' फेसबुकची कन्सेप्ट जगापुढे मांडण्यात ‘ह्या’ भारतीयाचा होता सिंहाचा वाटा! – InMarathi

फेसबुकची कन्सेप्ट जगापुढे मांडण्यात ‘ह्या’ भारतीयाचा होता सिंहाचा वाटा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज कोणालाही विचार की फेसबुकचा संस्थापक कोण? तर एकच उत्तर येईल की मार्क झुकरबर्ग! हो फेसबुक मार्क झुकरबर्गने तयार केलं हे खर, पण त्याला जी फेसबुक बनवायची कल्पना सुचली ती एका भारतीयामुळे!

अजून विश्वास नाही बसतं, मग हे सत्य जाणून घ्याच, त्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे दिव्य नरेंद्र.

 

facebook inmarathi
postcron.com

 

२००२ सालापासून दिव्य नरेंद्र आणि त्याचे दोन सहकारी कॅमरून विन्क्लेवोस आणि टेलर विन्क्लेवोस हे एक सोशल नेट्वर्किंग साईट बनवण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यासाठी त्यांना गरज होती एका वेब प्रोग्रामरची!

नरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून HarvardConnections.com नावाची वेबसाईट सुरु करायचे ठरवले.

एक प्रयोग म्हणून त्यांनी ही वेबसाईट उभारायचे ठरवले होते, ज्यावर हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधील सर्व विद्यार्थी एकमेकांशी जोडले जाणार होते. हे अगदी  फेसबुकसारखं असणार होतं.

जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर संपूर्ण अमेरिकेमध्ये ही वेबसाईट प्रमोट करण्याचे नरेंद्रच्या मनात होते.

 

facebook-idea-marathipizza01
khabridost.in

 

त्यांनी वेब प्रोग्रामर म्हणून मार्क झुकरबर्गला साथीला घेत ही वेबसाईट बनवण्याचे काम त्याच्याकडे सोपवले.

मार्क झुकरबर्ग हा त्याच्या Facemash नावाच्या एका वेबसाईटमुळे आधीच प्रसिद्ध झाला होता. या वेबसाईटवर हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधील विद्यार्थी कोण किती आकर्षक आहे यावर वोट करायचे.

त्याची ही कल्पना तरुणांना जास्तच पसंत आली होती. त्यामुळे त्याच्यासारखा हुशार प्रोग्रामर आपल्याला मदत करू शकेल या विचाराने नरेंद्रने त्याला हाताशी घेतलं.

 

facebook-idea-marathipizza02
khabridost.in

 

मार्क झुकरबर्गला भेटून नरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी त्याला संपूर्ण प्रोजेक्ट समजावून सांगितला. त्यांची कल्पना मार्क झुकरबर्गला भयंकर आवडली आणि त्याने देखील काम करण्यास होकार दिला.

या प्रोजेक्टवर काम करता करता मार्क झुकरबर्गच्या मनात फेसबुक निर्माण करायची आयडिया आली.

त्याने नरेंद्रच्या मूळ कल्पनेत काहीसे बदल करून नवी वेबसाईट अर्थात फेसबुक लॉन्च करण्याचे ठरवले आणि दिव्य नरेंद्रच्या HarvardConnections.com च्या पूर्वी स्वत:ची Thefacebook.com ही साईट लॉन्च केली आणी अश्याप्रकारे फेसबुकचा जन्म झाला.

 

facebook-idea-marathipizza03
khabridost.com

 

दिव्य नरेंद्रला या गोष्टीमुळे जबर धक्का बसला त्याने मार्क झुकरबर्ग विरोधात फसवणुकीची आणि आयडिया चोरल्याची केस दाखल केली. नरेंद्रच्या म्हणण्यानुसार,

माझ्या आयडिया मध्ये काही वेगळे बदल करून मला न विचारता, माझी परवानगी न घेता, माझी आयडिया चोरून मार्क झुकरबर्गने फेसबुक सुरु केले आहे आणि ही शुद्ध फसवणूक आहे.

शेवटी कोर्टाने देखील दिव्य नरेंद्रच्या बाजूने निकाल देत मार्क झुकरबर्गला दंड सुनावला.

दंडानुसार, मार्क झुकरबर्गला ६५० लाख डॉलर्स आणि फेसबुकचे १.२५ मिलियन किंमतीचे शेअर्स दिव्य नरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांना द्यावे लागले.

 

facebook-idea-marathipizza04
khabridost.in

 

या गोष्टीमुळे खचून न जाता दिव्य नरेंद्र पुन्हा जोमाने उभे राहिले आणी त्यांनी आपल्या तेच दोन सहकारी कॅमरून विन्क्लेवोस आणि टेलर विन्क्लेवोस यांच्यासमवेत SumZero नावाची इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरु केली.

आज ते या कंपनीचे सीईओ आहेत.

 

facebook-idea-marathipizza05
khabridost.in

 

दिव्य नरेंद्र आणि मार्क झुकरबर्ग कधी संपर्कात आलेच नसते तर कदाचित काहीश्या वेगळ्या नावाने, वेगळ्या रुपात पण एका भारतीयाने बनवलेली सोशल नेट्वर्किंग साईट म्हणून आपण सर्वजण आणि संपर्ण जग आज फेसबुक वापरत असतं.

पण जणू फेसबुक हे मार्क झुकरबर्गच्याच नशिबी लिहिलं होतं.!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?