' अखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे – InMarathi

अखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली नोटाबंदी याचा जबरदस्त परिणाम नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये दिसून आला. उत्तर प्रदेश एका तरुण चेहऱ्याला आपला भावी नेता म्हणून निवडणार अशी सगळीकडे (जास्त करून मिडियामध्ये) वावटळ उठली असताना, प्रत्यक्षात मात्र सर्वच अंदाज फोल ठरवत भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असा एकहाती विजय संपादन करून सगळ्यांनाच धक्का दिला.

नेमके असे काय घडले की वाऱ्याची दिशा फिरली? अखिलेश यादवांची उत्तर प्रदेशामधील प्रसिद्धी निवडणूक निकालामध्ये कुठे लोप पावली? समाजवादी पक्षाला खरंच उत्तर प्रदेशची जनता कंटाळली होती का? हे सर्व प्रश्न निकालानंतर प्रत्येक राजकारण प्रिय व्यक्तीला पडले होते. काहीसा याच प्रश्नांचा मागोवा घेतल्यास आपल्यापुढे उभी राहतात काही प्रमुख कारणे जी दर्शवतात की उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव नामक शिलेदाराचे पानिपत का झाले?

akhilesh-yadav-sad-marathipizza00

स्रोत

अखिलेश यादवांनी थेट नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्याचे ठरवले होते आणि त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर मोदींनी जनमानसात जी काही छाप पाडली आहे तिची जादू आजही ओसरलेली नाही. उत्तम नेतृत्वगुण आणि प्रशासनगुण यांचा विचार करता अखिलेश यादव मोदींच्या आसपासही फिरकताना दिसणार नाहीत. (हे आम्ही नाही, तर उत्तर प्रदेशातील परिस्थितीचं सांगते) त्यामुळे साहजिकच मोदींचे पारडे जड होते. उत्तर प्रदेश सोडा संपूर्ण देशामध्ये मोदींसारखा नेता नाही हे खुद्द राजकीय रथी महारथींनी देखील मान्य केले आहे. त्यामुळे जनता देखील तोच विचार करते हे आता सर्वच राजकीय पक्षांनी मान्य करायला हवं. त्यामुळे कमी अनुभवी असलेल्या अखिलेश यादवांचा वारू येथे चौफेर न उधळता अक्षरश: ‘उधळला गेला’.

प्रचाराच्या वेळी गेल्या दोन वर्षांतील भारतीय जनता पक्षाने केलेली योग ती चूक उचलून त्या बाबतील लोकांना विचार करायला लावण्यात अखीलेश यादव आणि इतर विरोधी नेते देखील कमी पडले. केवळ नोटाबंदी आणि रोजचे सामजिक प्रश्न सोडले तर त्यांच्याकडे दुसर काहीही बोलयलाच नव्हतं. त्यामुळे तेच मुद्दे, तोच मोदींचा द्वेष आणि आपण काय केलं हेच सांगण्यात अखिलेश यादवांचा वेळ गेला. त्यांचे सहकारी राहुल गांधीही काही वेगळ करणारे नव्हते. शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला.

akhilesh-yadav-sad-marathipizza

 

स्रोत

भारतीय जनता पार्टी हा जातीय पक्ष आहे या एकाच सुरावर अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशामधील उर्वरित राजकीय पक्षांनी स्वत:च जातीय मतांचे ध्रुवीकरण केले. निवडणूक प्रचारात हेच पाहायला मिळाले की सपा,बसपा, कॉंग्रेस आणि एमआयएम सर्वच पक्ष मुस्लीम मतदारांकडे धाव घेत होते. उत्तर प्रदेशात केवळ १/६ मुस्लीम मतदार आहेत. आता तुम्हीच सांगा एवढ्या मतदारांवर सगळे पक्ष अवलंबून कसे राहू शकतात? त्यातही बहुतांश मुस्लीम बहुल भागात भाजपाला अभूतपूर्व मतदान झाले आहे. म्हणजे यावेळेस उत्तर प्रदेशातील मुस्लीम जनतेने देखील जातीय आणि धर्मनिहाय राजकारणाला घरचा आहेर देत अखिलेश यादवांना घरी बसवले.

जेव्हा समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा उत्तर प्रदेशातील पोलीस हे बिगर-यादव जातींसोबत अधिकच जातीय झाले होते. या उर्वरित जातींना पोलिसांपासून संरक्षण मिळण्याऐवजी त्यांनाच पोलिसांपासून संरक्षण मिळवण्याची गरज होती. यात अखिलेश यादवांचा देखील हस्तक्षेप नव्हता. त्याचाच उद्रेक उत्तर प्रदेशातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये झाला.

akhilesh-yadav-sad-marathipizza02

 

स्रोत

अखिलेश यादवांनी काही विकासाची कामे केली असली तरी कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात मात्र ते पूर्णत: अपयशी ठरले होते. रोज सर्रास गुन्हे घडत होते. बलात्कार, खून, दरोडे यांची मोजदाद नव्हती. काही अपराधी तर त्यांचे सहकारी म्हणून वावरत होते. त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक नव्हता. अश्या परिस्थिती विकास काय कामाचा? याच विचाराने उत्तर प्रदेशातील जनतेने अखिलेश यादवांना नाकारत भाजपाच्या पारड्यात मत टाकले.

समाजवादी पार्टी म्हणजे एक प्रकारे संपूर्ण यादव कुटुंबचं होतं हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. राजकारणातील घराणेशाहीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून सपा कडे पाहिले जाऊ शकते. साहजिकच कुटुंबाबाहेरच्या नेत्यांना स्वत:ची कुवत आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळना. त्यातल्या त्यात निवडणुकीपूर्वीच या पक्षात ‘यादवी’ माजली. पक्ष तुटला, कुटुंब तुटले, साहाजिकच जी काही शक्ती होती ती विभागली गेली, अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आणि त्याचाच सर्वात मोठा फटका अखिलेश यादवांना बसला.

akhilesh-yadav-sad-marathipizza03

स्रोत

भाजपा तरी उत्तर प्रदेशामधील परिस्थिती बदलून तेथे सुशासनाचे राज्य निर्माण करेल ही उत्तर प्रदेशातील जनतेची आशा भाजपा पूर्ण करेल का याचं उत्तर येणारा काळचं देईल..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?