असतो. बऱ्याच लोकांचे तर प्रातर्विधी यामुळे खोळंबून बसतात म्हणे! 

 

newspaper readers Inmarathi
Sputnik International

वर्तमानपत्र म्हणजे काहींचा जीव की प्राण! सकाळी सकाळी चहाचे सिप घेत वर्तमानपत्र वाचण्याची मजाच काही और! अश्या लोकांना जर वेळेवर वर्तमानपत्र नाही मिळालं तर त्यांच्या दिवसच सुरु होत नाही.

असो, सध्या ई पेपरच्या जमान्यात कागदी वर्तमानपत्र काहीशी कमी झाली असली तरी आपल्या देशात आणि खासकरून महाराष्ट्रात आजही नियमित वर्तमानपत्र वाचणारा वर्ग मोठा आहे. आपल्यापैकी बरेच जण कधी समोर दिसलं की वर्तमानपत्र वाचत असतील.

 

epaper-InMarathi

 

बरं तुम्ही या वर्तमानपत्रावर खालच्या बाजूस वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब (कलर डॉट) पाहिलेत का हो? पाहिलेत…? त्याचा अर्थ माहितेय का तुम्हाला? आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.

 

colour-dots-marathipizza01

स्रोत

अजून हे लक्षात आलं नसेल तर कोणतही वर्तमानपत्र पहा त्यात तुम्हाला प्रत्येक पानावर हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब दिसतील. यांना कलर रजिस्ट्रेशन मार्क्स म्हणतात.

हे रंग अनुक्रमे असतात- निळा, गुलाबी, पिवळा आणि काळा अर्थात Cyan, Magenta, Yellow, Black (CMYK)!

तुमच्या मनात शंका येण्याआधीच स्पष्ट करतो की काळा अर्थात Black रंग K म्हणून दर्शवला जातो.

CMYK हा शोर्ट फॉर्म तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. यातील एक्सपर्टना त्याबद्दल वेगळ्याने सांगायची गरज नाही. हे बेस कलर आहेत. वर्तमानपत्रामध्ये तुमच्या नजरेस पडणारा कोणताही रंग घ्या तो याच चार कलरच्या कॉम्बीनेशनने बनवला जातो.

प्रिंटींग करताना प्रिंट योग्य जागी आणि एका रेषेत आहे ना हे जाणून घेण्यासाठी या चार कलरची मदत होते.

 

colour-dots-marathipizza02

 

वर्तमानपत्र छपाईसाठी ऑफसेट प्रिंटींग टेक्नोलॉजी वापरतात ज्यामध्ये प्रत्येक रंगासाठी ठराविक प्लेट्स किंवा फिल्म्स वापरून त्यांची प्रत्येक पानावर स्वतंत्र्यरित्या प्रिंटींग केली जाते.

रंग एकमेकांमध्ये मिसळू नये तसेच स्वच्छ आणि अचूक प्रिंट (फुल कलर फोटो) यावी यासाठी या चार रंगाच्या चार प्लेट्स/फिल्म्स पानावर एकाच ठिकाणी समांतर रांगेत असणे गरजेचे असते. प्रत्येक प्लेट/फिल्मवर स्वत:चा एक मार्क (खुण) असते.

जर कधी तुम्हाला एखादा रंग वेगळा वाटला, तसेच रंगसंगती काहीशी वेगळी वाटली तर तुम्ही या चार कलर रजिस्ट्रेशन मार्क्सचा संदर्भ घेऊ शकता. ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणता रंग त्या ठिकाणी वापरण्यात आला आहे.

 

colour-dots-marathipizza03

स्रोत

या कलर डॉट्सचा प्रकार देखील वेगवेगळा असतो. कधी तुम्हाला ते गोलाकारात दिसतील, कधी हार्ट शेप मध्ये. कधी स्टारच्या आकारात दिसतील, तर कधी चौकोनी आकारातही दिसतील.

पण या सगळ्यांमागचं कारण मात्र एकच आहे…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?