' जुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे! – InMarathi

जुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल प्रत्येकच जण आपल्या स्वास्थ्याबाबत प्रचंड जागरूक झालेला आहे. कोविडने सगळ्यांच्याच नाकी नऊ आणले आहेत.

त्यामुळे प्रत्येकजण आपली प्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल आणि जास्तीत जास्त कसे सुरक्षित राहता येईल ह्याच प्रयत्नात आहे.
पण त्यामुळे आपण इतर आजारांकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना?

सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. त्यातलाच एक प्रमुख आजार म्हणजे डायरिया. जो अगदी कोणालाही होऊ शकतो.

डायरियावर जरी उपचार उपलब्ध असले तरी, कुठल्याही आजाराने आपली प्रतिकार शक्ती क्षीण होतेच आणि सध्याच्या काळात आपल्याला ही रिस्क परवडणारी नाही.

 

diareha inamarathi

 

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी डायरिया ज्याला आपण अतिसार असेही म्हणतो, त्यात आपण काय खाऊ शकतो आणि काय खाणं टाळावं ही महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती घेऊन आलो आहोत.

जेणेकरून आपण आजार लवकर आटोक्यात आणून आपली प्रतिकार शक्ती लवकरात लवकर मूळपदावर आणू शकतो.

अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या खण्यापिण्याच्या सवयी.

त्यामुळे, आजारावर ताबा मिळवायचा तर खाण्यापिण्याच्या बाबतीत चौकस असणं जास्त महत्वाचं आहे.

तरी बरेचदा संपूर्ण काळजी घेऊनही आपण अतिसाराला बळी पडतोच. अशावेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय काळजी घेता येईल ते बघूया.

संबंधित आजाराने ग्रासलेले असताना पचायला जड असे पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत. जेणेकरून त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या तुमच्या पचनसंस्थेवर आणखी ताण येणार नाही.

 

digestive system inmarathi

 

अशावेळी रोजच्याच आहारात थोडाफार बदल करून आपण अतिसारावर सहजतेने मात करू शकतो.

त्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ह्यासोबतच कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, कोणते पदार्थ आवर्जून टाळायला हवेत हे लक्षात घेतले पाहिजे.

आपली भारतीय आहारपद्धती तशी आदर्श आहेच पण अतिसार झाल्यास त्यात थोडे बदल करणे आवश्यक आहे. पैकी आपण खालील पदार्थ अतिसारात टाळणे आवश्यक आहे.

 

१. दूध :

milk featured inmarathi

दूध हा एरवी आपल्या आहारातील कितीही महत्वाचा घटक असला तरी अतिसारात मात्र दुधाचे सेवन करू नये.

कारण दुधातील शर्करा आपल्या आतड्यांना त्रासदायक ठरते आणि आतिसाराचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरते.

 

२. तिखट आणि मसालेदार पदार्थ :

 

spicy food inmarathi

मिरची आणि मसाल्यांमध्ये पित्त वाढवणारे घटक असतात असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आतड्यांत जळजळ वाढण्याची शक्यता असते त्यामुळे असे पदार्थ टाळणे कधीही उत्तम.

 

३. कॉफी आणि चहा :

 

tea-coffee1-inmarathi

चहा आणि कॉफीतील तरतरी आणणाऱ्या उत्तेजक द्रव्यांमुळे, मज्जासंस्था संवेदनशील होते ज्यामुळे समस्येत वाढ होण्याची शक्यता असते.

 

४. मद्य :

 

alcohol-eyes-effects-inmarathi0
gazetapaloma.net

दारू किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन करणे तसेहि हानिकारकच असते!

अतिसारांत मद्यपान करणे हे घातक ठरू शकते, कारण अतिसारामुळे शरीरातली पाण्याची कमी झालेली पातळी मद्यपानामुळे आणखीनच कमी होते.

जे निश्चितच आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.

 

५. तंतुमय पदार्थ :

 

sprouts inmarathi

 

आपल्या दैनंदिन आहारात तंतुमय पदार्थांचे सेवन करणे हे प्रचंड फायद्याचे असले तरी अतिसार झाल्यास मात्र हे तंतुमय पदार्थ खाणे टाळावे.

कारण अतिसारात आपली पचनशक्ती क्षीण झालेली असते ती हे तंतुमय पदार्थ नीट पचवू शकत नाही आणि समस्या कमी होण्याऐवजी त्यात वाढच होते.

 

६. साखरेला पर्याय :

 

sugar inmarathi

साखरेला पर्यायी पदार्थ इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याच्या वाढीवर परिणाम करतात, ज्यामुळे आतडे सैल होतात आणि त्यामुळे अतिसाराचे प्रमाण वाढते.

 

७. लाल मांस :

 

red meat-inmarathi01

मांसाहार तसाही पचायला जड असतोच त्यामुळे टाळणेच श्रेयस्कर आहे परंतू त्यातल्या त्यात लाल मांस आवर्जून टाळावे, ह्यातले चरबीचे प्रमाण अतिसारात गंभीर ठरू शकते.

 

८. लिंबूवर्गीय फळे :

 

lemonade1-inmarathi

लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन पूर्णपणे टाळावे, त्यातील आम्ल घटकांचे अतिसारामुळे आधीच नाजूक असलेल्या आपल्या पोटावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

तर औषधोपचार घेत असतानाच जर वरीलपैकी पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले तर लवकरच अतिसारातून सुरक्षित बाहेर पडणे सोपे होते.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?