'अख्ख्या जगाला हाय स्पीड इंटरनेटचा मार्ग दाखवणाऱ्या भारतीयांची कहाणी वाचा

अख्ख्या जगाला हाय स्पीड इंटरनेटचा मार्ग दाखवणाऱ्या भारतीयांची कहाणी वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंटरनेट हि  एकविसाव्या शतकातील अत्यावश्यक गोष्टींपैकी एक. अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट याशिवाय आज जगणं शक्य नाहीये हे सगळेच मान्य करतील.

कारण, सकाळपासून तुमची इंटरनेट ची गरज ही सुरू होते ती रात्री झोपेपर्यंत सुरू असते.

जेव्हापासून लहान मुलांच्या शाळासुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून घरोघरी लहान मुलांपासून सर्वांनाच Google meet, Zoom हे शब्द अगदीच जवळचे झाले आहेत.

 

online coaching inmarathi
freepressjournal.in

 

मुलांना शिकवण्यासाठी एक वेळ वही-पुस्तक नसेल तर चालेल पण घराघरात हाय स्पीड इंटरनेट पाहिजेच; हे सध्या लोकांच्या लक्षात आलं आहे.

शाळेसोबतच कॉर्पोरेट, राजकीय व्यक्ती हे सगळेच सध्या इंटरनेट शिवाय अपूर्ण आहेत. कोरोना मुळे जग थांबलं होतं.

पण, तरीही बिजनेस वर्ल्ड चं काहीच अडलं नाही हे आपण मागील सहा महिन्यात बघितलं.

ऑगस्ट महिन्यात सर्वांनी ‘न्यु नॉर्मल’ म्हणून सर्व आर्थिक व्यवहारांना सुरुवात केली आणि सप्टेंबर महिन्यात लोकांनी या नवीन काम पद्धतीला ‘बेटर नॉर्मल’ असं म्हणायला सुरुवात केली आहे.

कारण, सध्या पूर्ण जग जवळ आलं आहे. आज मुंबईतील व्यक्ती न्यूझीलंड च्या व्यक्तीचे drawing classes घेऊ शकते.

फ्रांस मध्ये बसलेली व्यक्ती औरंगाबाद च्या व्यक्तीला शेअर मार्केट कसं वर्क करतं हे सांगू शकत आहे. हे पर्याय आधीसुद्धा उपलब्ध होते. पण, त्यांना वापरायची सक्ती नव्हती.

हायस्पीड इंटरनेट ची गरज आता लोकांना पटली आहे. शिवाय, हायस्पीड इंटरनेट मिळवणं सुद्धा शक्य होत आहे.

याचं कारण म्हणजे आपल्या घरात वायफाय पोहोचवणारं ‘फायबर ऑप्टिक्स’. असे इंग्रजी शब्द ऐकले की आपल्याला हे दुसऱ्या देशातील लोकांनीच शोधून काढलं असावं असंच वाटतं.

पण, याबाबतीत तसं नाहीये. नरिंदर सिंग कपानी या भारतीय व्यक्तीने फायबर ऑप्टिक्स ही संकल्पना जगाला दिली.

 

narinder singh inmarathi

 

आणि म्हणूनच त्यांना ‘फादर ऑफ फायबर ऑप्टिक्स’ ह्या नावाने संबोधलं जातं हे कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल.

जगभरात विज्ञान क्षेत्रात जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, सी व्ही रमण, होमी भाभा यासारख्या लोकांनी मॉडर्न सायन्स मध्ये आपलं योगदान दिलं आहे.

पण, त्यांना अपेक्षित तो मान किंवा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही हा एकप्रकारे त्यांच्या कामावर झालेला अन्याय म्हणता येईल.

नरिंदर सिंग कपानी यांचा जन्म १९२७ मध्ये पंजाब मधील मोगा येथे झाला होता. आग्रा युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं.

आणि त्यांची पी.एच.डी. त्यांनी लंडन येथील इंपेरीयल कॉलेज मधून पूर्ण केली.

त्या आधी त्यांनी भारतातील एक दारुगोळा बनवणाऱ्या कंपनी मध्ये काम केलं होतं जिथे त्यांचा रोल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स तयार करणे हा होता.

 

narinder singh 2 inmarathi

 

PhD मध्ये Dr. हॉपकिन्स सारखे मार्गदर्शक मिळल्याने नरिंदर सिंग कपानी हे स्वतःला खूप नशिबवान मानत होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतात जाऊन स्वतःची कंपनी सुरू करायची होती.

पण, इटली मध्ये सायन्स कॉन्फरन्स मध्ये त्यांची अमेरीकेतील एका प्रोफेसर सोबत भेट झाली आणि नरिंदर सिंग कपानी यांनी रोंचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये faculty मेंबर मधून जॉईन व्हायचं ठरवलं.

काही वर्ष तिथे काम केल्यानंतर १९६० मध्ये सिलिकन वॅली मध्ये नरिंदर सिंग कपानी यांनी स्वतःची पहिली कंपनी सुरू केली.

हाय स्पीड कम्युनिकेशन्स मध्ये त्यांनी खूप रिसर्च केला आणि त्यासोबतच, मेडिकल इमेजिंग या ऑप्टिकल नेटवर्क ते इंडोस्कॉपीक लेझर सर्जरी मध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केला.

जर का नरिंदर सिंग कपानी नसेल असते तर आपल्याला इंटरनेट ची सुविधा मिळाली नसती; ना लेझर सर्जरी आणि ना हाय स्पीड कम्युनिकेशन हे आपल्या पर्यंत पोहोचलंच नसतं.

नरिंदर सिंग कपानी या भारतीय वंशात जन्मलेल्या अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ हे जगभरात त्यावेळी प्रकाशात आले जेव्हा त्यांनी हा शोध लावला की, काचेमधून प्रकाश प्रवास करु शकतो.

नरिंदर सिंग कपानी यांनी तयार केलेल्या रिसर्च पेपर “A Flexible Fibrescope, using Static Scanning” हा ‘सायंटिफिक जर्नल नेचर’ च्या २ जानेवारी १९५४ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला होता.

 

narinder singh3 inmarathi

 

या रिसर्च पेपर नंतर एन्डोस्कोप आणि लेझर च्या वस्तूंचा शोध लागला.

१९५५ च्या फेब्रुवारी मध्ये ‘Optica Acta’ या मासिकात नरिंदर सिंग कपानी यांनी ‘Transparent Fibres for the Transmission of Optical Images’ या नावाने रिसर्च पेपर प्रकाशित केला.

Optoelectronics या विषयावर त्यांनी जवळपास १०० रिसर्च पेपर्स आणि ४ पुस्तकं त्यांनी लिहिली.

त्याशिवाय, नरिंदर सिंग कपानी यांनी कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायंटिफिक सोसायटी मध्ये लेक्चर दिले होते.

१९६० मध्ये ‘सायंटिफिक अमेरिकन’ या संस्थेत त्यांनी ‘फायबर ऑप्टिक्स’ हा शब्द जगासमोर आणला.

नोव्हेंबर १९९९ मध्ये Fortune मासिकाने जगातील ७ लोकांबद्दल लिहिलं होतं ज्यांनी विसाव्या शतकात आयुष्य बदलण्यास मदत केली.

या ७ लोकांमध्ये नरिंदर सिंग कपानी यांचा समावेश होता.

२००९ मध्ये नोबेल कमिटी ने चार्ल्स के काओ या चायनीज शास्त्रज्ञाला फायबर ऑप्टिक्स या क्षेत्रातील कामगिरी साठी नोबेल पुरस्कार बहाल केला.

पण, तेव्हा कमिटी ने नरिंदर सिंग कपानी यांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही.

 

kapany InMarathi

 

चार्ल्स काओ यांनी जे रिसर्च पेपर प्रसिद्ध केले होते त्यात त्यांनी नरिंदर सिंग कपानी यांच्या माहितीचा आधार विज्ञान क्षेत्राच्या लगेच लक्षात आला होता.

पण, स्वीडन च्या नोबेल कमिटी ला याबाबत कोणी जाब विचारू शकत नव्हते.

नरिंदर सिंग कपानी यांच्या कामाची दखल MIT – Massachusetts Institute of Technology ने घेतली होती आणि त्यांना फायबर ऑप्टिक्स चे जनक म्हनून MIT ने संबोधलं होतं.

नरिंदर सिंग कपानी सध्या एक यशस्वी बिजनेसमॅन म्हणून सिलिकन walley येथील त्यांची कंपनी चालवत आहेत. आज त्यांच्या नावावर १०० वस्तूंचे पेटंट आहेत.

त्यासोबतच, सामाजिक बंधीलकी जपण्यासाठी नरिंदर सिंग कपानी हे स्वतःच्या 90s मध्ये ‘सिख फाउंडेशन’ या नावाची संस्था अमेरिकेत चालवतात.

नरिंदर सिंग कपानी यांचं नाव जगात ते deserve करतात तितकं लोकप्रिय झालं नाही. ते आपण पुढे आणावं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही या विषयावर लेख लिहिण्याचं ठरवलं.

 

narinder singh kapany inmarathi

 

नरिंदर सिंग कपानी सारखे लोक हे अघोषित भारत रत्न आहेत याबद्दल कोणाचंही दुमत नसेल ही आम्हाला खात्री आहे. त्यांचा रिसर्च नसता तर आज आपण ऑनलाईन मीटिंग ला मुकलो असतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?