'चेकवर खाली दिसणाऱ्या लांबलचक नंबरमागचं लॉजिक जाणून घेतल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हालं...!

चेकवर खाली दिसणाऱ्या लांबलचक नंबरमागचं लॉजिक जाणून घेतल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हालं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दैनंदिन जीवनामध्ये आपली अनेक नंबर्सवर नजर पडते. हे नंबर वाटतात तसे सामान्य, पण त्यामागे काही लॉजिक असेल असा विचार आपण कधी करत नाही. (काही उत्सुक टाळक्यांचा अपवाद वगळता..)

पिनकोड, मोबाइल नंबर, फोन नंबर या सगळ्यांमध्ये जे आकडे दिसतात त्या प्रत्येकामागे काहीतरी लॉजिक आहे. आपण मात्र ते लाजिक समजून घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाही.

आता बँकेचचं उदाहरण घ्या. ती तर एकप्रकारे काहीच्या जीवनातील रोजचा भाग झाली आहे. म्हणजे रोज बँकेत जा, पैसे भरा, चेक डीपोजीट करा वगैरे वगैरे. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला बँकेशी संपर्क येतच असतो.

 

National Banks of India Inmarathi
Banking Finance

 

चेक वरून लक्षात आलं की, आपण ज्या विशेष नंबरबद्दल बोलतोय तसाच काहीसा लांबलचक नंबर चेकवर देखील असतो की.. ! आणि स्लीपवर चेक नंबर लिहिताना त्यावर नजर टाकावीच लागते हो ना?

आता बऱ्याच जणांना वाटत असेल की त्यात काय विशेष आहे? बँकेशी निगडीत काहीतरी नंबर असेल. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. बँकेशी या नंबरचा संबंध आहे, पण त्याचा अर्थ ‘काहीतरी’ असा नाही. तुम्ही देखील या लांबलचक नंबर मागचं लॉजिक जाणून घेतल्यावर आश्चर्यचकित व्हालं.

 

cheque-number-meaning-marathipizza00

स्रोत

हा लांबलचक नंबर असतो २३ आकडी…! हा नंबर चार भागांमध्ये विभागलेला आढळतो.

पहिला भाग ज्यामध्ये सहा नंबर असतात, ते सहा नंबर म्हणजे ‘चेक क्रमांक‘ होय. जो आपल्याला चेक डीपोजीट करताना स्लीपवर लिहावा लागतो. (ही गोष्ट तशी सामान्यत: प्रत्येकालाच माहित आहे.)

 

cheque-number-meaning-marathipizza01
स्रोत

दुसरा भाग ज्यामध्ये ९ नंबर असतात त्याला MICR CODE अर्थात Magnetic Ink Character Recognition कोड असे म्हणतात. या कोड वरून हे समजतं की चेक कोणत्या बँकेमधून जारी करण्यात आलेला आहे.

हा कोड केवळ चेक रीडिंग मशीनमध्येच वाचला जाऊ शकतो.

 

cheque-number-meaning-marathipizza02

स्रोत

हा कोड देखील तीन भागांमध्ये विभागलेला असतो.

यातील पहिले तीन अंक हे ठराविक शहराचा पिनकोड दर्शवतात, ज्यावरून हे कळतं की हा चेक कोणत्या शहरातून आला आहे.

 

cheque-number-meaning-marathipizza03

स्रोत

त्यानंतरचे तीन नंबर हे युनिक कोड असतात आणि हा प्रत्येक बँकेचा युनिक कोड असतो बरं…!

 

cheque-number-meaning-marathipizza04

स्रोत

त्यानंतरचे उरलेले तीन क्रमांक म्हणजे असतात बँकेच्या प्रत्येक ब्रँचचे वेगवेगळे युनिक कोड..! हा कोड बँकेशी संबंधित प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये वापरला जातो.

 

cheque-number-meaning-marathipizza05

स्रोत

आता पुन्हा चेक नंबरकडे वळूया. आतापर्यंत आपण चेक नंबरच्या पहिल्या दोन भागांबद्दल जाणून घेतलं आता तिसऱ्या भागाकडे येऊ ज्यात सहा नंबर असतात.

हा नंबर म्हणजे बँक खाते क्रमांक असतो. यामध्ये तुमच्या बँक खाते क्रमांकापैकी काही नंबर असतात. जुन्या चेकबुकमध्ये तुम्हाला हा क्रमांक  दिसणार नाही, नवीन चेकबुकमध्ये दिसेल.

(सदर प्रतिमा जुनी असल्याने खाते क्रमांक आढळणार नाही.)

 

cheque-number-meaning-marathipizza06

स्रोत

आता शेवटचा भाग ज्यामध्ये दोन नंबर असतात. हे दोन नंबर म्हणजे ट्रान्झॅक्शन आयडी होय.

जर शेवटचे दोन नंबर 29, 30 किंवा 31 असतील तर तो payable at par cheque असतो. payable at par cheque हा तो चेक असतो जो चेक जारी करणाऱ्या कोणत्याही बँकेच्या ब्रँच मधून वटवता येतो.

जर शेवटचे दोन नंबर 09, 10 आणि 11 असतील तर तो local cheque असतो. local cheque म्हणजे तो चेक असतो जो चेक बँकेच्या त्याच ब्रँच मधून वटवता येतो ज्या ब्रँच मधून तो चेक जारी झालेला आहे.

 

cheque-number-meaning-marathipizza07

स्रोत

कधी वाटलं होतं का की या साध्या दिसणाऱ्या नंबर मागे देखील एवढा मोठा गहन अर्थ सामावला असेल?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?