' लो बीपीच्या त्रासावर मात करण्यासाठी हे ८ रामबाण उपाय नक्कीच करून बघा!

लो बीपीच्या त्रासावर मात करण्यासाठी हे ८ रामबाण उपाय नक्कीच करून बघा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादी धक्कादायक घटना घडली की, आपण सहज बोलून जातो ‘बी पी हाय झालं म्हणून, म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की गोष्ट जीवावर बेतण्याइतकी भयंकर अथवा वाईट होती.

पण तुम्हाला माहितीये की, वरील वाक्यातून सूचित होणारा धोका म्हणजे ठराविक मर्यादेच्या पलीकडे बी पी हाय होणं/ रक्तदाब वाढणं हे जेवढं मानवी शरीरासाठी घातक आहे.

तेवढंच त्या ठराविक मर्यादेपेक्षा रक्तदाब कमी होणं म्हणजेच बी पी लो होणं हे देखील तितकंच घातक आहे.

कमी रक्तदाबाचा त्रास असणारे हे उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांच्या तुलनेत संख्येने फारच कमी असल्याने बहुतेकांना ह्या बद्दल विशेष माहिती नसते.

 

blood pressure inmarathi

 

अशावेळी असला काही त्रास असल्यास वेळीच नीट चेकअप केल्याने आजाराचे निदान होऊ शकते.

आपला रक्तदाब ८० ते १२० असेल तर तो नॉर्मल मानला जातो, ह्यापेक्षा जास्त किंवा कमी असणे ह्या दोन्ही केस मध्ये आपल्याला सावध होऊन काळजी घेणं आवश्यक आहे.

मळमळ, चक्कर, थकवा येणे ही कमी रक्तदाबाचा त्रास असण्याची प्रमुख लक्षणे मानली जातात, ह्यातील लक्षणे आढल्यास त्वरित तपासणी करून घेणे हिताचे ठरते.

तर आज आम्ही कमी रक्तदाबाचा त्रास असल्यास आहारात बदल करून रक्तदाब नियंत्रित कसा ठेवता किंवा अचानक असा त्रास झाल्यास कोणते पदार्थ तुम्हाला घेता येतील येईल ह्याबद्दल अतिषय उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत.

ज्यातून तुम्हाला अशा गरजेच्या वेळी आपण काय करून संकट टाळू शकतो शकतो ह्याची कल्पना येईल.

साधारणतः जेंव्हा आपल्याला कमी रक्त दाब असल्याचा त्रास असण्याचं निदान होतं तेंव्हा आपले डॉक्टर त्यासाठी जे उपचार देतील ते घेणं आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणं हे खूप महत्वाचे आहे.

शिवाय आहारात केलेले बदलही तुम्हाला रक्तदाब कमी होण्यापासून वाचण्यासाठी, रक्तदाब योग्य पातळीत राखण्यासाठी मोलाची मदत करू शकतात.

एकाच वेळी पोटभर जेवण्या ऐवजी दिवसभरात ठराविक अंतराने थोडं थोडं खा.

 

hungry guy inmarathi

 

अनेकांना भरपूर जेवण झालं की चक्कर येते कारण जेवणानंतर शरीराची सिस्टीम खाल्लेलं पचवण्यासाठी वेगाने कामाला लागते त्या दरम्यान रक्तदाबावर परिणाम होतो.

अशावेळी नेटकं खाल्ल्याने पोटावर अतिरिक्त ताण येत नाही आणि रक्तदाब नियंत्रित रहायला मदत होते.

तुम्ही जर दिवसातून तीनदा जेवत असाल तर हेच खाणं तुमची पाच भागात वाटून घेतल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो, ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी तर अशाप्रकारे थोडं थोडं खाणं अतिषय उत्तम आहे.

आहारात योग्य प्रमाणात मिठाचा वापर करा. जास्त प्रमाणात मीठ खाणं हे शरीरासाठी हानिकारक आहे.

परंतु योग्य प्रमाणात आहारात मिठाचा समावेश असणे आवश्यक आहे, रोजच्या भाज्या, फळं ह्यातून मिळणाऱ्या घटकांसोबतच चमचाभर मीठ देखील आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.

उन्हाळ्यात किंवा व्यायाम करताना लिंबू मीठ पाणी घेणे फायद्याचे ठरते.

रोज २ ते ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे, शिवाय पन्हे, बेलाचे सरबत किंवा नारळपाणी ह्याचाही आपल्या आहारात समावेश करायला हवा.

शरीरातील पाण्याची कमतरता ही रक्तदाब कमी होण्याची प्रमुख करणांपैकी एक आहे. आणि आणि वर सांगितलेली पेये शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत करतात.

 

water inmarathi

 

चहा आणि कॉफी ह्यातील कॅफिन नामक तरतरी आणणारा घटक आपला रक्तदाब त्वरित वर आणण्यास मदत करते, त्यामुळे रक्तदाब कमी झाल्यास एक कप कॉफी किंवा चहाचे सेवन उपयुक्त ठरू शकते.

रोज तुळशीची पाने खाणे. तुळस इतर अनेक बाबतीत बहुगुणी काहे हे तर आपण सगळे जाणतोच. पण कमी रक्त दाबाचा त्रास असलेल्यांनाही तुळस खाल्ल्याने फायदा होतो.

तुळशीच्या पानांत पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

शिवाय त्यात युजेनॉल नामक अँटिऑक्सिडेंट असते हे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

बदामाचे दूध हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते, बदामात ओमेगा – ३  सारखे शरीरासाठी आवश्यक असणारे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

 

badam dudh inmarathi

 

पाच ते सहा बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला, सकाळी हे बदाम सोलून, त्याची पेस्ट करून पाण्यात किंवा जे पेय तुम्ही घेता त्यात घालून उकळवून घ्या.

तुळस आणि बदाम ह्याप्रमाणे बेदाणे देखील बहुगुणी आहेत, कमी रक्तदाबाचा त्रास असल्यास, बेदाणे रात्रभर भिजत घालून सकाळी हे भिजलेले बेदाणे दुधात उकळवून ते दूध प्या.

ह्यामुळे रक्ताभिसरण नीट व्हायला मदत होते, किंवा दुधात नको असल्यास, आपण भिजलेल्या मनुका आपल्या नाश्त्यात देखील खाऊ शकता.

जर आपले वजन जास्त असेल तर आपल्याला इतर अनेक समस्यांबरोबरच ही रक्तदाबाची समस्या मोफत मिळालेली असते.

ह्यासाठी तुमच्या गरजेनुसार नियमित आणि पौष्टिक आहार घ्या, वजन वाढवण्यास कारणीभूत ठरणारे घटक आहारातून काढून टाका, बाहेरचे खाणे शक्यतोवर टाळा आणि नियमित व्यायामाला प्राधान्य द्या.

 

fitness inmarathi

 

हे नियम पाळल्यास तुम्हाला स्वतःमध्ये झालेला सकरात्मक बदल लवकरच दिसून येईल.

तर, आज आपण आहारात बदल करून आपण आपला रक्तदाब कसा नियंत्रित करू शकतो ही माहिती पाहिलीत. ह्यातून नक्कीच तुम्हाला मदत होईल अशी आशा आहे.

आपल्या आप्त स्वकीयांमध्ये ही माहिती आवर्जून शेयर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहितीची मदत होईल, आणि त्यांनाही आपला आजार ताब्यात ठेवून जगण्याचा भरभरून आनंद घेता येईल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?