' माकडाने सेल्फी काढण्यासाठी पळवला फोन… काय गम्मत झाली ते वाचाच… – InMarathi

माकडाने सेल्फी काढण्यासाठी पळवला फोन… काय गम्मत झाली ते वाचाच…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज काल प्राण्यांच्या माध्यमातून मिम्स येणे हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. सेल्फी घेतानाची मांजर, कुत्रा आणि त्याला शोभेल असे एखादे कॅप्शन; असे बरेच मिम्स पाहायला मिळतात.

पण खरंच प्राणी सेल्फी घेत असतील का?किंवा प्राण्यांना हा सेल्फी नामक प्रकार माहीत असेल का?

तर याचं उत्तर होकारार्थी आहे असं आपण म्हणून शकतो.

 

animal-selfie-inmarathi

 

कसं ते पुढे आता बघूया.

माकडाला माणसाची नक्कल करण्यात महारथ आहे हे काही आता नवीन राहिलेलं नाही. माणसासारखी कामं करताना अनेकदा त्यांना आपण पाहिलं असेलच. काही वेळा तर माकडाला माणसाचा पूर्वज सुद्धा म्हटलं जातं, का तर त्यांच्या मानव सदृष्य कृती आणि स्वभावामुळे.

तर,अशाच एका माकडाचा नकला करण्याचा एक विचित्र प्रकार मध्यंतरी मलेशियात समोर आला आहे.

आज काल काहीही झालं आणि कुठेही गेलो तरी मोबाईल मध्ये फोटो काढण्याचं प्रमाण हे जरा जास्तच झालं आहे. माणूस ताटात जे आहे ते खातो नंतर, पण आधी त्याचे फोटो काढतो.

त्यातल्या त्यात सेल्फीचे प्रमाण तर लिमिटच्या बाहेरच आहे. तर माणसाच्या याच सेल्फी काढण्याच्या प्रकाराची नक्कल करणाऱ्या माकडाची एक स्टोरी ट्विटर वर काही दिवस अगदीच ट्रेंड वर होती.

तर झालं असं, की मलेशियात एका मुलाचा फोन एका माकडाने पळवला. तेव्हा तो मुलगा गाढ झोपेत होता. तो मोबाईल घेऊन ते माकड जंगलात पसार झालं.

 

monkey-stealing-phone-inmarathi

 

भरपूर शोधला तेव्हा तो मोबाईल त्याला जंगलात पुरलेला सापडला. मोबाईल पाहिल्यावर मात्र त्याने हैराण होण्याची सीमा गाठली. कारण मोबाईलची मेमरी माकडाच्या सेल्फी फोटोंमुळे फुल्ल झाली होती. या फोटोज पासून बनवलेला व्हिडीओ ट्विटर वर खूप व्हायरल झाला.

ट्विटर युजर्सनी खूप पसंत केला आणि शेअर सुद्धा केला. 

जॅकरीड्स रोडजी नावाच्या मलेशियन मुलाचा हा आयफोन मोबाईल होता. रोडजी हा कम्प्युटर सायन्स शाखेचा विद्यार्थी आहे.

रात्री झोपताना स्वतः जवळ तो मोबाईल घेऊन झोपला होता. पण सकाळी उठून बघतोय तर त्याच्या जवळ त्याचा मोबाईलच नव्हता. घरच्यांनी कामासाठी घेतला असेल समजून त्यावेळी काही त्याने काहीच केलं नाही.

परंतु घरच्यांकडून सुद्धा नकारात्मक उत्तर मिळाल्यावर मोबाईल चोरी झाल्याची शंका त्याच्या मनात आली.

मलेशियाच्या जा बट्टू पहाट भागात तो राहतो तिथे चोरी मारीचे प्रकार शक्यतो होत नाहीत. तो भाग बऱ्यापैकी पुढारलेला असल्याने त्याने मोबाईल चक्क ‘गायब’ झाला असेल असा अंदाज लावला होता.

रोडजीच्या घराजवळचं जंगल असल्याने आणि त्यातल्या त्यात त्या जंगलात माकडांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या वडिलांनी मोबाईल माकडाने पळवला असेल असा संशय व्यक्त केला.

नंतर घरच्यांनीच घराजवळ एका माकडाची वाढलेली वर्दळ व्यक्त करून त्याला होकार दिला होता.

शेवटी आयफोन असल्या कारणाने जर तो चालू असेल तर ट्रॅक करणे सोप्पे होऊन जाईल या अपेक्षेने त्याने आपल्या मोबाईल वर फोन लावला. आणि त्याची रिंग वाजली.

 

iphone-inmarathi

 

बस्स,मोबाईल शोधण्यासाठी एवढं पुरेसं होत. आणि मोबाईलचे लोकेशन ट्रेस झालं जंगलामध्ये!

मोबाईल चालू असल्याने जंगलात गेल्यावर त्याचे वडील मोबाईल वर सतत फोन करत होते. आणि मोबाईलच्या रिंगच्या आवाजाने रोडजी एका ताडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचला.

माकडाने त्या ताडाच्या झाडाजवळ तो मोबाईल पुरून ठेवला होता.

जेव्हा त्याचे काका मस्करी मध्ये म्हणाले की बघ एखादा फोटो मिळतो का चोराचा फोन मध्ये, तेव्हा गॅलरी ओपन केल्यावर माकडाने काढलेले फोटो पाहून दोघे हैराण झाले.

 

selfie-by-monkey-inmarathi

 

अंततः घडलेला प्रकार आणि स्क्रीन रेकॉर्डिंग रोडजी ने ‘ते स्वतः विश्वास नाही करू शकत की अस काही होऊ शकत’ या आशयाची पोस्ट लिहून आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केली. ज्याला आता पर्यंत अडीच लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

शेवटी मोबाईल गायब झालेला नसून माकडाने घरातून पळवून नेलेला हे त्याला पटलं.

 

selfie-by-monkey2-inmarathi

 

या माकडाने जांभई देताना सुद्धा एक भन्नाट सेल्फी घेतला आहे.

 

open-mouth-monkey-inmarathi

 

याआधी सुद्धा ब्रिटिश फोटोग्राफर डेव्हिड स्लेटर याचा कॅमेरा पळवून नरुटो नावाच्या माकडाने सेल्फी काढल्या होत्या.

तर, माणूस जे करतो ते हुबेहूब माकड सुद्धा फॉलो करू लागला आहे. आधीच्या काळापासूनच्या जमिनीत गोष्टी पुरण्यापासून ते हल्लीच्या सेल्फी काढेपर्यंत सगळं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?