' सर्वात स्वस्त पण शरीरासाठी उपयुक्त अशा केळ्याचे हे १० मौल्यवान फायदे जाणून घ्या!

सर्वात स्वस्त पण शरीरासाठी उपयुक्त अशा केळ्याचे हे १० मौल्यवान फायदे जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

केळे हे अत्यंत सकस आणि चविष्ट फळ आहे. ऊर्जेचा उत्तम स्त्रोत असलेलं हे फळ जगाच्या पाठीवर कुठेही मिळेल तेही एकदम स्वस्त दरात!

आयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे. या फळाला आपण आपल्या आहारात सामील केले तर शरीराला बरेच फायदे होतात.

केळ्यापासून शरीराला नक्की कोण कोणते फायदे होतात हे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

१. न्यूट्रिशनयुक्त फळ :

 

banana inmarathi

 

केळ्यामध्ये बरेच न्यूट्रिशन आढळतात फायबर्स आणि १०५ कॅलरीज युक्त आहारास पूर्णत्व देणार हे फळ आहे.

केळ्यामध्ये पोट्याशियम ९% विटामिन बी सिक्स ३३ %, विटामिन सी ११%, मॅग्नेशिअम 8%, कॉपर १०%, मॅंगनीज १४ %, स्टार्च २४ ग्राम, फायबर ३.१ ग्राम आढळतात.

कच्च्या केळ्यामध्ये स्टार्च आणि रेझिस्टंट स्टार्च आढळून येतात तर पिकलेल्या केळ्यामध्ये या स्टार्चचे रूपांतर शर्करेत म्हणजेच साखरेत होते.

===

हे ही वाचा नैराश्य, बॅड-मुड मधून बाहेर येण्यासाठी हे मस्त खाद्यपदार्थ खा आणि आनंदी राहा!

===

२. फायबरची उत्तम मात्रा :

 

fibre in banana

 

फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ. हे तंतुमय पदार्थ पाचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. एका मध्यम आकाराच्या केळ्यात तीन ग्राम पर्यंत फायबर आढळतात.

केळ्यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे फायबर आढळतात ते म्हणजे पेक्टिन आणि रेझिस्टंट स्टार्च.

रेजिस्टन्स स्टार्च ही पाचन क्रिया सहज बनवतात तर, काही टेस्टट्यूब स्टडीजमध्ये सिद्ध झाले आहे की पेक्टिन चा उपयोग कोलोन कॅन्सर विरुद्ध लढा देण्यासाठी होतो.

केळ्यामध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात. विद्राव्य म्हणजे विरघळणारे. हे विद्राव्य फायबर पाचन क्रिया संथ करतात.

त्यामुळे केळे खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट गच्च भरल्या सारखं वाटतं. त्यामुळे सकाळच्या न्याहारीत आपण केळ्याचे सेवन केलं तर खूप वेळ काही खाण्याची गरज भासणार नाही.

 

३. हृदय विकारांवर गुणकारक :

 

banana heart inmarathi

 

केळ्यामध्ये फायबर्स आढळतात. फायबरयुक्त पदार्थांचा अजून एक फायदा असा की हे स्वस्थ हृदयासाठी उपयुक्त असतात. फायबरमुळे कार्डीवेस्टीक्युलर आजारांची तसेच कोरोनरी हृदय विकाराची बाधा टळते.

एका स्वस्थ हृदयासाठी अजून एक महत्वाचा घटक म्हणजे पोटॅशियम.

हा घटक मुख्यत्वे ब्लडप्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो आणि जे लोक मुबलक प्रमाणात पोटॅशियम सेवन करतात त्यांची २७ % पर्यंत हृदय विकारांनी बाधित होण्याची शक्यता टळते.

केळ्यामध्ये पोटॅशियम ही भरपूर प्रमाणात आढळतो.

केळ्यामध्ये आढळणारा अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशिअम सुद्धा हृदयाच्या प्रकृतीसाठी गुणकारक असतात.

 

४. ॲनिमिया :

 

anemia inmarathi

 

ॲनिमिया म्हणजे तो आजार ज्यामध्ये शरीरातल्या लाल रक्तपेशींची किंवा रक्तामधल्या हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते. ज्यामुळे थकवा आणि निस्तेजपणा येऊ लागतो.

या आजारावर मात करण्यासाठी शरीरांमध्ये आयर्न योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे.  जे आपल्याला दररोज केळ्याच्या सेवनाने साध्य करता येऊ शकते.

 

५. एंटीऑक्सीडेंटचा स्त्रोत :

 

banana eating inmarathi

 

फळं आणि भाज्या हे उत्तम एंटीऑक्सीडेंटचे स्त्रोत असतात आणि हाच गुण केळ्यामध्ये सुद्धा आढळतो.

केळ्यामध्ये बर्‍याच प्रकारचे प्रभावी एंटीऑक्सीडेंट आढळतात. त्यामध्ये डोपामाइन आणि आणि केटचीन चा समावेश होतो. हे अँटिऑक्सिडंट हृदय विकारांवर सुद्धा प्रभावशाली असतात.

===

हे ही वाचा घरात “आरोग्यास लाभदायक” म्हणून आवर्जून असणाऱ्या या गोष्टी घातक ठरू शकतात

===

६. इन्सुलिन विरोधक :

 

insulin inmarathi

 

इन्सुलिन विरोधक (I R) यांचा वापर जगभरात टाईप-२ डायबिटीज विरोधात लढा देण्यासाठी केला जातो. १५ ते ३० ग्राम प्रतिकार स्टार्च ३३ % ते ५० % पर्यंत इन्सुलिन संवेदनशीलता वाढवू शकतात. तेही तब्बल चार आठवड्यांमध्ये.

कच्चे केळे हे प्रतिकारक स्टार्चचा उत्तम स्त्रोत आहे म्हणून; त्याच्यामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढून टाईप-2 डायबिटीज वर मात करता येते.

परंतु अद्यापही यावर पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे केळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवू शकते हा आजही संशोधनाचा विषय आहे.

 

७. किडनीसाठी फायदेशीर :

 

kidney pain

 

केळ्यामध्ये आढळणारा पोटॅशियम हा घटक ज्याप्रमाणे रक्तदाबावर उपयुक्त आहे त्याचप्रमाणे किडनीसाठी सुद्धा फायदेशीर आहे.

एका १३ वर्षाच्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की ज्या महिलांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केळ्याचे सेवन केले त्यांचा ३० % किडनी विकारांचा धोका टळला.

तर एका दुसऱ्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या महिलांनी आठवड्यातून चार ते सहा वेळा केळ्याचे सेवन केले त्यांना ५० % किडनी विकाराचा धोका टाळता आला.

 

८. विटामिन-सी :

 

banana inmarathi

 

केळ्यामध्ये हे मुबलक प्रमाणात नाही पण विटामिन सी ची मात्रा सुद्धा आढळून आली आहे. एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये जवळजवळ दहा टक्के विटामिन सी उपलब्ध असते.

विटामिन-सी शरीरास होणाऱ्या पेशींच्या ह्रासावर आळा घालतो. विटामिन-सी शरीरास आयर्न शोषून घेण्यास मदत होते.

सेरोटोनिन हार्मोनची निर्मिती करण्यास मदत करतो जो हार्मोन तणाव, झोप यांना नियंत्रित करून आपल्या मनस्थिती शांत ठेवण्यास मदत करत असतो.

 

९. त्वचेसाठी गुणकारक :

 

banana good for skin inmarathi

 

केळ्यामध्ये १३ % मॅंगनीज उपलब्ध असते.

मँगनीज त्वचेसाठी अत्यंत गुणकारक असतो कारण तो कोळेगाव नावाच्या हार्मोन ची निर्मिती प्रक्रियेत मदत करतो आणि त्वचेच्या आणि पेशींच्या होणाऱ्या त्रासापासून पासून बचाव करतो.

१०. कोलेस्ट्रॉल आणि स्निग्ध विरहित ऊर्जेचे भंडार :

केळ्यामध्ये तीन नैसर्गिक शर्करा आढळून येतात – सुक्रोज फ्रुक्टोज आणि ग्लुकोज. ज्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.

केळे हे कोलेस्ट्रॉल आणि स्निग्ध (फॅट्स) विरहित असते. त्यामुळे ते कोणत्याही खेळाडूसाठी, लहान मुलांसाठी एक सकस न्ह्याहरी होईल.

===

हे ही वाचा ब्रेकफास्टमध्ये हे पदार्थ खाल्लेत तर तुमच्या पचनसंस्थेला होईल जबरदस्त फायदा

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?