'"५ कोटी जिंकले आणि माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ सुरू झाला" - सुशील कुमार

“५ कोटी जिंकले आणि माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ सुरू झाला” – सुशील कुमार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखाद्या वस्तूची कमतरता ही आपल्याला त्या वस्तूची कदर करायला शिकवत असते. मुबलकता असली, की आपण गोष्टींना गृहीत धरायला शिकतो.

शाश्वत काहीच नाहीये हे माहीत असूनही आपण स्वतःला ब्रेक लावू शकत नाही आणि प्रवाहासोबत वाहून स्वतःला आणि इतरांनाही आपल्या स्वभावाने आपण नकळत त्रास देत असतो.

उदाहरण सांगायचं तर, मध्यंतरी आपल्या सर्वांकडे खूप वेळ होता, पण काहींनी तो निरर्थक वाया घालवला, काहींनी त्या वेळेत स्वतःचे स्किल्स आणि बिजनेस वाढवले. काही लोक फक्त ‘मार्केट खराब आहे’ अशी दूषणं देत बसलेली आपण बघतच आहोत.

याचा अर्थ, तुम्ही उपलब्ध वेळेचा आणि वस्तूंचा विनियोग कसा करता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.

मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं तर, Abundance (मुबलकता) आणि Scarsity (कमतरता) यापैकी कोणतीही परिस्थिती आली की गोष्टी मॅनेज करायला शिकावं लागतं. तसं नाही झालं तर, तुमचा प्रोजेक्ट फसतो.

सामान्य माणूस हा अर्ध आयुष्य कमतरता पूर्ण करण्याचाच संघर्ष करत असतो. जेव्हा खूप पैसे असतील तेव्हा मी कसा वागेन? या बद्दल फार कमी लोक विचार करतात आणि खूप पैसे आले की चुका करतात.

बिहार मध्ये राहणारा सुशील कुमार – एक आपल्या सारख्याच मध्यम वर्गीय कुटुंबातील व्यक्ती. खूप हुशार, अभ्यासू आणि प्रचंड मेहनती.

 

sushil kumar inmarathi1

 

त्याच्या अभ्यासाच्या जोरावर त्याने भारतातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती?’ मध्ये भाग घेतला. तो फास्टेस्ट फिंगर फर्स्ट क्रॉस करून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या समोर जाऊन बसला.

खूप संयमाने आणि स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवत खेळला आणि चक्क पाच कोटी पर्यंत पोहोचला. तो जिंकला. आपण सर्वांनी त्याचं खूप कौतुक केलं. पूर्ण भारताने त्याच्या या achievement बद्दल त्याचं अभिनंदन केलं.

खऱ्या आयुष्यात इंग्रजी स्टोरी प्रमाणे ‘…. & they lived happily ever after’ असं होत नाही. सुशील कुमार च्या बाबतीत सुद्धा तेच झालं. ५ करोड तर आले. पण, ते वापरायचे कसे हा प्लॅन त्याच्या डोक्यात काहीच तयार नव्हता.

तो फक्त त्याला रातोरात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे हवेत तरंगत होता. रोज नवीन नवीन सत्कार समारंभ गाजवत होता. रोज वेगवेगळ्या चॅनल्सला मुलाखत देत होता.

 

sushil kumar inmarathi3

 

महिन्यातील पंधरा दिवस तो याच कामात व्यस्त होता. अभ्यास कधीच मागे पडला होता. त्याला स्पर्धा परीक्षा देऊन administrative services मध्ये जायचं होतं. ते कधीच मागे पडलं होतं.

२०११ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ च्या पाचव्या सिझन मध्ये जिंकलेली बक्षिसाची रक्कम हळूहळू संपत चालली होती. सुशील कुमारला सिगरेट, दारुची सवय लागली होती.

 

sushil kumar inmarathi2

 

 

हे कोणत्या न्यूज रिपोर्टर ने नाही तर स्वतः सुशील कुमार ने फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्ट मध्ये हे लिहिलं आहे…

“कौन बनेगा करोडपती (KBC) मध्ये जिंकल्यानंतर माझं आयुष्य सुखकर होण्यापेक्षा जास्त खडतर झालं. २०१५ – १६ हे दोन वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त परेशान करणारे होते कारण मला पुढे काय करावं हे काहीच समजत नव्हतं.

मी पत्रकारांना सांगताना काही तरी बिजनेस करणार आहे हे सांगत होतो, पण त्यापैकी कोणताही बिजनेस व्यवस्थित estsblish होतच नव्हता.

काही दिवसातच लोकांना माझी ओळख एक दानशूर व्यक्ती म्हणून होऊ लागली. मी स्वतः कमावलेल्या पैशातून मी दर महिन्यात ५०,०० रुपये दर महिन्यात विविध सेवाभावी संस्थांना दान करू लागलो.”

सुशील कुमार यांनी त्यानंतर एका कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय करत असताना त्यांची ओळख काही मीडियाचं शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांसोबत झाली. जे की रंगभूमी कलाकार सुद्धा होते.

त्यांच्याकडून सुशील कुमार यांना बरीच माहिती मिळायची. आपल्याला काही गोष्टींचा अनुभव नाहीये या उत्सुकतेपोटी त्या मुलांना असलेली दारू, सिगरेटची सवय सुशील कुमार यांनी सुद्धा स्वतःला लावून घेतली होती.

त्याच काळात सुशील कुमार यांना सिनेमा बघण्याची सवय लागली. ते रोज लॅपटॉप वर सिनेमा बघण्यात वेळ वाया घालवू लागले. त्यांना असं वाटू लागलं, की एका दिग्दर्शकाला लागणारे सगळे गुण त्यांच्यात आहेत.

त्या नादात ते एकच सिनेमा परत परत बघू लागले. ‘प्यासा’ हा सिनेमा त्यांनी इतक्या वेळेस बघितला की एक वेळ अशी आली की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या या आवडीला कंटाळून घर सोडून जाण्याची धमकी दिली. तरीही सुशील कुमार ताळ्यावर आले नाहीत.

त्यांची पत्नी वडिलांकडे निघून गेली आणि त्यांनी सुशील कुमार यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. आपलं हे नातं टिकवण्यासाठी सुशील कुमार यांनी पत्नीकडे जाण्यापेक्षा एक दिग्दर्शक होऊन मगच पत्नीला भेटायचं ठरवलं.

काही दिवसात सुशील कुमार हे मुंबईला आले. सिनेमा दिग्दर्शक होण्यासाठी ते लोकांना भेटू लागले. एका निर्मात्या मित्राच्या मदतीने सुशील कुमार यांनी स्वतः लिहिलेली एक स्क्रिप्ट एका निर्मात्याला वीस हजार रुपयात विकली.

निर्माता मित्राच्या सल्ल्यानुसार, सुशील कुमार यांनी टीव्ही सिरियल्ससाठी काम करण्याचा ठरवलं.

काही दिवस त्याच टीव्ही सिरीयल च्या सेट वर काम करून सुशील कुमार हे कंटाळले होते. एक दिवशी ते कंटाळून तिथून बाहेर पडले आणि एका गीतकार मित्राच्या घरी रहायला गेले.

दिग्दर्शक होता येत नाहीये हा विचार सुशील कुमार यांना सतावत होता. ते पुन्हा दिवस दिवस लॅपटॉप वर सिनेमा बघू लागले, सोबत आणलेले पुस्तक वाचू लागले आणि दिवसाला एक सिगरेटचं पाकीट संपवू लागले.

“जेव्हा काम नाही करायचो तेव्हा मी फक्त रूम वर बसून सिगरेट प्यायचो” हे पुढे सुशील कुमार यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

 

no smoking inmarathi

 

आपण हे सगळं एन्जॉय करत नाही आहोत हे सुशील कुमार यांना लक्षात आलं आणि त्यांना असं वाटू लागलं, की आपण मुंबई ला आपल्या आवडीने नाही, तर स्वतः पासून पळून जाण्यासाठी आलो आहोत. जे की कुठेही गेलं तरी शक्य नसतं.

तुमच्या मनाला आवडेल ती गोष्ट केली तरच तुम्ही सुखी असता, हे कळायला सुशील कुमार यांना उशीर लागला.

योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवावा हे सुशील कुमार यांना त्यांची पत्नी नेहमी सांगायची, पण तेव्हा ते तिच्यासोबत वाद घालायचे.

कित्येक लोकांनी सुशील कुमार यांना चांगल्या कामासाठी पैसे हवे आहेत म्हणून सांगितलं आणि ते त्या लोकांनी ते पैसे त्या लोकांनी कधीच परत केले नाहीत.

स्वतः सोबत वेळ घालवताना या गोष्टी जाणवल्या की, कोणता सेलेब्रिटी होण्यापेक्षा आपण आधी एक माणूस म्हणून चांगलं होणं अत्यंत आवश्यक आहे.

sushil kumar inmarathi4

 

छोट्या गोष्टींमधून आनंद शोधायला शिकलो, तर आपण किती तरी चांगलं आयुष्य जगू शकतो. त्यांनी सिगरेट पिणं सोडून दिलं. मुंबई सोडून बिहार मध्ये परत आले.

शिक्षक बनण्यासाठी तयारी सुरू केली आणि ते शिक्षक म्हणून एका कॉलेज मध्ये जॉईन झाले. ‘पर्यावरण’ या विषयामधील रुची सुशील कुमार यांना शिक्षक झाल्यावरच कळली.

“मी आता आधीपेक्षा खूप उत्साही असतो आणि नेहमी पर्यावरणाबद्दल जागरूकता पसरवण्याची संधी शोधत असतो. मला आता फक्त जगण्यासाठी आवश्यक तितकेच पैसे कमवायची इच्छा आहे. माझ्याकडून पर्यावरण संवर्धनासाठी जास्तीत जास्त काम होईल याकडे माझं इथून पुढे पूर्ण लक्ष असेल.”

या वाक्याने सुशील कुमार यांनी त्यांची फेसबुकवर लिहिलेली पोस्ट संपवली आहे आणि आपल्या सर्वांना त्यांचा २०११ ते २०२० पर्यंत चा प्रवास सांगितला आहे.

सुशील कुमार यांची ही पोस्ट मधून या गोष्टी Take away म्हणून घेऊ शकतो:

१. यश मिळाल्यावर कसं वागावं आणि कसं वागू नये हे सुशील कुमार यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवलं आहे.

२. “तुमचा प्लॅन तुमच्याकडे तयार पाहिजे, इतरांच्या मनाने चालाल, तर कुठेही जाऊ शकणार नाही.”

३. चांगल्या सवयींना कधीही सोडू नये, कारण त्या सोडल्या तर प्रत्येक गोष्ट ही तुमच्या पासून लांब जाते आणि तुमची परिस्थिती “दैवं देतं आणि कर्म नेतं” अशी होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?