' जगातील सर्वात महागड्या तसेच आशिया खंडातील सर्वाधिक लक्झरियस रेल्वेत बसल्यावर तुम्हाला `महाराजा’ असल्यासारखं वाटेल – InMarathi

जगातील सर्वात महागड्या तसेच आशिया खंडातील सर्वाधिक लक्झरियस रेल्वेत बसल्यावर तुम्हाला `महाराजा’ असल्यासारखं वाटेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

महाराजा एक्सप्रेसचं नाव कधीतरी तुमच्या कानी पडलचं असेल आणि या एक्सप्रेसची महती देखील तुम्ही ऐकून असाल. चला तर आज जाणून घेऊया एवढं काय विशेष आहे या महाराजा एक्सप्रेसबद्दल!

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA01

स्रोत

महाराजा एक्सप्रेस ही IRCTC (Indian Railways Catering and Tourism Corporation) च्या मालकीची असून भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात लक्झरियस रेल्वे म्हणून तिचा नावलौकिक आहे. तसे तर्फे  The World Travel Awards, जगातील अग्रगण्य लक्सरीयस रेल्वे म्हणूण 2012, 2013 and 2014 अश्याप्रकारे सलग तिसऱ्यांदा या एक्सप्रेसचा गौरव करण्यात आलेला आहे.  अजून एक खास गोष्ट म्हणजे ही जगातील सर्वात महागडी रेल्वे देखील आहे.

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA02

स्रोत

मार्च २०१० मध्ये महाराजा एक्सप्रेसची सुरुवात करण्यात आली. या महाराजा एक्सप्रेसमध्ये तुम्ही म्हणाल त्या सुखसोयी तुम्हाला आढळतील. टीव्ही, वाय-फाय, बार, लोन्ज पासून सर्व लक्झरी लाइफस्टाइल तुम्ही येथे अनुभवू शकता. येथील जेवण तर अगदी लाजवाब असतं. तुम्हाला अश्या अश्या डिशेस चाखायला मिळतील ज्यांबद्दल तुम्ही कधी ऐकलही नसेल.

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA03

स्रोत

तब्बल अर्धा किमी लांब आणि एकूण २३ डब्ब्यांची महाराजा एक्सप्रेस दर बुधवारी एका अविस्मरणीय प्रवासासाठी निघते. तब्बल सात रात्री आणि आठ दिवस ही अद्भुत एक्सप्रेस प्रवाश्यांना भारताची वेगळ्या नजरेने सफर घडवून आणते.

महाराजा एक्सप्रेसमध्ये तीन क्लास पाहायला मिळतात- Silver class, Gold class and Platinum class! या क्लासेसनुसार त्यात मिळणाऱ्या सेवा देखील वेगवेगळ्या असतात.

महाराजा एक्सप्रेसची तिकीट त्यांच्या क्लासनुसार जवळपास २ लाख ते १४ लाखांच्या घरात आहे.

चला तर आज छायाचित्रांच्या माध्यमातून या नयनरम्य एक्सप्रेसची सफर करूया!!

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA04

स्रोत

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA05

स्रोत

स्रोत

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA07

स्रोत

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA08

स्रोत

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA09

स्रोत

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA10

स्रोत

MAHARAJA-EXPRES-MARATHIPIZZA11

स्रोत

सर्वसामान्यांना हा प्रवास परवडण्यासारखा नाही, पण कधीतरी महाराजा एक्सप्रेस अनुभवायला मिळेल अशी भाबडी का होईन आपण आशा ठेवायला काय हरकत आहे? आणि जर प्रत्यक्षात आली तर काय, मज्जाच मज्जा!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?