' "शतायुषी भव" हे वरदान लाभलेल्या गावाचं गुपित काय आहे ते जाणून घ्या!

“शतायुषी भव” हे वरदान लाभलेल्या गावाचं गुपित काय आहे ते जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वय वाढतं तसं माणसाची काम करण्याची क्षमता कमी होते अशी आपली एक धारणा आहे. हेच कारण आहे की, जवळपास जगभरात ५८ वर्ष हे निवृत्तीचं वय ठरवण्यात आलं आहे.

या वयात आल्यावर कित्येक व्यक्तिंचे काही अवयव हे आधीसारखे सुरळीत काम करत नाहीत असं एका पाहणीत लक्षात आलं आहे. वयाची अट नसलेले क्षेत्र म्हणजे कला क्षेत्र आणि राजकारण.

वय वाढत जातं तसं करिअर बहरत जाणे हे आपण अमिताभ बच्चन आणि रजनीकांत सर या दोघांच्या उदाहरणावरून मान्य करू शकतो.

 

big b rajani inmarathi

 

बिग बी अमिताभ यांनी पहिल्या इनिंग पेक्षा दुसऱ्या इनिंग मध्ये जास्त सिनेमे केले आहेत असं आकडे सांगतात.

रजनीकांत सरांच्या सिनेमाचं स्वागत त्यांचे चाहते आजही होर्डिंग ला दुधाचा अभिषेक करून करतात हे आपण बघतोच.

राजकारण क्षेत्र सुद्धा असंच आहे. तिथे ४८ वर्षाच्या नेत्याला तरुण नेता म्हणून संबोधलं जातं आणि ६५ व्या वर्षी पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीला कमी वयात संधी मिळाली असं बोललं जातं.

हि लोकं खरंच हे सिद्ध करतात की, “Age is just a number.”

जपान मधील ओकिनावा नावाचं एक गाव आहे. तिथे राहणाऱ्या लोकांचं वय हे वाढतच नाही किंवा त्याचा त्यांच्यावर फरकच पडत नाही असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

त्याला कारणही तसंच आहे. २०१७ च्या जपानच्या जनगणने नुसार, ओकिनावा या गावात ४५० लोक आहेत जे की १०० वर्ष वयापेक्षा जास्त आहेत.

ओकिनावा हे जपानच्या दक्षिणेकडील एक गाव आहे.

 

okinawa 2 inmarathi

 

त्या आधी म्हणजे २००२ मध्ये असं लक्षात आलं होतं की, ओकिनावा मध्ये दर १ लाख लोकांपैकी ३४.७ टक्के लोक हे १०० वर्ष आयुर्मानापेक्षा जास्त आहेत.

जे की जगातील कोणत्याही ठिकाणापेक्षा जास्त आहे. याच कारणामुळे ओकिनावा या गावाला “healthiest place on the earth” हा किताब देण्यात आला आहे.

 

कमी आजारपण :

 

okinawa 3 inmarathi

 

ओकिनावा मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याचं प्रमाण सर्वात कमी आहे.

जपान च्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ च्या रिपोर्ट नुसार, १९७५ मध्ये सुरू झालेल्या या अभ्यासा नुसार पूर्ण ओकिनावा भागात ९०० लोक हे १०० वर्ष वयापेक्षा जास्त आहेत.

शिवाय, ८०% प्रमाण हे हृदयविकार होण्याचं कमी आहे आणि कॅन्सर ची रिस्क सुद्धा ५०% कमी आहे.

या अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की, जवळपास ९७% लोक हे कोणत्याही आजाराशिवाय त्यांचं आयुष्य सुखाने जगतात.

या सर्व गोष्टींचं कारण म्हणजे तिथल्या लोकांचा समतोल आहार, कमी स्ट्रेस घेण्याची वृत्ती आणि एकमेकांची काळजी घेणारी कम्युनिटी ही प्रमुख कारणं सांगण्यात आली आहेत.

 

आहार :

 

okinawa diet inmarathi

 

ओकिनावा इथे राहणारे लोक हे वनस्पतीजन्य आहारच घेतात. त्यासोबतच, ते कमीत कमी तेलात तळलेले पदार्थच खातात. ते लोक नॉन व्हेज खातात. पण, फक्त काही निवडक वेळीच.

सोयाबीन आणि इतर कडधान्य हेच त्यांचं प्रमुख खाद्य आहे. टोफू किंवा मिसो सूप हे सुद्धा त्यांचा आवडता पदार्थ आहे.

टोफू मधील फ्लेवोनाईड्स हे हृदयाच्या आजारापासून दूर ठेवते तर सोयाबीन मुळे शरीराला पाचक द्रव्ये मिळत असतात.

Mugwort, अद्रक, हळदीचं तेल हे ओकिनावा च्या लोकांच्या स्वयपाकात नेहमी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे कोणताही रोग त्यांच्या आसपास फिरकत नाही.

 

ऍक्टिव्ह राहणे :

 

okinawa 4 inmarathi

 

घरात उगवलेल्याच भाज्या खात असल्याने त्यांना नेहमी ताज्या भाज्या खायला मिळतात आणि घरात गार्डनिंग केल्याने त्यांचा व्यायाम सुद्धा होतो. चालणं हा त्यांचा आवडतं काम आहे.

ते करत असताना त्यांना व्हिटॅमिन D सुद्धा मिळतं आणि त्यांची हाडं मजबूत होतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.

ओकिनावा च्या कोणत्याही घरात अगदी कमीत कमी फर्निचर आहे. प्रत्येक जण हा जेवायला खाली जमिनीवरच बसतो.

त्यामुळे त्यांचं शरीर हे ऍक्टिव्ह राहतं असं अभ्यासात निदर्शनास आलं आहे.

सकारात्मक विचारसरणी :

ओकिनावा च्या लोकांमध्ये असलेली सकारात्मक विचारसरणी ही या सर्व गोष्टींना पूरक ठरते हे जाणकार सांगतात. ते फक्त त्यांच्या शरीराचीच काळजी घेत नाहीत तर मनाची सुद्धा काळजी घेतात.

“इकिगाई” ही पद्धत ते फार लवकर आत्मसात करतात ज्यामध्ये लोकांना त्यांच्या जगण्याचं कारण (purpose of life) हे स्वतःला क्लिअर करायला लावतात.

 

japan inmarathi

 

काही वयस्कर मंडळी हे त्यांच्या जगण्याचं कारण नेहमी एकमेकांना सकाळी उठल्यावर सांगत असतात.

जगण्याचं ध्येय क्लिअर असल्याने ओकिनावा मधील लोकांना कायम एका जवाबदारीची जाणीव होत असते आणि आपण आपल्या शंभरीत सुद्धा ठणठणीत का असावं? हे त्यांना क्लिअर असतं.

सोशल मीडिया म्हणजेच सोशल नेटवर्किंग हा एक समज आपल्या सर्वांमध्ये दृढ झाला आहे.

ओकिनावा चे लोक या गोष्टीला बाजूला ठेवतात आणि त्यांना पटलेली ‘मोआई’ ही गोष्ट फॉलो करतात ज्यामध्ये प्रत्येक कम्युनिटी मधील लोक हे प्रत्यक्ष एकत्र येतात आणि ते एकमेकांना आर्थिक आणि भावनिक मदत करतात.

‘मोआई’ या कन्सेप्ट मुळे त्यांच्यापैकी कोणत्याही व्यक्तीला आपण एकटे असल्याची भावना कधीच येत नाही. त्यामुळे ते नेहमीच हसतमुख आणि सुखी असतात.

 

moai inmarathi

 

ओकिनावा चे लोक जे काही करतात त्यापैकी कोणती गोष्ट आपल्याला माहीत नाहीये? थोडा विचार करा. एकही गोष्ट तुम्हाला आठवणार नाही.

माहीत सगळं आहे, पण आचरणात फार कमी गोष्टी आणल्या आहेत अशी आपली गत सध्या आहे.

जेव्हा आपण I for not just information, but I for also Implementation हे मान्य करू तेव्हा आपणही ओकिनावा च्या लोकांसारखे दीर्घायुषी होऊ शकतो यावर आपण नक्की विचार करायला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?