' अबब! 'त्या' केसांचा एवढ्या हजार कोटींचा व्यापार होतो!

अबब! ‘त्या’ केसांचा एवढ्या हजार कोटींचा व्यापार होतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या डोक्यावर नको असलेले केस विशिष्ट प्रकारे कापले, की आपलं सौंदर्य खुलून दिसतं. कापलेले केस कचऱ्यात जातात असं आपल्याला वाटतं. आपण सुंदर होऊन सलून किंवा पार्लरमधून बाहेर पडतो.

डोक्यावरील केस अनेक देवस्थानांमध्ये पैसे, मौल्यवान वस्तू, दागिन्यांप्रमाणेच दान करण्याचीही प्रथा आहे. आंध्रप्रदेशमधील तिरुपती या जगप्रसिद्ध देवस्थानात अनेक वर्षांपासून केशदानाची प्रथा आहे. इथं पुरुष आणि महिलासुद्धा सगळे केस अर्पण करतात.

विशेष म्हणजे गुजरातमधील एका पार्लरमध्ये देखील तुम्ही केस दान करू शकता. अशा सलून, पार्लरमध्ये कापलेले किंवा दान केलेले किंवा देवस्थानात अर्पण केलेले केस हा एक मोठा व्यापार आहे, याबद्दल आपल्यापैकी फारच कमी जणांना माहिती असेल.

या कापलेल्या, दान केलेल्या केसांचा उपयोग हा कॅन्सर पेशंट साठी केला जातो. आपल्याला माहीतच आहे, की कॅन्सर मध्ये रुग्णांवरती केमोथेरपी, रेडिएशन या तंत्राद्वारे उपचार केले जातात, परंतु त्याचे साईड इफेक्ट म्हणजे या रुग्णांचे केस गळून जातात.

अशा सर्व रुग्णांना या केसांपासून तयार केलेल्या विगचा (किंवा गंगावन) उपयोग होतो. महिला रुग्णांना बिना केसाचं समाजात वावरणं नको वाटतं. थोडसं अवघडलेपण येतं. त्या रुग्णांना आपल्या केसांचा उपयोग व्हावा म्हणून काहीजण केस कापतात आणि ते दान करतात.

 

hair cutting inmarathi

 

सुरत मधल्या पार्लर मध्ये जे केस दान केले जातात त्यांचा उपयोगच मुळात त्या रुग्णांसाठी विग बनवण्याकरिता होतो. हे तर एक छोटसं उदाहरण आहे. परंतु या कापलेल्या केसांचा खूप मोठा व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतो.

सध्या जगात भारत आणि चीन हे ते मोठे देश आहेत जिथून केसांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. जगभरातल्या कॅन्सर पेशंटना यापासून दिलासा मिळाला आहे. या केसांवरती प्रक्रिया करून हे केस जगभरात पुरवले जातात.

 

hair cutting inmarathi3

 

याशिवाय नाटक, फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील प्रत्येक व्यक्तिरेखेनुसार केसांचे विग पुरवले जातात. लांब केस दाखवण्यासाठी केसांचे एक्सटेन्शन लावावे लागतात. यासाठी या केसांचा उपयोग होतो.

आता हा केसांचा बिझनेस कधीपासून सुरू झाला?

हे मात्र नक्की माहित नाही. पण १८४० मध्ये फ्रान्स मधल्या एका मासिकात याचा उल्लेख आढळतो. तिथे बाजारामध्ये मुली आपले केस विकायच्या.

१८७३ च्या मासिकांमध्ये त्यावेळेचे उल्लेख आहेत, ज्यामध्ये त्या मुलींचे केस, त्याची क्वालिटी आणि लांबी हे पाहून बोली ठरवली जायची आणि त्या केसांचा लिलाव व्हायचा. म्हणजे तेव्हापासूनच विग वापरात होते, असं म्हणायला हरकत नाही.

पुढे पुढे या केसांच्या विगची मागणी वाढली. मग स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, रशिया इत्यादी देशांमध्ये केसांचा व्यापार सुरू झाला.

केसांचा व्यापार करणारे काहीजण, तर मुलींचे केस पाहून त्यांना ॲडव्हान्स पैसे द्यायचे. दोन-तीन वर्षात त्या मुलीचे केस लांब झाले, की ते कापून घेऊन जायचे.

युरोपमध्ये त्यानंतर बायकांमध्ये हॅट घालण्याची फॅशन आली होती, आणि ती हॅट नीट बसावी याकरिता उच्चभ्रू महिलांना अशा केसांची गरज असायची. म्हणूनच त्यावेळेस हा व्यापार जोरात सुरू झाला.

कित्येक मुलींचे केस गोळा केले जायचे. तरीही केसांची कमतरता युरोपच्या मार्केटात जाणवायला लागली.

मग पुढे जपानमधून केस मागवण्यात येऊ लागले, पण ते युरोपियन लोकांना फारसे पसंत पडेनात. मग सुरू झाला चीन मधल्या केसांचा व्यापार, ज्याला युरोप मध्ये प्रचंड मागणी होती.

 

hair cutting inmarathi4

 

पुढे १९१४ च्या सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले आणि हा केसांचा व्यापार काही काळ थंडावला, पण युद्ध थांबलं तसं परत केसांचा व्यापार परत सुरू झाला.

आता हा व्यापार आशिया खंडातून युरोपमध्ये होऊ लागला. चीन हा केसांचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश झाला.

बीबीसीने या केसांच्या व्यापारावर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. त्यानुसार १९६० पर्यंत चीनचे केस हे जगभरात व्यापारासाठी येत होते. युरोप-अमेरिकेत चीनच्या केसांना प्रचंड मागणी होती.

परंतु १९६० च्या सुमारास अमेरिकेने चीन मधल्या केसांना ‘कम्युनिस्ट हेअर्स’ म्हणून हिणवायला सुरुवात केली.

त्यानंतर चीनमधल्या केसांची मागणी कमी झाली आणि मग केसांचा व्यापार वाढला तो भारतामधून. भारतीय केसांना युरोप आणि अमेरिकेत आता प्रचंड मागणी असते.

 

hair cutting inmarathi2

 

केसांची मागणी वाढली, तसा भारतातही केसांचा व्यापार करण्यावर भर दिला जाऊ लागला. आता भारतामध्ये घरोघरी जाऊन केस जमा केले जातात, मंदिरांमध्ये दान दिलेले केस घेतले जातात, पार्लर मधले केस जमा करून त्यांच्यावर प्रक्रिया करून हे केस विकले जातात.

चेन्नईमध्ये ह्यूमन हेअर फॅक्टरी चालवणाऱ्या के एल किशोर म्हणतात, की त्यांचा हा बिझनेस त्यांच्या पणजोबांच्या काळापासूनच आहे.

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज असताना त्यांच्या न्यायालयातील “जज” साठी पांढऱ्या  केसांच्या विग हवा होता, तो किशोर यांच्या पणजोबांनी बनवून दिला. तेव्हापासून त्यांचा हा बिजनेस सुरु झाला.

भारतात बेंगलोर, चेन्नई या ठिकाणी या केसांवरती प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. बेंगलोर मध्ये हे केस गोळा करणारे लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. जो कचरा ते लोक वेचतात, त्यातून केस वेगळे काढतात.

 

hair cutting inmarathi5

 

काहीजण पार्लरमधून, सलूनमधून केस जमा करतात. त्यातील काहीजण फक्त स्त्रियांचे केस जमा करतात.

स्त्रियांच्या लांब केसांना चांगली किंमत मिळते. कमी लांबीच्या आणि पांढऱ्या केसांना तितकी किंमत मिळत नाही. ते लोक हे केस घरी आणतात त्या केसांचं लांबी प्रमाणे तसंच रंगाप्रमाणे वर्गीकरण करतात.

ते वेगळे केलेले केस दोन-तीन वेळेस स्वच्छ धुऊन घेतात. त्यांना वाळवतात. अशा एक किलो केसांना बेंगलोर मध्ये अडीच ते तीन हजार रुपये मिळतात. या लोकांसाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे.

 

hair cutting inmarathi1

 

हे केस विकणारा माणूस त्याच्या हाताखाली अनेक लोकांना केस गोळा करण्यासाठी कामाला ठेवतो. पण हेच केस परदेशामध्ये ३०००० रुपये किलोने विकले जातात.

तिरुपती देवस्थानात दररोज पाचशे किलो केस दान म्हणून मिळतात. या केसांचा मात्र ऑनलाइन लीलाव होतो. आणि या लिलावामध्ये हेच केस २५ ते ३० हजार रुपये किलोने विकले जातात.

जी कंपनी हे केस विकत घेते, ती या केसांना स्वच्छ करते, धुते, वाळवते त्यांचं लांबी प्रमाणे वर्गीकरण करून त्यांचे गठ्ठे तयार करते आणि मग ते परदेशात विकले जातात.

परदेशात या केसांचे विग बनवले जातात आणि आणि केसांच्या क्वालिटी प्रमाणे त्या विगची किंमत ही कमी जास्त होत जाते.

जगभरातले सेलिब्रिटीज आपल्या केसांनाबरोबर प्रयोग करीत असतात आणि त्यांचं बघून त्यांचे फॅन्स तसा राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच हेअर इंडस्ट्रीला सध्या खूपच चांगले दिवस आलेले आहेत.

 

hair color inmarathi'

 

संपूर्ण जगभरातला जर केसांचा कारभार पाहिला तर तो २२५०० करोड रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. तो २०२३ पर्यंत ७५००० कोटी रुपयांपर्यंत जाईल.

२०१८ मध्ये भारताने २५० कोटी रुपयांचा केसांचा व्यापार केला. २०१४ पासून आत्तापर्यंत या व्यवहारात भारताला ४० टक्के नफा झालेला आहे. विशेष म्हणजे हे केस खरेदी करण्यात चीन सध्या आघाडीवर आहे.

छोटे आणि रफ केस असतात त्यांचा उपयोग स्वाफ्ट टॉईज, उशा, कपडे इत्यादी बनवण्यासाठी वापरले जातात. चीन पाठोपाठ अमेरिका, आफ्रिका आणि युरोपीय देश हे केस खरेदी करतात. चीनमध्ये केस विग बनविण्याचे कारखाने आहेत. तिकडून हे विग जगभर जातात.

आपण दररोज केस विंचरतो आणि कचऱ्यात फेकतो. त्यानंतर या केसांचं काय होतं याची आपल्याला जाणीव नसते. पण या केसांवरती एक प्रचंड मोठा उद्योग जगभर उभा आहे.

आज अनेक लोक असे विग विकत घेतात आणि त्यांना हे माहित नसतं, की हे विग कुठल्या देशातल्या केसांपासून बनलेले आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?