' एटीएम कार्डवर असणाऱ्या १६ अंकी नंबरच्या मागे नेमका काय अर्थ आहे – जाणून घेऊया! – InMarathi

एटीएम कार्डवर असणाऱ्या १६ अंकी नंबरच्या मागे नेमका काय अर्थ आहे – जाणून घेऊया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

ज्यांच बँक खातं आहे त्यांच्याकडे ATM तर असणारच. या ATM कार्डवर तपशीलवार सगळी माहिती छापलेली असते. त्याच माहितीमधील एक मोठा नंबर आपलं सगळ्यात पहिलं लक्ष वेधून घेतो.

हा नंबर म्हणजे तुमचा डेबिट/ATM कार्ड नंबर होय. जर तुम्ही कधी डेबिट कार्डने ऑनलाईन व्यवहार केलेत तर हा क्रमांक तुम्हाला आवर्जून विचारला जातो. आता तर या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यामधील शिल्लक देखील माहित करून घेऊ शकता.

पण कधी विचार केलाय का की हा नंबर इतका महत्त्वाचा का आहे?

यामध्ये एवढं काय खास दडलंय?

 

sbi_debit_card-marathipizza00

स्रोत

चला तर, आज जाणून घेऊ या.

हा नंबर १६ आकडी असतो. या १६ आकडी नंबरला आपण चार भागांमध्ये विभागुया, म्हणजे समजावून घेणे सोप्पे जाईल.
या १६ आकड्यांमधला पहिला क्रमांक हे दर्शवतो की हे कार्ड कोणी जारी केले आहे.

या क्रमांकाला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर (MII- Major industry identifier) असे म्हणतात. प्रत्येक इंडस्ट्रीसाठी हा क्रमांक वेगवेगळा असतो.

 

sbi_debit_card-marathipizza01

जसे की,

0- ISO आणि इतर इंडस्ट्री
1- एयरलाइन्स
2- एयरलाइन्स आणि इतर इंडस्ट्री
3- ट्रॅव्हल आणि इंटरटेनमेंट (अमेरिकन एक्सप्रेस किंवा फूड क्लब)
4- बँकिंग आणि फायनान्स (व्हिजा)
5- बैंकिंग आणि फायनान्स (मास्टर कार्ड)
6- बैंकिंग आणि मर्चेंडाइजिंग
7- पेट्रोलियम
8- टेलि कम्युनिकेशन्स आणि इतर इंडस्ट्री
9- नॅशनल असाइनमेंट

तुम्ही तुमच्या कार्डवर पहिला क्रमांक कोणता आहे हे पाहून तुमचं कार्ड कोणत्या श्रेणीतल आहे ते पाहू शकता.

त्यानंतरचे ६ क्रमांक हे दर्शवतात की हे कार्ड कोणत्या कंपनीने जारी केलं आहे. या क्रमांकाला Issuer identification Number(IIN) असे म्हणतात.

 

sbi_debit_card-marathipizza03
जसे की,

अमेरिकन एक्सप्रेस (American Express)- 34XXXX, 37XXXX
व्हिजा (VISA )- 4XXXXX
मास्टर कार्ड (Master Card) – 51XXXX-55XXXX
मॅस्ट्रो (Maestro)- 6XXXXX
डिस्कवर (Discover)- 6XXXXX

म्हणजे जर तुमच्या कार्डवरचा दुसरा आणि तिसरा क्रमांक 51 असेल तर तुमचं कार्ड मास्टर कार्ड तर्फे जारी करण्यात आलं आहे.

त्यानंतरचे शेवटचे ९ क्रमांक तुमच्या बँक खात्याशी निगडीत असतात. पण हे तुमच्या बँक खाते नंबर नसतात तर ज्या कंपनीकडून तुम्हाला कार्ड देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे असणारा हा कार्ड होल्डरचा युनिक खाते क्रमांक असतो. ज्यावरून कार्ड कंपनीला तुमच्याबद्दल, तुमच्या बँक खात्याबद्दल माहिती मिळते.

 

sbi_debit_card-marathipizza04

 

या ९ क्रमांकापैकी सगळ्यात शेवटचा क्रमांक हा चेक डीजीट म्हणून ओळखला जातो. या क्रमांकावरून हे कळते की कार्ड वैध आहे किंवा नाही.

 

sbi_debit_card-marathipizza05

 

काय? आता उलगडला ना या मोठ्ठ्या नंबरमागचा अर्थ, मग शेअर करायला अजिबात विसरू नका!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?