' वाचा - Déjà vu (हे यापूर्वीही कुठेतरी पाहिले आहे), असं वाटण्यामागील शास्त्रीय कारण!

वाचा – Déjà vu (हे यापूर्वीही कुठेतरी पाहिले आहे), असं वाटण्यामागील शास्त्रीय कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कधी कधी एखाद्या व्यक्तीला पाहून, जागेला पाहून, किंवा परिस्थिती बद्दल आपल्याला असे वाटते की आपण हे यापूर्वीही कुठेतरी पाहिले आहे किंवा अगदी असेच काही तरी कुठेतरी अनुभवले आहे.

पण कुठे ते नेमके आपल्याला आठवत नाही. कधी कधी तर असेही होते, की एखादी व्यक्ती एखादे वाक्य बोलते. तेसुद्धा आपण त्याच व्यक्तीच्या तोंडून कधी तरी ऐकले आहे असे आपल्याला जाणवते.

पण हे जाणवण्यामागे निव्वळ योगायोग असेल असे आपल्याला वाटते.

पण अनोळखी किंवा पहिल्यांदा घडत असूनही आपल्याला ओळखीच्या वाटणाऱ्या या स्थितीला “डेजा वू” असे म्हणतात.

 

Deja Vu feeling InMarathi

 

déjà vu हा शब्द फ्रेंच असून याचा अर्थ “already seen” असा होतो.

ही एक अशी भावना असते जेव्हा तुम्हाला माहीत असतं की एखादी घटना पूर्णपणे अनोळखी असायला हवी होती तरीही ती तुम्हाला ओळखीची, परिचयाची वाटते, पण का ते मात्र तुम्हाला कळत नाही.

déjà vu कुठलीही अनैसर्गिक शक्तिंमुळे घडलेली घटना अजिबात नसते. समाजात अशा अनेक छद्म सिद्धांत आहेत, जे या अत्यंत नैसर्गिक असलेल्या क्रियेला अनैसर्गिक घोषित करून टाकतात.

déjà vu संपूर्णतः तुमच्या मेंदूशी जोडलेली घटना असते. मेंदू आपल्या शरीराचा कंट्रोलर असतो व सगळ्यात नाजूक अवयव सुद्धा.

आपल्या शरीरात जे काही बदल, कृती, हालचाली घडत असतात समस्त मेंदूच्या आज्ञेवरूनच घडतात. स्वप्न सुद्धा मेंदूच्या अधिपत्याखाली घडवून आणलेली एक क्रियाच असते.

तर या मेंदूच्या रचनेमध्ये थोडा जरी बदल झाला तरी संपूर्ण शरीराचा तोल ढासळतो. शरीराची गाडी कंट्रोल च्या बाहेर जाते.

याच मेंदू मार्फत सृजन पावलेल्या déjà vu बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. का घडतं déjà vu? déjà vu च्या मागचं विज्ञान काय?

 

१) स्मरणशक्तीचे गृहितक –

 

memory inmarathi

 

आपल्या मेमरीचे दोन प्रकार असतात एक काँशीयस व दुसरी सब काँशीयस मेमरी.

बरेचदा काही गोष्टी आपल्याला वर्तमान स्थितीत आठवत नाहीत, आपण विसरून जातो पण सबकाँशीयसली आपल्या अंतर्मनात ती गोष्ट तो अनुभव अजूनही साठलेला असतो.

त्यामुळे त्या सारखा अनुभव पुन्हा आल्यास, आपल्याला सरळ सरळ तर पूर्वी घडलेली गोष्ट ठळकपणे आठवत नाही पण पुसट आठवणी वर येतात.

याला Cryptomnesia ase सुद्धा म्हणतात. त्यामुळे आपल्याला याआधी ही परिस्थिती कुठे अनुभवली आहे हे आठवत नाही, पण एकूणच परिस्थिती ओळखीची वाटते.

 

२) परिस्थितीतील एखादा घटक समान असणे –

 

dejavu 2 inmarathi

 

तुम्हाला त्या वेळेसही déjà vu चा अनुभव होतो जेव्हा वर्तमानात सुरू असलेल्या घटनेतील एखादा घटक तुम्ही पूर्वी पण अनुभवला असतो.

उदाहणादाखल – तुम्ही सायकल वरून कुठे जाताहात, आणि वाटेत एखादे दुकान लागले व त्या दुकानाचा रंग व समोरचे शटर पाहून तुम्हाला असे वाटले की आपण ही सीचूएशन आधीही अनुभवली आहे.

तर तुम्ही त्याच रंगाचे शटर याचप्रमाणे सायकल वरून जाताना कुठे तरी पाहिले असते.

पण अगदी १-२ क्षणच तुम्ही तिथे घालवता त्यामुळे नक्की कुठे पाहिले आहे हे आठवत नाही. पण हेच दुकान आपण याधीही पाहिले असा तुमचा समज होतो.

 

३) परिस्थिती च्या रचनेत साम्य असणे/ Gestalt familiarity चे गृहितक –

 

inception 2 inmarathi

 

कधी कधी तुम्ही जो वर्तमान अनुभवता आहात, त्यात वस्तूंच्या ज्या रचना आहेत, अगदी तशाच त्याच रचना तुम्ही यापूर्वी ही कुठे तरी अनुभवल्या असता.

उदाहरणार्थ – एक वाडा आहे, जिथे बैठकीत कपाटाच्या डाव्याबाजूला, असलेल्या खिडकीतून एक आंब्याचे झाड दिसते आहे ज्याला भरपूर कैऱ्या लागल्या आहेत.

हे पाहून तुम्हाला déjà vu होत असेल तर शक्यता आहे की तुम्ही कोणत्यातरी अशा घराला भेट दिली असू शकते.

जिथे खिडकी बैठकीत कपाटाच्या डाव्या बाजूला आहे, व त्यातून बाहेर पाहिल्यावर सुद्धा एखादे झाड दिसत होते आवश्यक नाही की हे झाडही आंब्याचेच असेल पण तुम्हाला ही रचना आठवत नाही.

इथे वस्तू काय दिसतात आहे हे महत्त्वाचे नसून त्या कशा रचनेत मांडल्या आहेत हे महत्वाचे आहे.

 

४) मेंदूची एखाद्या स्थितीबद्दल ची उत्स्फूर्त प्रतिक्रिया –

 

deja vu 3 inmarathi

 

कधी कधी मेंदूच्या कार्य प्रणालीत काही फॉल्ट असतो तेव्हा किंवा मेमरी संबंधी भागात अनैसर्गिक तंतूंची हालचाल झाल्यास,

किंवा अनैसर्गिक इलेक्ट्रिकल चार्ज होत असल्यास तुमच्या मेंदूला असा भास होतो की ही गोष्ट त्याने पूर्वीही अनुभवली आहे.

काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार तुमच्या parahippocampal system ची कार्यपद्धत विस्कळीत होते व ती तुम्हाला चुकीचे संकेत देते.

ज्यामुळे कोणता नवीन कोणता पूर्वानुभव ह्यात भेद करणे तुमच्या साठी कठीण होते व तुम्हाला déjà vu चा अनुभव होतो.

 

५) ट्रान्समिशन स्पीड –

 

transmission speed inmarathi

 

तुमच्या मेंदूतील प्रत्येक भाग तुम्हाला जगाला अनुभवण्यासाठी आपले योगदान देत असतो. सगळ्या भागांनी पाठवलेली माहिती एकत्र करून तुम्हाला गोष्ट सांगितली जाते व तुम्ही त्यानुसार क्रिया करता.

पण एखाद्या भागात काही गडबड झाली व त्याने हव्या त्या स्पीड पेक्षा कमी वेळेत किंवा जास्त लवकर माहिती पुढच्या अवयवा कडे पाठवली तरी तुमच्या मेमरी सिस्टम मध्ये गडबड होऊ शकते.

हा पूर्वानुभवच आहे हे तुम्हाला तुमचा मेंदू पटवून देतो ज्यामुळे ही परिस्थिती आपण आधीही पाहिली आहे असे तुम्हाला वाटते.

या क्रियेला Dual neurological processing असेही एक नाव आहे. १९९४ मध्ये बॉस्टन व्हेटरन हॉस्पिटलच्या रॉबर्ट एफ्रोन यांनी हे गृहितक मांडले होते.

 

६) स्वप्न –

 

 

कधी कधी पाहिलेले एखादे दृश्य किंवा कल्पना शक्ती मुळे स्वप्नात एखादे दृश्य दिसते व त्याच सारखे दृश्य, वस्तू, तुम्ही वर्तमानातही अनुभवता.

तेंव्हा अपरिचित परिस्थिती सुद्धा परिचित वाटू लागते आणि तुम्हाला déjà vu चा अनुभव येतो.

Déjà vu एक अशी क्रिया आहे जी अंध लोक सुद्धा अनुभवू शकतात. ती जितकी दृष्टिशी जोडलेली आहे तितकीच इतर इंद्रियांशी सुद्धा जोडलेली आहे.

तुम्ही जितके जास्त सेन्सिटिव्ह, तुमचे इंद्रिय जितके जास्त सक्रिय व सतर्क तितकाच हा अनुभव तुमच्या साठी नॉर्मल होत जाईल.

निरीक्षणावरून असे निदर्शनास येते आहे की या बद्दल अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहचत असल्यामुळे जास्त लोक या कृती बद्दल जागरूक होत आहेत.

तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी Déjà vu अनुभवला आहे का ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?