' बिल्डिंगमधून जाणारा हाय-वे…! जपानमधे घडवून आणलेला एक जबरदस्त अभियांत्रिकी चमत्कार! – InMarathi

बिल्डिंगमधून जाणारा हाय-वे…! जपानमधे घडवून आणलेला एक जबरदस्त अभियांत्रिकी चमत्कार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यांचा गंभीर परिणाम जपानवर झाला होता. मात्र, या भीषण परिस्थितीवर मात करून आज जपानने खूप प्रगती केली आहे. असे कुठलेही क्षेत्र नसेल, जिथे जपान राष्ट्राने आपली छाप सोडली नाही.

विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान खूपच प्रगत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जीवन जगणारे जपानी लोक जगभरात चर्चेचा विषय ठरतात.

जपानच्या ओसाका शहराचा उल्लेख आला की सगळ्यात पहिला प्रश्न विचारलो जातो तो म्हणजे- “तुम्हाला गेट टॉवर बिल्डींग माहित आहे का?”

जगातील “सर्वात क्युरीयस” अर्थात कुतुहूलयुक्त इमारत म्हणून या गेट टॉवर बिल्डींगकडे पाहिले जाते. नावावरून तर या बिल्डींगबद्दल तसं काही ग्रेट वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही ही बिल्डींग पाहता तेव्हा मात्र तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाहीत.

अहो, कारण या इमारतीमधून चक्क एक हायवे जातो…!

 

gate-tower-building-marathipizza01

 

१६ मजले उंच असलेल्या या इमारतीच्या ५ व्या, ६ व्या आणि ७ व्या मजल्यामधून एक्सप्रेस हायवे जातो. या बिल्डींगच्या तळमजल्यावर लावलेल्या फलकावर हे तीन मजले म्हणजे ‘हॅनशीन एक्सप्रेसवे’ असल्याचा स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो.

या इमारतीची लिफ्ट ४ थ्या मजल्यावरून थेट ८ व्या मजल्यावर जाऊन थांबते.

या इमारतीच्या इतर मजल्यांवर अनेक ऑफिसेस आहेत. म्हणजेच एका भल्या थोरल्या ऑफिस बिल्डिंगच्या थेट मध्यातून एक हायवे पास होतो.

 

gate-tower-building-marathipizza02

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गेट टॉवर बिल्डींगला हे अद्भुत वैशिष्ट्य लाभलं ते मात्र एका वादामुळे!

हा वाद होता जमिनीचा मालक आणि जपानी सरकार यांच्यामधला.

ज्या जमिनीवर गेट टॉवर बिल्डींग उभी आहे ती जमीन मेईजी काळापासून लाकूड आणि कोळसा यांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीच्या मालकीची होती.

 

gate-tower-building-marathipizza03

१९८३ साली पुनर्विकास योजनेमध्ये या जागेचा देखील समावेश करण्यात आला होता. परंतु बिल्डींगचे परमीट मात्र सरकार तर्फे नाकारण्यात आले, कारण जपानी सरकारने ही जागा हायवे साठी निश्चित केली होती.

म्हणजेच या जमिनी वरून हायवे जाणार होता. मात्र जमिनीच्या मालकाने सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले आणि हार न मानता हायवेसाठी जमीन देण्याचे नाकारले.

त्याने ‘हॅनशीन एक्सप्रेसवे कोर्पोरेशन’ ला यावर तोडगा काढण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला आणि त्यातून निर्माण झाला हा बिल्डींगमधून जाणारा हायवे.

हा हायवे जरी गेट टॉवर बिल्डींगमधून जात असला तरी त्याचा बिल्डींगमधील कार्यालयांच्या कामकाजावर काहीही परिणाम होत नाही. खासकरून तशी काळजीच इंजिनियर्सनी घेतलेली आहे.

हा हायवे बिल्डींगला अगदी चिटकून वगैरे जात नाही. शिवाय हायवेच्या आसपास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारलेलं स्ट्रक्चर, हायवे वरील रहदारीचा आवाज बिल्डींगमध्ये येऊ देत नाही.

ही इमारत बांधली गेली आहे ती १९९२ मध्ये… म्हणजेच जवळपास ३० वर्षांपूर्वी! जपानमध्ये त्याकाळात वापरलं गेलेलं हे उत्कृष्ट तंत्रज्ञान म्हणजे एक आश्चर्यच म्हणता येईल. आजही अंडरग्राउंड रस्त्यांचा मार्ग स्वीकारला जातो. हे अनोखे तंत्रज्ञान किती उत्तम असेल याचा विचार करा.

 

gate-tower-building-marathipizza04

आधुनिक युगातील इंजिनियरिंगचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून गेट टॉवर बिल्डींग आणि हॅनशीन एक्सप्रेसवेकडे पाहिले जाते.

अशा या एक्सप्रेसवेबद्दल आवर्जून बघावेत असे व्हिडीओ :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?