' निवृत्तीनंतर काय करत आहेत हे ८ माजी क्रिकेटपटू? वाचून थक्कच व्हाल!

निवृत्तीनंतर काय करत आहेत हे ८ माजी क्रिकेटपटू? वाचून थक्कच व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणताही बदल accept करणं हे एक आव्हानात्मक काम असतं. काहींना ते लगेच जमतं, काहींना तो बदल मान्य करायला जास्त वेळ लागतो.

तुम्ही एका क्षेत्रात काम करत असतात आणि तुम्हाला ते सोडून नवीन क्षेत्रात जर का काम करावं लागलं तर आधी तुमच्या मनाने तो बदल मान्य करायला हवा. ते नसेल झालेलं तर, काहीच होऊ शकत नाही.

आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि सध्या चर्चेत असलेल्या क्रिकेटचं उदाहरण घेतलं तर लक्षात येईल की, कोणत्या क्रमावर बॅटिंग ला यायचं ही क्रमवारी त्यांच्या आणि आपल्या डोक्यात फिक्स असते.

 

cricket inmarathi

 

त्या प्लेयर च्या खेळात काही बदल दिसला तर आपण (आणि कदाचित तो सुद्धा) लगेच म्हणतो, “ह्याला कशाला वन डाऊन पाठवलं ? हा मधल्या फळीतच चांगला खेळतो.”

ही क्रमवारी त्या बॅट्समन च्या बॅटिंग स्टाईल वरून आणि त्यावेळी बॉलिंग ला असणाऱ्या बॉलर वरून ठरत असते. पण, कुठेतरी त्याच्या डोक्यात त्या जागेचं गणित फिक्स झालेलं असतं.

क्रिकेट म्हणजेच आपलं जीवन हे या लोकांनी मान्य केलेलं असतं. निवृत्त झाल्यावर सुद्धा बरेच क्रिकेटर हे एक तर कॉमेंटेटर होतात किंवा अंपायर किंवा selector होतात.

कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते क्रिकेटशी जोडलेले असतात.

काही क्रिकेटर मात्र निवृत्ती नंतर पूर्णपणे वेगळी वाट निवडतात आणि त्यांचा आणि क्रिकेट चा नंतर काहीच संबंध राहत नाही इतपत ते त्यांची दिशा बदलण्याचं सामर्थ्य ठेवतात आणि त्यात यशस्वी सुद्धा होतात. त्यातील काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात :

 

१. जोगिंदर शर्मा :

 

joginder sharma inmarathi

 

हा तोच बॉलर आहे ज्याला धोनी ने भरवश्याचा बॉलर म्हणून २००७ च्या पहिल्याच ICC २०-२० वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना शेवटची ओव्हर टाकायला सांगितलं होतं.

विश्वास सार्थ ठरवत त्याने शेवटच्या बॉलवर मिसबा-उल-हक ची विकेट घेतली होती आणि आपल्याला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

जोगिंदर शर्मा आज हरियाणा जिल्ह्याच्या कुरुक्षेत्र भागात डेप्युटी सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत आहे. २००७ पासूनच त्यांनी पदभार सांभाळला आहे.

क्रिकेट मध्ये स्थिरावण्याचा त्याने प्रयत्न केला असेलच, पण जेव्हा त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली, त्यांनी ती निवडली.

 

२. ब्रेट ली :

 

brett lee inmarathi

 

ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू भारतीय लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याने जेव्हापासून आशा भोसले सोबत “हा मै तुम्हारा हूं…” हे गाणं गायलं त्यावेळेस पासून तर तो प्रत्येकाच्या ओळखीचा झाला आहे.

क्रिकेट च्या तिन्ही फॉर्मट्स मध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स दिल्यानंतर ब्रेट ली ने २०१५ मध्ये निवृत्तीची घोषणा केली आणि त्याने acting मध्ये करिअर करायचं ठरवलं.

UnIndian या भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये तयार झालेल्या सिनेमात हिरो म्हणून काम केलं होतं.

सिडनी मध्ये शुटिंग झालेला हा सिनेमा २०१६ मध्ये भारतात रिलीज झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

त्यासोबतच, ब्रेट ली ने चॅनल नाईन सोबत कॉमेंट्री साठी करार केला. मायकेल पॅन्क्रीज या लेखकाला त्याने क्रिकेट बद्दल एक कादंबरी लिहिण्यास सुद्धा मदत केली होती.

 

३. नवज्योत सिंग सिद्धू :

 

navjyot singh siddhu inmarathi

 

स्पिनर बॉलर्स साठी नेहमी चिंतेचं कारण असलेला सिद्धू हा भारताचा तडाखेबाज ओपनिंग बॅट्समन होता. क्रिकेट खेळत असताना जितका सिद्धू शांत होता त्याच्या पूर्ण विरुद्ध त्याचं निवृत्ती नंतरचं करिअर बोलकं आहे.

कारण, तो फक्त त्याच्या वाणी मुळेच लोकप्रिय आहे. कॉमेंट्री असो किंवा कपिल शर्मा शो चा जज असो किंवा राजकीय भाषण असो. आपल्या ‘ओ गुरु..’ य स्टाईल ने त्याने लोकांच्या मनात जागा मिळवली आहे.

२००४ मध्ये भाजप कडून लोकसभा लढवल्यानंतर सिद्धू सध्या काँग्रेस मध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.

 

४. अँड्रू फ्लिनटॉफ्फ :

 

anfrew flintoff inmarathi

 

इंग्लंड चा हा क्रिकेटर त्याने भारतात आल्यावर एक सिरीज हरवल्यानंतर मैदानावर काढलेल्या टी शर्ट मुळे खूप फेमस झाला होता.

ज्याचं उत्तर आपल्या भारतीय कॅप्टन सौरव गांगुली ने लॉर्ड्स स्टेडियम वर नेटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर टी शर्ट काढून दिलं होतं हे आपण सगळेच अभिमानाने जाणतो.

क्रिकेट मधून निवृत्त झाल्यानंतर Fintoff ने बॉक्सिंग मध्ये करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने खूप वजन सुद्धा वाढवलं होतं.

२०१२ मध्ये रिचर्ड डॉसन या बॉक्सिंग खेळाडू ला हरवल्यानंतर Flintoff ने बॉक्सिंग ला राम राम ठोकला आणि सध्या तो रियल इस्टेट च्या बिजनेस मध्ये कार्यरत आहे.

 

५. क्रिस क्रेन्स :

 

chris cranes inmarathi

 

न्यूझीलंड चा हा ऑलराउंडर क्रिकेटर हा ९० चा दशकात नुझीलंड क्रिकेट चा महत्वाचा खेळाडू होता. गुडघ्याच्या त्रासामुळे त्याने २००६ मध्ये निवृत्ती ची घोषणा केली आणि त्याच्या आयुष्यात जास्तच टफ होत गेलं आहे.

२०१२ मध्ये IPL चे जनक ललित मोदी यांच्यासोबत झालेल्या संभाषणामुळे ते क्रिस क्रेन्स ला सुद्धा कोर्ट केसेस ला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर त्यातून ते आर्थिक दृष्ट्या खूप मागे पडले.

सध्या ते ऑकलंड महानगर पालिकेमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि त्यासोबतच ते एका बार मध्ये सुद्धा काम करत आहे.

 

६. कर्टली एम्ब्रॉस :

 

curtley ambrose inmarathi

 

आपल्या भेदक गोलंदाजीने बॅट्समन ला पिच वर नाचवणाऱ्या या वेस्ट इंडिज च्या स्टार बॉलर ने ४०० विकेट्स घेऊन घेतल्या होत्या.

निवृत्ती नंतर त्याने आपला गिटार वादनाचा छंद जोपासला आणि आज तो बिग बॅग ड्रेड या बँड सोबत काम करतो. वेस्ट इंडिज च्या प्लेयर मध्ये एक रिदम असल्याचं आपण नेहमीच त्यांच्या विकेट घेतल्या नंतरच्या सेलिब्रेशन मध्ये बघत असतो.

कर्टली एम्ब्रॉस हा सुद्धा सध्या त्याच स्किल्स मुळे इंटरनेट वर त्याच्या गिटार वादन आणि डान्स च्या विडिओ मुळे गाजत आहे.

 

७. इम्रान खान :

 

imran khan inmarathi

 

पाकिस्तान च्या या ऑलराउंडर क्रिकेटर कॅप्टन ने १९९२ मध्ये त्याच्या क्रिकेट टीम ला एकमेव वर्ल्ड कप जिंकण्याचा मान दिला होता.

आपल्या बॉलिंग आणि बॅटिंग मुळे देशात लोकप्रिय असलेल्या इम्रान खान ने राजकारणात उतरुन २०१८ मध्ये जनाधार मिळवला आणि आज तो पाकिस्तान चा पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे.

राजकीय दृष्ट्या बऱ्याच अडचणींना सामोरे जातांना इम्रान खान याला खेळात शिकवण्यात येणाऱ्या संयम आणि खेलभावनेचा फायदा होत असावा हे नक्की.

 

८. दिलीप दोशी :

 

dilip doshi inmarathi

 

लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून टेस्ट टीम मध्ये स्थान मिळणाऱ्या या भारतीय खेळाडूने ३३ मॅच मध्ये ११४ विकेट्स घेतल्या होत्या.

आपल्या फिरकीने प्रसिद्ध असलेल्या दिलीप दोशी यांनी निवृत्ती नंतर आपला फोकस पूर्णपणे फिरवला आता ते ambit ग्रुप चे CEO म्हणून कार्यरत आहेत.

Montblanc पेन हे त्यांचं प्रसिद्ध प्रॉडक्ट आहे. १९९४ मध्ये आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये जॉईन केल्यानंतर सध्या संपूर्ण देशात त्यांचे १७ बुटिक्स आहेत.

हे लोक मनाने कधीच रिटायर्ड होत नाहीत. सतत काही तरी नवीन करत रहावं अशी त्यांची इच्छा आणि त्याला अनुसरून प्रयत्न असते.

रिटायर्डमेंट ला एक पूर्णविराम म्हणून न बघता जर का एक स्वल्पविराम म्हणून बघायला शिकलो तर आपणही आपली दुसरी इनिंग सुद्धा अशीच बहरवू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?