' झोपण्यापूर्वीच्या या साध्या-सोप्या सवयी मिळवून देतील सर्वांगसुंदर, निरोगी शरीर! वाचा

झोपण्यापूर्वीच्या या साध्या-सोप्या सवयी मिळवून देतील सर्वांगसुंदर, निरोगी शरीर! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणसाचं व्यक्तिमत्व कसं आहे हे त्याच्या बाह्यरूपावरूनच कळतं. जरी आपण कितीही म्हणत असलो, की माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे हे महत्त्वाचा आहे, तरीदेखील माणसाच्या सर्वसाधारण स्वभावानुसार पहिल्यांदा त्याच्या बाह्यारुपाकडेच लक्ष जातं, म्हणूनच माणसाने प्रेझेंटेबल दिसावं.

आपण स्लिम अँड ट्रीम, फिट अँड फाइन राहण्याकरिता दक्ष असतो, पण आपण आपल्या त्वचेकडे मात्र फारसं लक्ष देत नाही. या चुका स्त्री-पुरुष दोघांकडूनही होताना दिसतात.

केवळ मुलींनीच नाही, तर मुलांनीही आपल्या त्वचेकडे लक्ष दिले पाहिजे. आपण आपल्या त्वचेच्या बाबतीत काही चुका करतो. त्याबरोबरच त्या चुका टाळण्यासाठी काय करता येईल ते देखील पाहणे गरजेचे आहे.

 

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा : 

 

washing-her-face InMarathi

 

कोणतेही स्कीन एक्सपर्ट आपल्याला सांगतील, की रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवायला हवा.

याचं कारण म्हणजे आपण दिवसभर आपल्या चेहऱ्यावर काही मेकअप चढवत असतो. यात मुलंही मागे नसतात. तेही एखादं मॉइस्चरायझर, सनस्क्रीन लोशन, पावडर या गोष्टी बाहेर जाताना चेहऱ्यावर लावतातच.

बाहेर गेल्यानंतर बाहेरची धूळ देखील आपल्या चेहऱ्यावर बसते आणि आपल्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे, त्वचा काळवंडणे, पॅचेस येणे प्रकार घडतात. त्वचेला मिळणारं पोषण बंद होतं.

रोज रात्री चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहरा धुतल्याशिवाय आपला चेहरा उशीवर ठेवू नये.

मुलींनी/महिलांनी जर खूप मेकअप केलेला चेहरा असेल, तर सगळ्यात आधी फेशियल क्लींजर वापरुन चेहरा स्वच्छ करून मग धुवावा. यामुळे त्वचा स्वच्छ राहते.

 

त्वचेच्या प्रकारानुसार योग्य स्कीन प्रॉडक्ट वापरा :

 

skin products inmarathi

 

बऱ्याचदा आपण एक प्रकारचेच स्कीन प्रॉडक्ट दिवसभर वापरतो. परंतु काही स्कीन प्रॉडक्ट हे दिवसासाठी तर काही रात्रीसाठी वापरण्यासाठी बनवलेली असतात.

उदाहरणार्थ, सनस्क्रीन हे दिवसाच वापरलं पाहिजे. काही फळांच्या साली रात्री लावून तुम्ही बसू शकता किंवा आजकाल बाजारात रात्रभर चेहऱ्यावर लावायचे फेसमास्क मिळतात, त्याचाही वापर करता येईल.

त्याशिवाय उन्हाळ्यात वेगळी स्कीन प्रॉडक्ट, तर हिवाळ्यात वेगळी स्कीन प्रॉडक्ट वापरली पाहिजेत.

याचबरोबर स्वतःच्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्कीन प्रॉडक्ट निवडलं पाहिजेत. कोरड्या त्वचेसाठी वेगळे स्कीन प्रॉडक्ट असतात, तर तेलकट त्वचेसाठी वेगळे. चुकीच्या स्कीन प्रॉडक्टमुळे देखील आपल्या त्वचेला नुकसान होऊ शकते.

 

उशी आणि उशीची खोळ बदला : 

 

Pillow good or Bad Inmarathi

 

उशीची खोळ आठवड्यातून दोनदा तरी बदललेली असली पाहिजे. त्याचबरोबर उशा देखील धुतल्या गेल्या पाहिजेत. जेणेकरून उशी आणि उशीच्या कव्हरवर जमणारी धूळ आपल्या चेहऱ्याचं नुकसान करणार नाही.

उशीवर आपण डोकं टेकवतो त्यामुळे केसांना लावलेलं तेल, केसांवरची धूळ, झोपेत येणारा घाम देखील ऊशीवर बसतो आणि त्याचा आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

उशीची खोळ ही मऊ आणि चांगल्या प्रतीच्या सिल्कच्या कपड्याची असावी. चांगल्या प्रतीच्या सिल्कमध्ये नैसर्गिक प्रोटीन्स आणि अमिनो अॅसिडस असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

 

ऋतु-हवामानाबद्दल जागरूकता बाळगा : 

आपल्या आजूबाजूच्या हवेचाही परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. जर आपल्या आजूबाजूची हवा कोरडी असेल, तर चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढतं.

 

skin care inmarathi

 

जर कायमच ए.सी किंवा पंखा वापरात असेल, तर आपल्या घरातील खोलीतील हवा देखील कोरडी बनते. म्हणूनच रात्री झोपताना खोलीमध्ये आर्द्रता राहिली पाहिजे याची काळजी घ्यायला हवी.

आज-काल खोली आर्द्र ठेवण्याची उपकरणं बाजारात मिळत आहेत. ए.सी लावायचा असेल तर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे.

 

टवटवीत, सतेज कांतीसाठी वर सांगितलेल्या सवयी नियमितपणे अंगी बाणवा.
त्यासोबतच आपल्या इतर महत्वाच्या अवयवांची देखील आपण खालीलप्रमाणे विशेष काळजी घेतली पाहिजे.

ओठ

 

lip balm inmarathi

 

कोरड्या वातावरणामुळे ओठ देखील खरखरीत होतात. त्यांची काळजी घेतली नाही तर ते फाटू ही शकतात, म्हणून ओठांनाही लिपबाम लावला पाहिजे.

हात

आपले हात स्वच्छ आणि मुलायम राहावेत यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. कारण कुठलीही गोष्ट द्यायला घ्यायला आपले हातच समोर जातात.

सध्या covid-19 मुळे सतत हात धुणे आणि सॅनिटायझर वापरल्यामुळे हात रखरखीत होतात. त्यासाठी रात्री झोपताना हात देखील स्वच्छ धुऊन त्यावर मॉइश्चरायझर लावायला हवं.

ज्या मुली नख वाढवतात, त्यांनी नखांची देखील काळजी घेणे गरजेचे असते. सगळ्यांनीच आपली नखे स्वच्छ ठेवली पाहिजेत आणि वेळोवेळी कापली पाहिजेत.

डोळे

 

 

चेहऱ्यावरील महत्त्वाचा भाग म्हणजे डोळे. परंतु बर्‍याच जणांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. ती येऊ नयेत हे टाळण्याकरिता आय मॉइस्चरायझर मिळतं, त्याचा वापर करावा. डोळ्याखाली येणार्‍या सुरकुत्या आणि काळी वर्तुळ कमी होतील.

केस

झोपताना केस बांधून झोपल्याने त्याचा नक्कीच फायदा होतो. याचं कारण म्हणजे एकतर सकाळी उठल्यावर केसांचा गुंता होत नाही. आणि झोपेत आपला चेहरा केसांवर जात नाही.

मोकळे केस ठेवले तर केसांमधील तेल आणि धुळ चेहऱ्यावर येते आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो.

दात

 

brushing-teeth-inmarathi

 

सौंदर्य हे केवळ बाहेरूनच दिसतं असं नव्हे, तर ते आपल्या शरीरातही राहायला हवे. यासाठीच रात्री झोपताना दात घासायला सांगितलं जातं.

रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने दात घासले पाहिजेत. त्यामुळे श्‍वासाची दुर्गंधी कमी होते, आणि दातस्वच्छ राहिल्यामुळे दातांना कीड ही लागत नाही.

पाय

ज्या दोन पायांवर माणूस आयुष्यभर उभा राहतो त्यांच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो. लोकांच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या असतात. थंडीच्या दिवसात हा त्रास जास्त जाणवतो.

म्हणूनच घरामध्ये वावरतानाही घरातली चप्पल किंवा मोजे घालावेत. जेणेकरून जमिनीवरची धुळ पायांच्या टाचांमध्ये जाणार नाही.

 

socks inmarathi

 

भेगाळलेल्या टाचा टाळण्याकरिता गरम पाण्याने पाय स्वच्छ धुऊन, पूर्ण कोरडे करून टाचांवरती पेट्रोलियम जेली लावावी. असे काही दिवस केल्यानंतर पायांच्या टाचा मऊ झालेल्या दिसून येतील. तसेच टाचांवरच्या भेगाही कमी होतील.

या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आंतरिक ऊर्मीतून केल्या तर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व सगळ्यांसमोर प्रभावी ठरेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?