' अवकाशात प्रवास करणाऱ्या इस्रोच्या पहिल्या महिला रोबोट विषयी काही रंजक गोष्टी!

अवकाशात प्रवास करणाऱ्या इस्रोच्या पहिल्या महिला रोबोट विषयी काही रंजक गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मानवी मेहनत कमी करण्यासाठी तयार झालेली वस्तू म्हणजे मशीन. काळ बदलला तसं मशीन चं स्वरूप सुद्धा बदललं.

एकविसाव्या शतकात तयार होणाऱ्या बहुतांश मशीन्स मध्ये एक human aspect असल्याचं आपल्या लक्षात येईल.

“Alexa माझ्यासाठी कुमार सानू चे गाणे लाव”, अश्या सूचना आपल्याला सध्या कित्येक घरात ऐकायला मिळतात.

कोणतीही सूचना मिळल्यावर Alexa स्वतःला एक सर्च कमांड देते आणि आपल्याला अपेक्षित गोष्ट आपल्यासमोर सादर करते.

ज्या घरात कमी सदस्य संख्या आहे त्या घरात alexa ही एक सदस्य म्हणून समाविष्ट होत आहे.

 

alexa inmarathi

 

आपल्या आयुष्यात Artificial Intelligence (AI) चा वापर इतका वाढला आहे की काही दिवसातच आपल्याला स्वयंचलीत कार रस्त्यावर धावताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.

मशीन आणि माणसात एक फरक सांगायचा झाला तर माणूस हा स्वतः विचार करू शकतो.

कोणत्या परिस्थितीत कसं बोलावं हे त्याला कळतं आणि तो स्वतः भावनिक असल्याने त्याला इतरांना आधार देता येतो.

पण, लवकरच या सर्व गोष्टी एक लेडी रोबो सुद्धा करू शकणार आहे.

होय, हे सुद्धा विज्ञानाने साध्य केलं आहे आणि त्यासाठी भारतात पुढाकार घेतला आहे तो ISRO (इंडियन सॅटेलाईट रिसर्च ऑर्गनायझेशन) या संस्थेने.

२०२२ मध्ये नियोजित केलेल्या ‘गगनयान’ या स्पेस रिसर्च अभियानासाठी ‘व्योम मित्र’ हा half humanoid म्हणजेच माणसांसारखा दिसणारा रोबोट तयार करण्यात आला आहे.

‘व्योम मित्र’ हा मुलीसारखा दिसणारा रोबोट आहे ज्याला की गगनयान या अभियानाच्या आधी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ‘व्योम मित्र’ ही बरीच तांत्रिक कामे करू शकते.

 

vyom mitra inmarathi

 

तिचं सर्वात महत्वाचं काम आहे ते स्पेसफ्लाईट ची सुरक्षेचे अपडेट्स चेक करणे आणि ते कळवत राहणे. व्योम मित्र ला दोन भाषा शिकवण्यात (प्रोग्राम करण्यात) आल्या आहेत.

व्योम मित्र ला अंतराळवीरांना त्यांच्या मिशन च्या दरम्यान मानसिक आधार देण्यासाठी सुद्धा ट्रेन करण्यात आलं आहे.

अंतराळवीरांना स्पेसक्राफ्ट बद्दल आवश्यक असणारी सगळी माहिती ही व्योम मित्र मध्ये स्टोर करण्यात आली आहे.

ज्याचा की अंतराळवीरांना खूप फायदा होणार आहे असा विश्वास ISRO चे चीफ के. सिवन यांनी व्यक्त केला आहे.

Humanoid हे नाव का देण्यात आलं?

व्योम मित्र ला half-humanoid हे नाव देण्याचं कारण हे आहे की, तिला माणसांप्रमाणे डोकं आहे, दोन हात आहेत आणि आपल्या शरीरा प्रमाणेच स्ट्रक्चर ठेवण्यात आलं आहे.

 

vyom mitra 2 inmarathi

 

फरक इतकाच आहे की, तिला पाय देण्यात आले नाहीयेत. तिच्या प्रत्येक कृतीवर ती कनेक्टेड असलेल्या कम्प्युटर चा कंट्रोल असणार आहे.

Artificial intelligence चा वापर हा आपल्याला लॅपटॉप आणि स्मार्टफोन च्या voice operating system मध्ये बघायला मिळतो.

Siri आणि Cortana या सुद्धा humanoid म्हणूनच ओळखल्या जातात.

व्योम मित्र हा शब्द संस्कृत भाषेतून घेण्यात आला आहे. व्योम म्हणजे अंतराळ आणि मित्र म्हणजे सखी. कारण, तिला एका मुलीचं रूप देण्यात आलं आहे.

तिचं काम हे अंतराळातील माणसांना पूर्ण सपोर्ट देणं असेल. व्योम मित्र नेमके कोणते काम करेल हे जाणून घेऊयात :

१. व्योम मित्र चं पहिलं काम हे अंतराळातील जागा माणसासाठी योग्य आहे की नाही ते बघणं हे असेल.

२. दुसरं म्हणजे, फ्लाईट मधील सेफ्टी उपकरणांचा योग्य वेळी वापर करणे.

३. तिसरं म्हणजे, ISRO मधील जमिनीवरील लोकांकडून सूचना मिळवणे आणि त्यांना अंतराळवीरांना समजावून सांगायच्या.

या शिवाय, सतत बदलणाऱ्या वातावरणा सोबत फ्लाईट चं वातावरण ऍडजस्ट करायचं आणि अंतराळवीरांना बदलणाऱ्या वातावरणाची सतत माहिती देत राहणं हे काम असणार आहे.

 

vyom mitra 3 inmarathi

 

वातावरण बघून कार्बनडायऑक्साईड बदलणे आणि crew module ला सतत चेक करणे आणि कोड लँग्वेज मध्ये उत्तर देणं हे असणार आहे.

व्योम मित्र चे ऑपरेशन्स माणसांप्रमाणे करण्यासाठी तिच्या हालचाली या आपल्या भाषेनुसार ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे.

मानसिक आधार:

व्योम मित्र ची निर्मिती करताना अंतराळवीरांना मानसिक आधाराची गरज असते ही गोष्ट मान्य करण्यात आली आहे.

कारण, जेव्हा तुम्ही इतक्या उंचीवर असतात तेव्हा तुम्ही आपण करतो तसं पटकन कोणाशी चॅट किंवा फोनवर बोलू शकत नाही.

ती पोकळी भरून काढण्यासाठी व्योम मित्र कडे एक पर्याय म्हणून बघण्यात येत आहे. ती तुमच्याशी बोलू शकते, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते.

स्पेसक्राफ्ट चं लौंचिंग होताना, लँडिंग होताना आणि अंतराळातील कक्षेत शिरताना होणारे बदल हे लगेच सगळ्यांना व्योम मित्र मुळे कळू शकणार आहेत.

त्यासोबतच, विविध ठिकाणी ट्रॅव्हल करत असताना अंतरळवीरांच्या हार्ट बिट्स रेट चा सुद्धा व्योम मित्र कडे असणार आहे.

त्यांच्या मानसिकतेत होणारा कोणताही बदल हा व्योम मित्र च्या नजरेतून चुकणार नाहीये. या माहितीचा फायदा ISRO आणि जगातील सर्व रिसर्च इन्स्टिट्युट ला होणार आहे.

 

isro robot inmarathi

 

गगनयान या मिशन साठी इंडियन एअर फोर्स च्या चार पायलट्स ची निवड करण्यात आली आहे. या चारही पायलट्स ला रशिया आणि भारतात ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

व्योम मित्र हे इसरो च्या तिरुअनंतपुरम युनिट च्या खूप वर्षांच्या मेहनतीचं फलित आहे. कोणत्याही महिला रोबोट ला अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

तिच्या लाँच च्या कार्यक्रमात तिने इसरो चं बॅज घालून, कम्प्युटर डेस्क वर बसून स्वतःची ओळख एखाद्या मुलीसारखी करून देऊन सर्वांमध्येच एक उत्साह निर्माण केला आहे.

के. सिवन यांनी चंद्रयान च्या वेळी घेतलेली मेहनत आपण सर्वांनी बघितलेलीच आहे.

त्या मिशन प्रमाणेच गगनयान या मिशन कडे सुद्धा पूर्ण देशाचं लक्ष असेल आणि सरकारचं प्रोत्साहन सुद्धा असेल या विश्वासाने २०२२ मध्ये होणाऱ्या या मिशन ला आपणही शुभेच्छा देऊयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?