' शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या घोटाळ्यामागचं सत्य उघडकीस आणणारा हा सिनेमा चुकवू नका! – InMarathi

शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या घोटाळ्यामागचं सत्य उघडकीस आणणारा हा सिनेमा चुकवू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमातला इंजीनियरिंग कॉलेजचा डीन आठवतोय का?

तोच तो जो म्हणतो ना “राजकारणात टिकून राहायचं असेल तर पैसा ओतायला लागतो, आणि त्यासाठी आहेत ना शिक्षण संस्था कॉलेजेस!”

पण हे सिनेमापुरतं मर्यादित नसून ही सत्यपरिस्थिती आहे.

आणि ही सत्य परिस्थिती आणखीन विस्तृतपणे आणि निर्भीडपणे मांडून सांगितली आहे ती ‘हलाहल’ ह्या सिनेमात.

 

halahal inmarathi

 

सध्या लॉकडाऊन असल्याने बरेच उत्तमोत्तम सिनेमे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर रिलीज होतायत त्यापैकीच एक हा सिनेमा. एरॉस नाऊ ह्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

राजकारणानंतर सर्वात जास्त प्रोफिटेबल बिझनेस कोणता असेल तर तो एज्युकेशन.

होय हाच तो देश जिथे फुले, आंबेडकर, राजाराम मोहन रॉय, आनंदीबाई, रमाबाई रानडे, टिळक, आगरकर अशा कित्येकांनी लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून द्यायला जीवाचं रान केलं.

आज त्याच देशात ह्या शिक्षणाकडे प्रोफिटेबल बिझनेस म्हणून पाहिलं जातं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि नेमक्या ह्याच गोष्टीवर हा सिनेमा भाष्य करतो!

मुख्यत्वे हा सिनेमा फोकस करतो ते म्हणचे व्यापम घोटाळ्यावर. हा घोटाळा काही साधा सुधा घोटाळा नव्हता.

२०१३ साली उत्तर भारताजवळ भोपाळ इथल्या ‘मध्य प्रदेश प्रोफेशनल एगझामीनेशन बोर्ड’ च्या अंतर्गत हा घोटाळा झाला.

कोणत्याही प्रोफेशनल एंट्रन्स परीक्षेच्या वेळेस होणारे घोटाळे, फुटणारे पेपर, परीक्षेला बसवले जाणारे डमी विद्यार्थी, आणि ह्या सगळ्याच्या मागे काम करणार एक मोठं रॅकेट.

 

vyapam inmarathi

 

यामध्ये सामील असलेले बरेच मोठे पोलिटिकल लिडर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा आणि ह्या सगळ्यात ‘अपघाती मृत्यू’ या नावाखाली खाली मारले गेलेले बरेच स्टुडंट्स तसेच सरकारी माणसं.

हे सगळं ह्या सिनेमातून खूप बारकाईने मांडायचा प्रयत्न केला आहे!

खरंतर हा घोटाळा तसा बराच मोठा होता आणि एकंदरच हे रॅकेट फार मोठं असल्याने ही केस सीबीआय कडे सुद्धा गेली होती.

शिवाय ह्या केस मध्ये सुद्धा सीबीआय ने बऱ्याच लोकांना गजाआड केलं होतं, पण इतर घोटाळ्यांप्रमाणे ह्याची इतकी बातमी झाली नाही का होऊ दिली गेली नाही हे एक न उलगडलेलं कोडंच आहे.

पण आज ह्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना हे कळेल की आपण फक्त बॉलिवूड ड्रग्स आणि आत्महत्या यावरून जरा लक्ष विचलित केलं तर आणखीनही बरेच प्रॉब्लेम्स देशात आहेत ते आपल्याला दिसतील.

फक्त बॉलिवूड फिल्मइंडस्ट्री, ड्रग मार्केटच नव्हे तर ह्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा ह्या माफिया लोकांची चलती आहे.

आज हजारो करोडो मुलं मेडिकल इंजिनियरिंग च्या एन्ट्रन्स परीक्षा देतात पण प्रत्येकाला जागा मिळतेच का? मग अशा मुलांसाठी पैसा हेच मेरिट बनतं.

 

medical entrance inmarathi

 

आणि हे सगळं सरकारी यंत्रणा, कोचिंग, कॉलेजेस यांच्या आत खूप खोलवर रुतून बसलंय सगळं, खूप मोठं दुकान आहे हे!

आणि ह्या सगळ्याचा मुखवटा फाडायचं काम हा सिनेमा अगदी पद्धतशीरपणे करतो.

बघायला गेलं तर ही एक मर्डर मिस्ट्री फिल्म आहे पण सिनेमातला एक अन एक डायलॉग आणि त्यातली कथा काही न काहीतरी स्टेटमेंट करू पाहतेय!

एका डॉक्टरच्या अत्यंत हुशार आणि मेडिकल स्टुडंट्स ना शिकवणाऱ्या तरुण मुलीची जळलेली डेडबॉडी हायवे वर सापडते.

आणि पोलीस पंचनाम्याची वाट न बघता सरळसोट आत्महत्या म्हणून जाहीर करतात आणि ते काही तिच्या बापाला पचत नाही.

हळू हळू अशा अपघाताच्या आणखीन बऱ्याच केसेस समोर यायला लागतात. आपली मुलगी कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडली असल्याची सल त्याच्या मनाला बोचत असते.

आणि मग त्याला हळू हळू समजत जातं की ह्या सगळ्या गोष्टी दिसतात तितक्या सरळ नाहीत, ह्यामागे काहीतरी भयानक भीषण प्रकार शिजतोय आणि ह्याची माहिती सगळ्यांना आहे.

आता तो डॉक्टर या सगळयाचा छडा लावायचा चंग बांधतो, ह्यात त्याला एक लोकल पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा मदत करतो.

 

barun sobti inmarathi

 

प्रचंड मेहनतीने आणि जीवघेण्या समस्यांना तोंड देत हे दोघे ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावतात खरा.

पण शेवट जे काही होतं ते आपल्याला एक विचार करायला भाग पाडतं की खरंच पैसा इतका महत्वाचा आहे का? आणि हीच सत्यपरिस्थिती हा सिनेमा आपल्यासमोर मांडतो.

आपण भलेही सगळं उत्तम चाललं आहे असं म्हणून त्याकडे कानाडोळा करतो पण आपल्यालाही ह्या अशा घटनांची सवय झालेली असते.

आणि ह्या सिनेमाचा नेमका असा शेवट तुम्हाला नक्कीच सुन्न करून जाईल!

रणदीप झा ह्यांचं अस्वस्थ करणारं दिग्दर्शन, गॅंग्स ऑफ वासेपुर ची कथा लिहिणारा झिशान कादरी ह्याचं अत्यंत बोचरे पण सत्य मांडणारे संवाद तुमच्यावर वेगळाच प्रभाव टाकतात!

 त्या भयाण वास्तवात घेऊन जाणारी सिनेमॅटोग्राफी, अगदी तितकंच डार्क आणि समर्पक बॅकग्राऊंड म्युझिक हे समोरचं नाटय आणखीन गडद करतं!

बरूण सोबती (टेलीव्हिजन तसेच असुर ह्या सिरीज मध्ये काम करणारा) आणि सचिन खेडेकर ह्यांचा अत्यंत रॉ आणि थक्क करणारा अभिनय बघून ह्या सिनेमातलं वास्तव आणखीनच अंगावर येतं.

 

sachin khedekar inmarathi

 

ह्या सिनेमाची टॅगलाईन ‘सुसाईड ऑर मर्डर’ यावरून तुम्हाला सध्याच्या परिस्थितीची आठवण होईल.

पण एकंदरच शिक्षण क्षेत्रातल्या एका भयानक घोटाळ्याविषयी परखडपणे बोललं गेलं हे काय कमी आहे.

लॉकडाऊन काळ आणि प्रमोशनच्या बाबतीत असलेली अरसिकता यामुळे हा सिनेमा किती लोकांपर्यंत पोहोचेल ही एक शंका आहेच.

पण एकदातरी हा सिनेमा अनुभवाच. कित्येक समाजसुधारकांनी आपल्या देशातल्या शिक्षण क्षेत्राला उच्च दर्जा मिळवून दिला.

 

samaj sudharak inmarathi

 

त्याच शिक्षण क्षेत्रात होणारे इतके भयानक घोटाळे पाहून ह्यात काहीच शंका नाही की आपल्याइथे या क्षेत्राकडे ‘प्रोफिटेबल बिझनेस’ म्हणून का पाहिले जाते?

हा सिनेमा म्हणजे ह्या समस्त शिक्षण पद्धतीवर यंत्रणेवर मारलेली जबरदस्त चपराक आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?