' भारतीय जलपरी – जिला भारत विसरला, पण गुगलने लक्षात ठेवलं! – InMarathi

भारतीय जलपरी – जिला भारत विसरला, पण गुगलने लक्षात ठेवलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘पिकतं तिथे विकत नाही’ हे एक जुनी म्हण आहे. भारतीय लोकांसाठीच ही म्हण तयार झाली असावी असं बऱ्याच वेळेस वाटतं.

सध्या गाजत असलेल्या क्रिकेटचं उदाहरण घेतलं तरी लक्षात येईल, की एक काळ असा होता जेव्हा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम ला फक्त विदेशातील व्यक्तीच कोच म्हणून लागते असं जवळपास सिद्ध झालं होतं.

आपल्या वापरातील गोष्टी जसं की पर्फ्युम्स, कार वगैरे गोष्टी ह्या इम्पोर्टेड असल्या, तर चांगल्या हे मानणारा एक वर्ग आजही आहे.

सध्या सोशल मीडिया वर गाजत असलेलं crush चॅलेंज जर का बघत असाल, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजी चेहरेच जास्त बघायला मिळतील. कारण, एकच. आपल्याला परकीय गोष्टींचं असलेलं आकर्षण आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टींबद्दलची एक उदासीनता.

या गोष्टींचा प्रत्यय तुम्हालाही येईल… हे वाचा.

कोण आरती सहा? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. कारण, अशा खेळाडूंना ना आपण ओळखतो, ना मीडिया मध्ये कधी त्यांच्याबद्दल भरभरून लिहितो किंवा चर्चा करतो.

 

aarati saha inmarathi

 

क्रिकेटची एक मॅच असली, की आधी दोन तास आणि नंतर एक तास चर्चा करणाऱ्या आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला कधी आरती सहा यांच्यासारखी स्वीमरची कामगिरी दिसत नाही, ज्यांनी १९५९ साली इंग्लिश खाडी पोहण्याचा विश्वविक्रम नोंदवला होता.

६७.५ किलोमीटरचं हे अंतर आरती सहा यांनी १६ तास आणि २० मिनिटात पूर्ण केलं होतं. इंग्लिश खाडी पार केल्यानंतर आरती सहा यांनी भारतीय झेंडा तिथे फडकवला होता आणि त्यांच्या या कामगिरी बद्दल जगाला सांगितलं होतं.

भारतातील लोकांना जरी या कामगिरीचा विसर पडला असेल, तरीही गुगलने आरती सहा यांच्या नावाचा ‘डुडल’ तयार करून त्यांच्या वाढदिवसाची आठवण भारतीयांना करून दिली.

 

aarati saha inmarathi1

 

काल, म्हणजेच २४ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस!

आरती सहा या इंग्लिश खाडी पोहणाऱ्या आशियातील पहिल्या महिला क्रीडापटू आहेत. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलं होतं. आरती सहा यांना त्यांच्या या योगदानासाठी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला आहे.
१९९९ मध्ये भारतीय पोस्टने आरती सहा यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्या नावाचं ३ रुपयांचं पोस्टाचं तिकीट सुद्धा प्रकाशित केलं होतं.

 

aarati saha inmarathi2

 

इंग्लिश खाडी पोहणे फक्त हाच आरती सहा यांनी केलेला विक्रम नव्हता, तर त्यांनी १९५२ मध्ये त्यांनी समर ऑलम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं.

२४ सप्टेंबर १९४० रोजी आरती सहा यांचा कोलकता येथे जन्म झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षापासून आरती सहा या स्विमिंग करत होत्या.

सचिन नाग या भारतीय स्विमिंग खेळाडूने त्यांचं टॅलेंट लक्षात घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात स्थान मिळण्यासाठी प्रयत्न केला होता.

आरती सहा या मिहीर सेन या भारतीय लॉंग डिस्टन्स स्वीमर कडून प्रेरित झाल्या होत्या, ज्यांनी इंग्लिश खाडी सर्वप्रथम १९५८ मध्ये १४ तास ४५ मिनिटात पार केली होती.

मिहीर सेन यांनी १९६६ मध्ये एकाच वर्षात पाच समुद्र पोहोण्याचा विक्रम नोंदवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं होतं.

आरती सहा यांचा हा प्रवास फ्रांस ते इंग्लंड इतकं अंतर पोहोण्याचा होता. जर का गिर्यारोहकांसोबत तुलना केली तर हा पराक्रम म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर करण्यासारखा आहे.

 

aarati saha inmarathi3

वयाच्या ५ व्या वर्षी आरती सहा यांना पहिलं सुवर्णपदक मिळालं होतं. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी १९५२ मध्ये फिनलँड मध्ये झालेल्या ऑलम्पिक

मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी इंग्लिश खाडी पोहण्याचा पहिला प्रयत्न केला होता जो की अयशस्वी ठरला होता. पण, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि अवघ्या एकाच महिन्याने परत प्रयत्न करून त्यांनी या जागतिक विक्रमाची नोंद केली होती.

१९६० मध्ये आरती सहा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

 

aarati saha inmarathi4

 

आरती सहा या निवृत्ती नंतर बंगाल नागपूर रेल्वे मध्ये नोकरी करत होत्या. १९९४ मध्ये कोलकता मध्ये एका खाजगी रुग्णालयात १९ दिवस कावीळ या आजाराशी लढा दिल्यानंतर वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

आरती सहा यांचा जीवनप्रवास प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणार आहे.

आम्हाला या क्रीडापटू बद्दल माहिती घ्यायला भाग पाडल्या बद्दल गुगल चे खूप खूप आभार.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?