' भेगा घालवून, पाय सुंदर, मऊ करण्याचे १० सोप्पे घरगुती उपाय ट्राय करा – InMarathi

भेगा घालवून, पाय सुंदर, मऊ करण्याचे १० सोप्पे घरगुती उपाय ट्राय करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सौंदर्य हे फक्त सुंदर रेखीव चेहाऱ्यापर्यंतच सीमित नसून तुमच्या हात पाय, त्वचा, केस यावर पण अवलंबून असतं.

शरीरयष्टी, विरळ व निर्जीव वाटणारे केस, हात पायांच्या भेगा, यामुळे आपल्याला तब्येतीचा त्रास होतोच, पण आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ लागतो. त्यामुळे या सगळ्यांचीच काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

पाय आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित अवयव आहे. आपण हातांपासून, केसांपर्यंत सगळ्यांचीच नीट काळजी घेतो, पण पाय सतत मोज्यांनी किंवा बुटांनी झाकलेले असल्यामुळे आपल्याला एक कारणच मिळतं त्यांना दुर्लक्षितच ठेवण्याचं.

जेव्हा कुठे बुट किंवा मोजे काढण्याची पाळी येते, तेव्हा मात्र आपल्याला आपल्या काळजी न घेतलेल्या पायांची थोडी का होई ना लाज वाटू लागते व तेव्हा आपण काळजी घेण्याचे ठरवतो.

काळजी म्हणजे नेमके काय करतो, तर महागडे पेडीक्योर किंवा क्रॅक हीलींग क्रीमस् आणतो. त्यात पैसे जास्त खर्च होतात.

 

leg crack inmarathi

 

त्यामुळे आज आपण पायांना पडणाऱ्या भेगांविषयी व त्यांना कसे कमी करता येईल या विषयी काही घरगुती व बजेट मधे असलेले उपाय जाणून घेणार आहोत.

पायांना पडणाऱ्या भेगा अत्यंत वेदनादायी असू शकतात. कधी वरवरची कातडी निघते, तर कधी आतपर्यंत खोल भेग होते, ज्यातून रक्तस्राव होतो व कधी कधी इन्फेक्शन सुद्धा होते.

याच भेगांना घालवण्याचे काही घरगुती उपाय खाली नमूद केलेले आहेत : 

१) तांदळाचे पीठ –

 

rice flour inmarathi5

 

तांदळाचे पीठ हे त्वचेच्या पोषणासाठी एक उत्तम पर्याय आहे व सगळ्यात बेस्ट डेड स्किन रिमुव्हरसुद्धा.

या पीठात विविध मिनरल्स व व्हिटॅमिन असतात आणि यात मध व व्हिनेगर घातले, की याचे औषधी गुणधर्म अजून वाढतात.

३-४ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचा मध व २-३ थेंब ऍपल साईडर व्हिनेगरला गडद पेस्ट होईल असे एकजीव करून घ्या. आपले पाय कोमट पाण्यात १०-१५ मिनिटे बुडवून ठेवा व या पेस्टने स्क्रब करा.

यामुळे सगळी घाण व डेड स्किन निघून जाईल. भेगा, सहसा माती व डेड स्किनमुळे अधिक प्रमाणात होत असल्यामुळे व पोषण मिळण्यासाठी ही डेड स्किन व माती काढणे आवश्यक असते.

ह्या स्क्रबने आठवड्यातून २-३ वेळा पाय घासणे सुरू करा व भेगा पूर्णपणे नाहीशा होईपर्यंत हे करत रहा.

 

२) मध –

 

honey inmarathi

 

मध हे शरीरातील सेल्स मध्ये खोलवर साचेलेले पाणी बाहेरच्या लेयर मध्ये आणते व पायांना रुक्ष होण्यापासून वाचवते.

मध हे एक नैसर्गिक अँटीऑक्सीडंट व अँटीसेप्टिक असते त्यामुळे नेहमीच भाजल्यावर किंवा जखमेवर सुद्धा मध लावतात. मध त्वचेला मऊ बनवते व टवटवीत ठेवते.

फक्त तळ पाय बुडतील इतके गरम पणी घेऊन त्यात २ चमचे मध घाला व या पाण्यात आपले पाय १५-२० मिनिटे बुडवून ठेवा. यानंतर, प्युमाईस स्टोनने आपले पाय घासून घ्या.

धुतल्यावर पाय स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या व मॉइश्चरायझर लावून मोजे घाला. हा उपाय तुम्ही रोज रात्री झोपताना भेगा पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत करू शकता.

 

३) केळी –

 

banana inmarathi

 

केळ्यामध्ये अमिनो अॅसिड व मिनरल्स असतात. ज्याने आपली खराब झालेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी दुरुस्त करून घेता येते.

केळं एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, ज्यात व्हिटॅमिन A, B6, C असतात. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते व ती रुक्ष होण्यापासून वाचते.

एका बाउलमध्ये २ पूर्णपणे पिकलेली केळी घ्या व नीट मॅश करूनघ्या. कच्च्या केळीत अॅसिड अती तीव्र स्वरूपाचे असते, ज्यामुळे त्वचा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकलेले केळ घेणे अनिवार्य आहे.

ही केलेली पेस्ट धुतलेल्या पायांवर सगळीकडे नीट लावून घ्या व २० मिनिटे वाळू द्या. नंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. ही प्रक्रिया रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे व तुम्हाला मनासारखं रिझल्ट मिळेपर्यंत करत रहा.

 

४) वनस्पती तेल –

 

oil cans inmarathi

 

वनस्पती तेलात भरपूर व्हिटॅमिन जसे प्रो व्हिटॅमिन A,D आणि E असतात, जे त्वचेला पोषण देऊन नवीन पेशी निर्माण करण्यासाठी मदत करतात.

याशिवाय वनस्पती तेल हे आपल्या त्वचेत लवकर मुरते, ज्यामुळे त्याचा परिणाम लवकर बघायला मिळू शकतो.

रोज रात्री झोण्यापूर्वी, आपले पाय स्वच्छ धुवून घ्या व नरम टॉवेलने स्वच्छ व पूर्ण कोरडे करून घ्या. यानंतर भरपूर वनस्पती तेल लाऊन, स्वच्छ मोजे घाला व रात्रभर हे तेल पायावरच असू द्या.

दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या वेळी थोडे पाय चोळून घ्या. ही प्रक्रिया रोज रात्री नियमित करा. लवकरच पायांच्या भेगा कमी झालेल्या दिसतील.

 

५) बेकिंग सोडा –

 

leg crack inmarathi4

 

 

मृत पेशी काढण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय, सोड्यामुळे पायाला येणारा दुर्गंध सुद्धा नाहीसा होतो. यातील औषधी तत्व, आतील नादुरुस्त पेशींना पुन्हा ठीक करण्यात उपयुक्त ठरते.

कोमट पाण्यात ३-४ चमचे बेकिंग सोडा घाला व आपले पाय या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवा. नंतर पाय काढून घासून, डेड स्किन काढून घ्या. व गार पाण्याने धुवून नीट पुसून घ्या.

यामुळे पायाची त्वचा पुन्हा ताजी तवानी होईल व भेगा हळू हळू कमी होतील. आठवड्यातून २ वेळा नियमित असे केल्यास भेगांपासून लवकर मुक्ती मिळू शकते.

 

६) खोबरेल तेल –

 

Coconut oil inmarathi

 

भेगां मधून रक्तस्राव होत असल्यास किंवा इन्फेक्शन झाल्यास खोबऱ्याचे तेल लावणे अत्यंत गुणकारक ठरते. याने पायांचा कोरडेपणा कमी होतो व खोबऱ्यात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शन वाढत नाही.

रोज रात्री झोपताना, स्वच्छ पाय धुवून हे तेल लावून मोजे घालून ठेवा. याने भेगा त्वरित कमी होतील.

 

७) कोरफड –

 

alovera.jpg inmarathi

 

कोरफड एक अत्यंत उपयुक्त औषध आहे. यात व्हिटॅमिन B, C, E असतात. याशिवाय अँटी सेप्टिक, अँटी अलार्जिक, अँटी फंगल गुणधर्मामुळे जवळपास प्रत्येक त्वचा रोगावर औषध म्हणून वापरता येऊ शकते.

रात्री झोपताना पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या व कोरफडीचा गर पायांना लावा व कॉटनचे मोजे घाला.

दुसऱ्या दिवशी आपले पाय सध्या पाण्याने धुवून घ्या. काही दिवसातच बदल जाणवायला लागेल. तुम्ही कोरफड नियमितपणे ही वापरू शकता.

 

याशिवाय आपल्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या खालील गोष्टींचा वापरही आपण करू शकतो : 

८) विक्स –

 

leg crack inmarathi2

 

विक्स मध्ये कपूर, मेंथॉल व टर्पेंटाईन ऑईल असते. हे पायातील मॉईश्चर रोखून धरते व मेंथॉलमुळे होणारी आग कमी करतात.

झोपण्यापूर्वी पायांची विक्सने मालिश करा व कॉटनचे मोजे घाला. सकाळी कोमट पाण्याने पाय धुवून घ्या. भेगा संपूर्ण नाहीशा होईपर्यंत हे करत रहा.

 

९) वॅस्लीन पेट्रोलियम जेली व लिंबाचा रस –

 

leg crack inmarathi1

 

वॅस्लीन हे एक उपयुक्त मॉइश्चरायझर आहे व यात लिंबाचा रस घातला, की एक स्किन पिलिंग पॅक तयार होतो. लिंबात आया सायट्रीक अॅसिड मुळे जुनी त्वचा निघून नवीन त्वचा यायला मदत होते.

कोमट पाण्यात आपले पाय १५-२० मिनिटे बुडवून ठेवा व नंतर स्वच्छ पुसून कोरडे करूनघ्या. यानंतर, १ चमचा वॅस्लीन मध्ये २-४ थेंब ताज्या लिंबाचा रस घाला व हे मिश्रण पायाला व भेगांना लावा व मोजे घाला.

हे मिश्रण रात्रभर पायावर राहू द्या व सकाळी गरम पाण्याने पाय धुवून घ्या. भेगा पूर्णपणे भरून येईपर्यंत रोज रात्री करा.

 

१0) Listerine माऊथ वॉशचा वापर –

 

leg crack inmarathi3

 

Listerine मध मध्ये थीमोल ड्रग व अल्कोहोल कंटेंट असतो, ज्यामुळे पायांच्या नखांना फंगल इन्फेक्शन होत नाही. त्वचा मऊ होते व सगळ्या प्रकारची धूळ निघून जाते.

१ कप Listerine, १ कप व्हाईट व्हिनेगर व २ कप पाणी घेऊन यांचे एक मिश्रण बनवून घ्या. या मिक्सचरमध्ये आपले तळपाय १५-२० मिनिटे बुडवून ठेवा.

त्यानंतर पाय बाहेर काढून, ओले असतानाच पेडीक्योर ब्रशने घासून घ्या. याने पायांवरची डेड स्किन पूर्णपणे निघून जाईल. यानंतर पाय स्वच्छ धुवून, पुसून घ्या. हे दररोज, भेगा पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत करा.

हे होते भेगांना घालवण्याचे काही घरगुती उपाय! तुम्ही वापरत असलेले अजून कोणते उपाय असतील तर आम्हाला नक्की कळवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?