' “रडणे” हे सुद्धा एक प्रोफेशन आहे… तुम्हाला ठाऊक नसेल तर हे वाचा! – InMarathi

“रडणे” हे सुद्धा एक प्रोफेशन आहे… तुम्हाला ठाऊक नसेल तर हे वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रडणे ही भावना व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. आपल्याला भावना अनावर झाल्या, एखाद्या गोष्टीमुळे दुःख झाले की आपल्याला रडू फुटते. पण या रडण्याचे पैसे मिळत असतील तर?

हो तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण, प्राचीन काळात बऱ्याच लोकांना फक्त रडण्यासाठी पैसे पुरवले जायचे.

इजिप्त, चीन, अरब आणि आणि पूर्वेकडच्या बऱ्याच संस्कृतीमध्ये रडणे हा व्यवसाय होता.

भारतीय संस्कृतींमध्ये ही अशा पद्धतीचे व्यवसाय होते आणि तुम्हाला हे ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की आजही भारतात अशा काही प्रथा अस्तित्वात आहेत ज्यामध्ये रडण्यासाठी महिलांना बोलावून पैसे पुरवले जातात.

राजस्थानच्या काही भागात रुदाली प्रथा आहे ज्यानुसार काही प्रोफेशनल शोक करणाऱ्या महिलांना अंत्यविधीच्या वेळेस बोलावले जाते. या महिलांना खास तिथे रडण्याचे पैसे मिळतात. यांनाच ‘रुदाली’ म्हटले जाते.

या रूदाली स्त्रिया गंजू, दुसाद तसेच भिल आणि काही अन्य जातीच्या असतात. जसा एखाद्या कंपनीचा किंवा शाळेचा गणवेश ठरलेला असतो तसेच या रूदाली नेहमीच काळया रंगाचे कपडे घालतात.

 

rudali inmarathi

 

काळा रंग यासाठी कारण हा रंग मृत्यू देणाऱ्या यमाचा रंग आहे. १९९३ साली या रूदाली स्त्रियांच्या आयुष्यावर ‘रुदाली’ नावाचा सिनेमा देखील आला होता.

जो सिनेमा कल्पना लाजमीने दिग्दर्शित केला होता आणि यामध्ये रुदाली स्त्रियांच्या आयुष्याचे वर्णन केले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पेशात स्त्रियांचा समावेश का?

कारण पूर्वापार असे समजले जाते की स्त्रिया हळव्या असतात. एखाद्या छोट्याशा गोष्टीनेसुद्धा त्यांचे डोळे भरून येतात. याऐवजी पुरुषांना घराची जबाबदारी असते.

ते आपले रडणे सर्वांसमोर जाहीर करू शकत नाहीत. म्हणून हा पेशा फक्त महिलांशी जोडलेला आहे.

राजस्थानच्या उच्चवर्णीय कुटुंबात मृत्यूप्रसंगी या स्त्रियांना बोलावले जाते आणि कुटुंबियांच्यावतीने या स्त्रिया रडून शोक व्यक्त करतात.

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कोणत्याही कुटुंबात स्वकीयांच्या मृत्यू प्रसंगी त्याचे नातेवाईक रडताना दिसतात मग हे असे का?

राजस्थान मध्ये उच्चवर्णीय कुटुंबातील स्त्रियांना आपल्या भावना गावासमोर किंवा समाजाचा प्रश्न समोर जाहीर करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांच्यावतीने रडण्यासाठी या स्त्रियांना बोलावले जाते.

आता अनोळखी माणसांच्या मृत्यू प्रसंगी रडणे हे तेवढे सोपे न्हवे. मग या स्त्रिया नेमकं करतात तरी काय?

या स्त्रिया अशाप्रसंगी स्वतःच्या आयुष्यातील एखादी जुनी आठवण आठवून रडतात. पण, पूर्वापार चालत आलेला हा पारंपरिक सल्ला नेहमीच उपयोगाचा ठरत नाही.

 

rudali 2 inmarathi

 

त्यावेळी या स्त्रियांनी त्यांचे स्वतःचे टोटके शोधून काढलेले आहे.

कधीकधी या स्त्रिया थुंकी किंवा काही विशिष्ट झाडाचा पाला डोळ्याला लावतात त्यामुळे डोळे पाणावल्यासारखे वाटतात किंवा त्या कोळशासारखाच दिसणारा एका पदार्थ डोळ्याजवळ चोळतात ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊन डोळ्यातून पाणी येते.

या रुदाली स्त्रियांना तीस वर्षांपूर्वी शोकाकुल होऊन मोठमोठ्याने रडण्याचे पाच ते सहा रुपये पुरवले जायचे. त्यांना तांदूळ किंवा कपडे सुद्धा पुरवले जायचे. तर कधी उरलेल्या चपात्या आणि कांदे दिले जायचे.

त्यांचे रडण्याचे काम बारा दिवसांपर्यंत असायचे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या श्रीमंतीनुसार या दिवसांमध्ये वाढ व्हायची. परंतु आता गावागावात साक्षरतेचे प्रमाण वाढलेलं आहे.

लोक शहराकडे पलायन करत आहेत. शिक्षणामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल घडल्यामुळे सध्या लोक शांतपणे अंतिम संस्कार करण्यास प्राधान्य देतात.

त्यामुळे या रुदाली स्त्रियांच महत्व काळाच्या ओघात कमी झालेले आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की रुदाली आता शोधून सापडणार नाही. पण ही प्रथा अजूनही पूर्णपणे लोप पावलेली नाही.

जोधपूरच्या शेरगढात, बाडमेरच्या पाटोदी आणि चितर, कोटडा, चुली, फतेहगड आणि जैसलमेरच्या रामदेवरा आणि पोकरण या भागांमध्ये आजही या रुदाली स्त्रिया आहेत.

 

rudali women inmarathi

 

रुदाली स्त्रियांचा हा पेशा जात, लिंग, आर्थिक विषमता या सर्व सामाजिक समस्यांचे मिश्रण आहे. समाजात खालचा दर्जा असणाऱ्या या स्त्रियांचे उच्चवर्णीय पुरुषांकडून शोषणदेखील होते.

या स्त्रियांना उच्चवर्णीय पुरुषांकडून संतती झालेली सुद्धा आढळली आहे. रुदालीना झालेल्या या मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव सुद्धा लावता येत नाही.

सर्वच रुदाली स्त्रिया विधवा असतात आणि आजही ज्या प्रमाणे विधवेला अशुभ मानण्याचा समज आहे त्याप्रमाणे संपूर्ण समाज त्यांना अशुभ समजतो.

काही विधवा रुदाली स्त्रियांनी समाजाचं आणि पंचांचे ऐकून ‘नाता-प्रथा’ नुसार आपल्याच दिराबरोबर लग्न केले आहे. तर काहींनी विधवा राहण्याचा पर्याय निवडला.

आत्ता जेव्हा समाजात रूदाली स्त्रियांकडे शोक करण्याचे काम त्याप्रमाणात राहिलेले नाही त्यामुळे त्या मजदूरी आणि आणि शेतीची कामे करतात.

नाममात्र मजुरीबरोबर थोडाफार उरलेलं जेवण हीच त्यांची रोजची कमाई आहे. अगदीच कोणी दयावान असेल तर त्यांना जुने कपडे दान केले जातात.

प्रतिबंधित असलेल्या खेजडी आणि रोहिडा ही झाडे कापण्यासाठी वृदाली स्त्रियांना बोलवले जाते आणि थोडाफार मोबदला दिला जातो.

काही गावांमध्ये तर रुदाली स्त्रीयांसाठी कडक नियम बनवला आहे की त्यांनी सकाळी घराबाहेर पडू नये ज्यामुळे त्यांना बघून काही अशुभ घडण्याची प्रासंगिकता गावकऱ्यांना टाळता येईल.

जे खरच निंदनीय आहे. काही ठिकाणी रूदाली स्त्रियांच्या या जीवन राहणीमानात फरक पडलेला आहे. पण, हा पुरेसा नाही. ज्या स्त्रिया रडण्यासाठी जातात. त्यांच्या मरणोप्रांत रडण्यासाठीसुद्धा कोण नसते.

 

rudali dimple inmarathi

 

नवीन रुदालीचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा पेक्षा हळूहळू कमी होत चालला आहे. पण फक्त हा पेशा संपल्याने ही समस्या नाही सुटणार.

सध्या कामाच्या अभावामुळे या रुदाली स्त्रियांची भुकेने मरण्याची वेळ आली आहे. ज्याच्यावर उपाय काढणे गरजेचे आहे. समाजात नीच दर्जा असल्यामुळे या स्त्रियांचे लग्न होण्यात समस्या येत आहे.

या स्त्रिया शिक्षणापासून सुद्धा वंचित आहे. जो बदल घडण्यासाठी या वर्गातील स्त्रियांकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. समाजात हीन असणाऱ्या या रुदाली स्त्रियांना सन्मान मिळण्याची गरज आहे.

दया म्हणून काही कपडे आणि भाकरी या ऐवजी त्यांनाही शिक्षणाचा अधिकार विवाह करण्याचा अधिकार मनास वाटेल ते काम करण्याचा अधिकार मिळणे गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?