'बघा, शिक्षकाने केलेली नामी युक्ती - टिव्ही पाहून होतंय गरीब मुलांचं शिक्षण!

बघा, शिक्षकाने केलेली नामी युक्ती – टिव्ही पाहून होतंय गरीब मुलांचं शिक्षण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जवळपास सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण जगावर एक महासंकट आलं आणि एकूणच जगण्याची पद्धतीच बदलली. बऱ्याच क्षेत्रात बरेच बदल होताना आता दिसत आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण क्षेत्र.. या कोरोना महामारीच्या काळात आता शिक्षणाच्या पद्धतीत तर आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत.

प्रत्यक्ष उपस्थितीद्वारेच शिक्षण घेता आणि देता येते हा समज आता हळूहळू बदलतोय.. ऑनलाईन शिक्षणाविषयी भारतात फारशी प्रगती होत नाही, किंबहुना ती होवू शकत नाही, कारण इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव हे कारण अनेक वर्षे मिळत होते.

नेटवर्कचे अनेक इश्यू आणि गरीब-श्रीमंत दरी हे त्यातील आणखी ठळक मुद्दे. मात्र कोरोना महामारी पसरू लागली आणि अचानकपणे भारतात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल दिसू लागले.

 

Online school InMarathi

 

ऑनलाईन शिक्षण तर इथून पुढे गरजेचे आहेच, मात्र केवळ शिक्षण नव्हे तर सहज-सोप्या भाषेत सर्व भाषिक विद्यार्थ्यांना समजेल असे शिक्षण मिळणे ही या काळाची मोठी गरज आहे.

अशीच एक सोपी, अनोखी पद्धती वापरुन एक शिक्षक छोट्या छोट्या गावांतील, खेड्यांतील, पाड्यांवरील मुला-मुलींना शिक्षीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला चांगले यशही मिळते आहे.. जाणून घेऊया त्याबद्दलच..

छ्त्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्यातील एक शिक्षक अशोक लोधी यांनी मोहल्ला शिक्षण पद्धती सुरू केली आहे. या अंतर्गत लोधी हे स्वत:च्या मोटरसायकलवरुन जिल्ह्यातील खेड्यांतून आणि लहान पाड्यांतून फिरतात.

सिनेमावाले बाबू आ गए…

 

chattisgarh teacher inmarathi

 

त्यांच्या मोटरसायकललाच त्यांनी एक टिव्ही सेट बसवून घेतलाय. बाजुलाच स्पिकरची सोय आहे. पाड्यांवर पोहोचले, की मोटरसायकल उभी करुन ते टिव्ही सुरू करतात. टिव्हीची अर्थातच सगळ्यांनाच क्रेझ असल्याने सहाजिकच मुलं-मुली गोळा होतात.

इथल्या मुला-मुलींनी या सरांचे सिनेमावाले बाबू असे नामकरण केलेले आहे. जेव्हा त्यांच्या मोटरसायकलचा आवाज ऐकू येतो, तेव्हा पाड्यातील सर्व मुलं-मुली सिनेमावाले बाबू आ गए… असं ओरडत जमा होतात.

सहाजिकच शाळेसाठी विद्यार्थी गोळा करण्याची वेळ या शिक्षकांवर कधीच नाही आली.

टिव्हीद्वारे अभ्यास कसा होतो..

 

chattisgarh teacher inmarathi1

 

लोधी सरांनी जाणीवपूर्वक अशा चित्रफिती, कार्टून फिल्म्स, संगीत चित्रफिती, कथा निवडल्या आहेत, जेणेकरुन त्या माध्यमातून शैक्षणिक मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचेल तो ही स्थानिक भाषेतून.

छोट्या छोट्या कालावधीच्या या चित्रफिती दाखवल्यानंतर लोधी सर मुलांशी बोलतात. त्यांच्या प्रश्नांचं, शंकांचं निरसन करतात. मग मुलेही खुश.

अभ्यास, मार्गदर्शन आणि मनोरंजन अशी त्रयी यातून साधली जाते. ज्याचा खूपच सकारात्मक परिणाम हळूहळू दिसून येतो आहे.

 

राज्य शालेय-शिक्षण विभागानेही केले या उपक्रमाचे कौतुक

छत्तीसगडच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. आलोक शुक्ला यांनीही लोधी यांच्या उपक्रमाचे कौतुक करत असे म्हटले आहे की,

जिल्ह्यातील तळागाळातील सर्वांना अखंड शिक्षण मिळावे यासाठी श्री. लोधी यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मला त्यांचे आणि जिल्हा प्रशासनाचे मनापासून अभिनंदन करायचे आहे. अशा नाविन्यपूर्ण गोष्टी अगदी मोठ्या शहरांमध्ये देखील अभावानेच आढळतात.

खरं तर शिक्षण हे शाळेच्या चार भिंतींपेक्षा जेव्हा ते मोकळ्या आभाळाखाली आणि उघड्या जगात मिळते, तेव्हा त्याला जास्त महत्त्व असते. शाळेत मिळते ते पुस्तकी शिक्षण…मात्र खुल्या जगात मिळते ते व्यवहार्य शिक्षण. ज्याची सर्वाधिक गरज असते.

 

chattisgarh teacher inmarathi2

 

आता हळूहळू आपल्या देशात ऑनलाईन शिक्षणाबाबत सकारात्मकता दिसते आहे. मात्र अजूनही तळागाळापर्यंत पोहोचण्यास बऱ्यापैकी वेळ लागेल.

जर सगळीकडेच अशी मोहल्ला पद्धती आणि स्थानिक भाषेतून सहज-सोपे शिक्षण मिळू लागले तरी बराच फरक पडेल हे निश्चित.

किमान केवळ पुस्तकी अभ्यासातून जी सध्या रॅट-रेस निर्माण झालीय, त्यापेक्षा मिळणाऱ्या शिक्षणातून जर शहाणपण आणि व्यवहार्यता जर लहान वयातच विद्यार्थ्यांना मिळणार असेल पुढची पिढी खरोखरच भाग्यवान म्हणावी लागेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?