' परदेशी नोकरी सोडून मायदेशी मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या माणसाची कहाणी वाचा! – InMarathi

परदेशी नोकरी सोडून मायदेशी मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या माणसाची कहाणी वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१ जानेवारी १८४८ साली भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. त्याआधी स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता.

आज २०२० पर्यंत देशात बरेच बदल घडले स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला, स्त्री शिक्षणासाठी नवनवीन योजना आल्या पण, खरंच स्त्री शिक्षणाचा अधिकार खरंच देशातल्या तळागाळातल्या मुलीपर्यंत पोहोचला आहे?

उत्तर आहे नाही. आजही भारताच्या स्त्री पुरुष साक्षरता प्रमाणात बरीच तफावत आढळते. आजही भारतातल्या बऱ्याच मुलींना अवेळी शाळा सोडावी लागते.

 

gir in rural inmarathi

 

एकतर त्यांचं कमी वयातच लग्न लावून दिले जाते किंवा पैशांच्या अभावामुळे त्यांचे आई-बाबा घरातील मुलाला शिकवण्याचा निर्णय घेतात.

भारतीय समाजात स्त्रियांना सामोर्‍या जाव्या लागणाऱ्या याच समस्यांमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. समाजाची ही परिस्थिती बघून आपण खरंच फॉरवर्ड झालो आहोत की नाहीत असा सवाल उठतो.

अशा सगळ्या नैराश्य जनक वास्तवातून कोणीतरी उचललेलं बदलाचं पाऊल मनामध्ये नवीन आशा पल्लवित करते. असेच एक पाऊल उचलले उत्तरप्रदेशातील विरेंद्र सिंग यांनी.

विरेंद्र सिंग यांची ‘परदादा परदादी’ शाळा ही गरीब घरातील मुलींना शाळेत हजेरी लावल्यावर दर दिवशी दहा रुपये पगार म्हणून देते.

हे ऐकल्यावर माझ्याप्रमाणे तुम्हालाही त्यांचा हा उपक्रम नक्कीच इंटरेस्टिंग वाटला असेल आणि त्यांच्या उपक्रमाविषयी अजून जाणून घ्यावसं वाटलं असणार.

विरेंद्र सिंग यांची ही शाळा उत्तर प्रदेशातील अनुप शहरमध्ये आहे. वीरेंद्र सिंग यांचे वास्तव्य अमेरिकेत होते.

पण त्यांनी २००० साली डुपोंट साऊथ एशिया या कंपनीच्या मॅनेजिंग डिरेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि आणि मायदेशातल्या मुलींना त्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी कायमचे भारतात परतले.

 

virendra singh inmarathi

 

सध्या ते भारतातच स्थायिक झाले आहेत. विरेंद्र सिंग यांना स्त्रियांच्या सबलीकरण यासाठी हे पाऊल उचलण्यामागे एक विदारक किस्सा आहे.

एके दिवशी अनुप शहरात आले असताना वीरेंद्र सिंग यांनी तेरा वर्षाच्या एका मुलीला बघितले. जिच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते.

याच बरोबर विरेंद्र सिंग यांनी त्या मुलीच्या आई आणि मावशीमध्ये चालत असलेले संभाषण ऐकले ज्यात तिचं आता लग्न झालं पाहिजे अशी त्या मुलीची मावशी तिच्या आईला सांगत होती.

याच प्रसंगानंतर विरेंद्र सिंग यांना त्या मुलीप्रमाणे हजारो मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी एक नवीन पाऊल टाकावेसे वाटले ते म्हणजे वीरेंद्र सिंग यांनी ‘परदादा परदादी इंटर कॉलेज’ या शाळेची स्थापना केली.

जी शाळा समाजातील गरीब मुलींसाठी होती. हे काम तेवढेच खडतर होते विरेंद्र सिंग यांनी शाळेची सुरुवात एका छोट्याश्या इमारतीत केली आणि तेही त्या अनुप शहरात जेथे ८५ टक्के मुली प्राथमिक शिक्षणापासून सुद्धा वंचित होत्या.

जेव्हा या शाळेची सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच वर्षी फक्त ४५ मुलींनी शाळेत प्रवेश घेतला.

गावातील मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी विरेंद्र सिंग यांची शाळा विद्यार्थिनींना मोफत शिक्षण आणि आणि अन्न पुरवू लागले ज्यासाठी ते कोणतेच शुल्क आकारत नसत.

 

pardada pardadi inmarathi

 

नंतर ही शाळा दर दिवशी हजेरी लावणाऱ्या मुलींना पगार म्हणून दहा रुपये देऊ लागली त्यामुळे बरेच पालक त्यांच्या मुलींना शाळेत पाठवू लागले.

हे पैसे मुलींची डिग्री पूर्ण झाल्यावरच मिळतील असा देखील नियम शाळेने काढला कारण त्या पैशाचा वापर पालकांना त्यांच्या सुखासाठी करता येणार नाही आणि मुली उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित होतील.

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी येणाऱ्या मुलींची संख्या फक्त पस्तीस होती तरी आज या शाळेमध्ये उत्तर प्रदेशातील ६२ गावांमधून १४०० हून अधिक मुली शिकत आहेत.

शाळेत शिकणाऱ्या मुलींची निवड त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थिती वरून केली जाते. ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न रुपये तीन हजारापेक्षा कमी आहे अशा मुलींना प्राधान्य दिले जाते.

परदादा परदादी शाळा हल्ली मुलींना वोकेशनल ट्रेनिंग सुद्धा देऊ लागले आहेत ज्या आधारे शिक्षणानंतर मुलींना उत्तम नोकरी मिळवता येईल.

याऐवजी शाळा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस, कॉम्प्युटर ट्रेनिंग, कॉन्फिडन्स बिल्डिंग सेशन्स, ड्रामा आणि बऱ्याच सुविधा उपलब्ध करते.

ज्यामुळे शाळेत शिकणाऱ्या हजारो मुलींना भविष्यात त्यांच्या पायावर भक्कमपणे उभे राहता येईल. आत्तापर्यंत १५० मुलींना वोकेशनल ट्रेनिंग आणि स्किल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा फायदा झालेला आहे.

 

girls school inmarathi

 

या शाळेची स्तुती करावी अशी तिची अजून एक कामगिरी म्हणजे ही शाळा उत्तर प्रदेशातल्या गावात जाऊन महिलांना स्वच्छतेची जाणीव करून देते.

एवढेच नव्हे तर, महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स कमी दरात उपलब्ध करून देते आणि आणि त्यांचे हेल्थ चेकअप सुद्धा करते.

शाळेत ७० टक्के हजेरी लावणाऱ्या मुलींच्या घरी शौचालयाची निर्मिती करण्याच्या उपक्रमामुळे या शाळेची बरीच चर्चा झाली.

शाळेने इंटर लोनिंग हा उपक्रम राबवला ज्याअंतर्गत गावातील महिलांना दर दिवशी दहा रुपये साठवण्यासाठी प्रेरित करतात आणि हे पैसे त्यांना इतर महिलांना उधार म्हणून देण्यास सांगतात.

ज्यावर त्यांना थोड्या कालावधीनंतर थोड्या व्याजासकट ते पैसे परत मिळतात. शाळेच्या या उपक्रमामध्ये पन्नास गावातील २०० हून अधिक महिला सामील आहेत.

या उपक्रमामागचा उद्देश एवढाच की महिलांना कुणाचाही आधार न घेता सक्षमपणे जगता यावे.

परदादा परदादी शाळेच्या चार भिंतीत सुरू झालेल्या या उपक्रमाने उत्तर प्रदेशातील शेकडो गावातील मुलींच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे ज्यामुळे त्यांना नवी झेप घेण्यास मदत होणार आहे.

 

PPES inmarathi

 

भारताची स्त्री पुरुष साक्षरतेत असलेली तफावत निराशाजनक जरी असली तरी विक्रम सिंग यांचे हे पाऊल समाजातील असंख्य जना मनांमध्ये उमेद निर्माण करणारे नव्हे पण प्रेरणा देणारे सुद्धा ठरेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?