' वाईट सवयी सोडण्यासाठी संशोधनातून मिळालेली सोप्पी युक्ती आत्मसात करा – InMarathi

वाईट सवयी सोडण्यासाठी संशोधनातून मिळालेली सोप्पी युक्ती आत्मसात करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या पैकी प्रत्येकाला काही ना काही सवय असतात. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि ती लोकांच्या लक्षात राहते एक तर त्याच्या चांगल्या सवयीमुळे किंवा वाईट सवयींमुळे.

सवयीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की, जे विचार आपल्याला पटतात त्यानुसार आपण वागायला सुरुवात करतो आणि कोणतीही गोष्ट ही सलग २१ दिवस केली की, ती आपली सवय बनते.

सवयी चांगल्या पण असतात. जसं की, रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. रोज काही मिनिटांसाठी का होईना ध्यान धारणा करून स्वतःला फ्रेश ठेवणे, पण अशा सवयी असणं म्हणजे लोकांना बोरिंग वाटतात.

 

yoga inmarathi

 

 

या चांगल्या सवयी फार कमी लोकांना माहीत असतात. कारण, त्या फार कमी जणांना आत्मसात करायची इच्छा असते.

इच्छा असेल तर तुम्ही चांगल्या सवयी आत्मसात करू सुद्धा शकतात आणि वाईट सवयींना बाहेरचा रस्ता दाखवू सुद्धा शकतात, पण त्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे एखादी सवय ही वाईट सवय आहे हे मान्य करायची आणि त्या सवयीला एखाद्या चांगल्या सवयीने बदलण्याची.

इथपर्यंत वाचल्यावर तुमच्या मनात हा विचार आला असेल की, “हे मला पटलंय, पण हा बदल स्वतःमध्ये किंवा अगदी जवळच्या व्यक्ती मध्ये घडवून कसा आणायचा?” जाणून घेऊयात.

वाईट सवयी लागतात कशामुळे?

ताण आणि कंटाळा:

 

alia bhatt featured inmarathi

 

‘खाली दिमाग शैतान का घर’ म्हणतात. तसं जितका तुमच्याकडे रिकामा वेळ असेल, तितकी तुम्हाला वाईट सवय लागण्याची शक्यता जास्त असते.

अतिरिक्त वेळेचा काहीतरी नवीन शिकून सदुपयोग सुद्धा होऊ शकतो. फक्त त्यासाठी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे.

काही वेळेस आपण एखाद्या चुकीच्या समजुतीमुळे सुद्धा एखाद्या वाईट सवयीच्या आहारी जाऊ शकतो. जसं की, एखादी गोष्ट करण्यामागे नसलेलं लॉजिक आणि असलेली अंधश्रद्धा. हे ओळखू येणं, मान्य होणं आणि त्यावर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे.

वाईट सवयी जात नाहीत. त्यांना चांगल्या सवयीने replace करावं लागतं हे सिद्ध झालं आहे. 

जसं की, स्मोकिंग करण्याची तुमच्या शरीराला एक सवय झालेली असते. ते करता नाही आलं की लोक बेचैन होतात.

अजून एक सवय म्हणजे लोक सतत कोणता इमेल आला आहे का किंवा मेसेज आला आहे का? हे चेक करत असतात. त्यांना असं वाटत असतं की, तसं केलं नाही, तर आपण जगापासून disconnect होऊ. सतत कनेक्टेड राहण्यासाठी त्यांची नेहमीच एक धडपड सुरू असते.

 

mobile while sleeping inmarathi

 

तुम्हाला गरज आहे ती सिगरेट मधून मिळणारा आनंद इतर कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीमधून शोधण्याची. ही गोष्ट सुद्धा तुमच्या आजूबाजूलाच असते. गरज आहे ती ओळखण्याची आणि त्याद्वारे स्वतःला स्ट्रेस मुक्त करण्याची.

तुम्ही जर का ती सवय अगदीच बंद करायची ठरवली, तर तुमच्या शरीराची ती गरज पूर्ण होणार नाही आणि तुमची चीडचीड होईल.

त्यापेक्षा, सिगरेट ची आठवण आल्यावर breathing exercise करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. ईमेल किंवा सोशल मीडियाची आठवण झाल्यावर कामाबद्दल एक वाक्य लिहून बघा. तुमचं मन परत productive कामाकडे वळेल.

तुमच्या सवयीचे काही triggers असतात. जसं की, तुम्ही ड्रिंक्स घेतल्यावर तुम्हाला सिगरेटची आठवण येते. अशावेळी ती पहिलीच गोष्ट टाळा आणि त्या सवयीला सुद्धा चांगल्या सवयीने replace करा.

 

drinks inmarathi

 

याचे अजून उदाहरण द्यायचे तर, जर तुम्हाला जेवण झाल्यावर चॉकलेट खायची सवय असेल तर चॉकलेट घरी आणूच नका. सोफ्यावर बसलो की लगेच टीव्ही लावायची सवय असेल तर रिमोट कंट्रोल लपवून ठेवा.

हेच मोबाईल बद्दल सुद्धा म्हणता येईल. जेव्हा तुम्हाला काही महत्वाचं काम करायचं असेल, तेव्हा त्याला तुम्ही Do Not Disturb या मोड वर सुद्धा टाकू शकता.

वाईट सवयी पटकन आत्मसात करणे आणि चांगल्या सवयींना विरोध करणे हा आपल्या शरीराचा गुणधर्म आहे. तो लक्षात आला, की तुम्ही स्वतःला सतत बदलत राहण्याचे प्रयत्न मनापासून करण्याची गरज आहे.

हे साध्य करण्यासाठी mindfulness हा एक प्रकार सध्या खूप लोकप्रिय होत आहे. Dr. Brewer यांनी ही पद्धत जगासमोर आणली आहे.

Mindfulness शिकवण्यासाठी त्यांनी एका स्मोकिंग ची सवय असलेल्या महिलेला Mindful Smoking म्हणजेच, सिगरेट हातात घेतल्यापासून काय काय घडतं हे मनापासून निरीक्षण करण्यास सांगितलं.

एकदा त्या गोष्टीकडे निरीक्षण म्हणून बघितलं की, त्या महिलेने लगेच “YUCK!” असा प्रतिसाद दिला आणि तिच्या मनात सिगरेट बद्दल एक किळस बसली आणि तिने पुन्हा कधी सिगरेट ला स्पर्श केला नाही.

 

quit smoking inmarathi

 

Mindfulness म्हणजे तुमच्या प्रत्येक सवयीचा अभ्यास करणे आणि त्याचा स्वतःला काय फायदा-तोटा होतोय हे चेक करत राहणे. ज्या सवयींनी तुम्हाला रिफ्रेशिंग वाटतं, त्या चांगल्या गोष्टी परत परत करत राहणं म्हणजेच mindfulness.

जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा वाईट सवयी आपोआप निघून जातात आणि चांगल्या सवयीच राहतात. शरीराला हे मान्य करायला सुद्धा वेळ लागेल, पण एकदा पटलं की पुढे तुम्ही कधीही वाईट सवयीच्या जाळ्यात अडकणार नाहीत.

‘माणूस हा सवयीचा गुलाम असतो’ असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. एक विशिष्ट वय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाला सुद्धा एखाद्या लहान मुलासारखं सांभाळायची गरज आहे.

ते केलं तर कोणतीही सवय तुमच्या प्रगतीच्या आड येणार नाही. हे या एका वाक्यात summarise होऊ शकतं, “Life is all about choices that you make.”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?