' गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा! – InMarathi

गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुलायम आणि गुलाबी ओठ असणे अशी इच्छा प्रत्येक तरुणीची असते. हल्ली पुरुषांमध्येही स्वतःच्या काळजीची ट्रेंड बघायला मिळते. गुलाबी आणि मुलायम ओठ हे फक्त सौंदर्याचे लक्षण नव्हे तर यांवरून तुमचे ओठ निरोगी आहे हेसुद्धा कळते.

ओठांचे फाटणे किंवा ओठ काळे पडणे हा बर्‍याच जणांसाठी काळजीचा विषय असतो पण, काही उपाय केले तर तुम्ही फाटलेले आणि गडद झालेले ओठ पुन्हा गुलाबी आणि आणि मुलायम करू शकता.

ओठ पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्यामागची कारणे समजून घेतली पाहिजेत.

 

lips inmarathi

 

सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणे, कमी प्रतीच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर, चहा-कॉफी यांसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांचे अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, संप्रेरक (हार्मोनल) बदल इत्यादी.

याऐवजी डीहायड्रेशन, चुकीची लाईफस्टाईल, हायपर पिगमेंटेशन, ॲनिमिया ही सुद्धा कारणे आहेत.

जर या घटकांची काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही तुमच्या ओठांचा खरा रंग अबाधित ठेवू शकता पण, याऐवजी ओठांची सतत आणि आणि योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे.

बाजारातील खर्चिक प्रॉडक्ट वापरण्याऐवजी बरेच नैसर्गिक उपचार आहेत ज्यामुळे आपण ओठांना स्वस्थ आणि गुलाबी ओठ बनवू शकतो.

 

उपाय १) लिंबू आणि साखर :

 

lemon sugar inmarathi

 

लिंबू हाय उत्तम विरंजक (ब्लिचिंग एजंट) आहे तर, साखर मृत पेशींना काढण्यासाठी मदत करते. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते ज्यामुळे ओठांचा गडद रंग उजळतो म्हणजेच ओठ गुलाबी होतात.

हा उपाय करण्यासाठी लिंबाची एक फोड कापून घ्यावी आणि त्यावर चिमूटभर साखर पेरावी. ही फोड फक्त दोन ते तीन मिनिट ओठांवर घासावी.

थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल तुमचे ओठ काही प्रमाणात उजळले आहेत. उत्तम परिणामांसाठी हा उपचार तीन दिवसातून एकदा तरी करायला हवा.

 

उपाय २) लिंबू आणि बदामाचे तेल :

 

lemon almond oil inmarathi

 

बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये लिंबू चा वापर केला जातो. याचे कारण म्हणजे लिंबूमध्ये असलेले बरेच औषधी गुण – सायट्रिक ऍसिड, विटामिन्स सी इत्यादी. यामुळे त्वचेच्या संबंधित समस्येवर लिंबू गुणकारी ठरतो.

वर सांगितल्याप्रमाणे लिंबू हा उत्तम विरंजक तर आहेच पण याच बरोबर उन्हामुळे झालेल्या त्वचेचा ह्रास भरून काढण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते.

बदाम तेल ओठांना आर्द्रता मिळवून देतात. त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो. विशेषतः गोडे बदामाचे तेल ओठांना ओलावा प्राप्त करून देते तसेच त्यांचा गडदपणा दूर करते.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीत अर्धा लिंबू पिळून घ्यावा आणि त्यामध्ये हे एक चमचा बदामाचे तेल टाकावे. दोघांनाही संमिश्र करून घ्यावे. मग हे मिश्रण ओठांवर लावून हलक्या हाताने ओठांची मालिश करावी.

उत्तम परिणामांसाठी हे मिश्रण ओठांना रात्रभर लावून ठेवावे. हा उपाय दररोज तीन-चार आठवडे केल्यावर तुम्हाला ओठांमध्ये बदल झालेला जाणवेल.

 

उपाय ३) मध आणि साखर :

 

honey sugar inmarathi

 

ओठांचा गडदपणा कमी करण्यासाठी मध आणि साखर हासुद्धा एक उत्तम उपाय आहे. लिंबू ओठांचा गडद रंग दूर करण्यास मदत तर करतो पण त्यामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिड मुळे त्वचेवर चुरचुर जाणवते.

जर तुम्ही त्वचेला चुरचुर न होणाऱ्या उपायांच्या शोधात असाल तर मध आणि साखर हा एक उत्तम पर्याय आहे.

साखर तुमच्या त्वचेवर साचलेल्या मृतपेशीना काढण्यास मदत करते तर, मध तुमच्या ओठांना ओलावा पुरवतो. त्यामुळे फाटलेले ओठ मधामुळे पूर्ववत होतात. तसेच मध ओठांचा गडदपणा सुद्धा कमी करते.

हा उपाय करण्यासाठी वाटीत एक चमचा साखर घ्यावी. त्यात एक चमचा मध टाकावे. दोघांचे मिश्रण करून घ्यावे आणि हे मिश्रण ओठांवर घासावे. एक मिनिट हलक्या हातांनी ही मालीश करावी.

याचा अजून एक फायदा असा की यामुळे ओठांजवळ रक्त संचरणला चालना मिळते ज्यामुळे ओठ स्वस्थ दिसू लागतात.

थोडा वेळ मालिश केल्यानंतर हे मिश्रण ओठांवर काही मिनिटांसाठी तसेच राहू द्यावे आणि मग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

 

उपाय ४) डाळिंब आणि दूध :

 

pomegranate & milk inmarathi

 

डाळिंबामध्ये हे पुनिक्यालगिन नावाचे संयुग असते. जे मेलनिनची निर्मिती थांबवते. मेलेनिन हा तो घटक आहे ज्यामुळे त्वचेचा गडदपणा वाढतो.

दुधामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन तिला ओलावा मिळतो. त्यामुळे दूध हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे.

हा उपाय करण्यासाठी मूठभर डाळिंबाचे दाणे वाटून घ्यावे आणि मिल्क क्रीम बरोबर याचे मिश्रण करून घ्यावे. हे मिश्रण साधारणतः पंधरा मिनिटे ओठांवर लावून ठेवावे आणि मग धुऊन घ्यावे.

महिनाभर दर दिवशी हा उपाय केल्यावर तुम्हाला ओठांचा रंग गुलाबी झालेला जाणवेल.

 

उपाय ५) बीट :

 

beetroot inmarathi

 

आपणा सर्वांनाच माहित आहे की बीट या कंदमुळाला गडद लाल रंग असतो जे खाल्ल्यावर दात, ओठ आणि हातसुद्धा लाल होतात.

हा उपाय करण्यासाठी एक चमचा बीट रस आणि एक चमचा मध घ्यावे. एक स्वच्छ कापूस घेऊन ओठ सर्वप्रथम पुसून घ्यावे आणि मग बीट आणि मधाच्या मिश्रणाने ओठांवर मालिश करावी.

रात्रभर हे मिश्रण ओठांवर असेच राहू द्यावे. सकाळी तुम्हाला जाणवेल की तुमचे ओठ मुलायम आणि थोड्या प्रमाणात गुलाबी झाले आहेत.

हा उपाय जर तुम्ही आठवडाभर केला तर तुम्हाला नैसर्गिक गोष्टींचा वापर करून गुलाबी ओठ मिळवता येतील.

 

उपाय ६) हळद :

 

turmeric health benefits-inmarathi02

 

हळद ही अशी गोष्ट आहे जी घरात सहजरित्या मिळणारी आहे. आयुर्वेदापासून ते थेट विज्ञानापर्यंत सगळ्यांनी हळदीचे महत्त्व ओळखले आहे. चमचाभर हळद शरीरातील बऱ्याच समस्यांवर लाभकारी आहे.

ओठांचा गडदपणा दूर करण्यासाठीसुद्धा हळदीचा उपयोग होतो कारण, हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि हळद त्वचेतील मेलनिनचे प्रमाणसुद्धा कमी करते.

हा उपाय करण्यासाठी एक चमचा दूध आणि हळदीचे समान प्रमाण घेऊन त्यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण ओठांवर घासावे.

साधारणतः पाच मिनिटापर्यंत हे मिश्रण ओठांवर तसेच राहू द्यावे आणि मग धुऊन घ्यावे. ओठ कोरडे झाल्यानंतर तुमचे आवडते मॉइश्चरायझर ओठांना लावावे.

 

उपाय ७) कोरफड (एलोवेरा) :

 

alovera.jpg inmarathi

 

एका अभ्यासात असे कळले आहे की कोरफडीतीलसंयुगे मेलानिनचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे कोरफडचा उपयोग ओठांचा गडदपणा कमी करण्यासाठी करता येतो.

तसेच फाटलेल्या ओठांना पूर्ववत करते आणि ओठांना ओलावा प्रदान करते त्यामुळे कोरफड हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. बाजारात एलोवेरा जेल अगदी सहजरित्या मिळते.

हा उपाय करण्यासाठी कोरफडीचा अर्क किंवा एलोवेरा जेल ओठांना लावावी. हे पाच मिनिट ओठांवर तसेच राहू द्यावे आणि मग धुऊन घ्यावे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?