महाराष्ट्रात ‘ही’ ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे आजही देते ब्रिटीश कंपनीला भाडे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय रेल्वेचा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांना एक गोष्ट माहित असेल की स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वे या खाजगी ब्रिटीश कंपन्यांच्या मालकीच्या होत्या. या कंपन्या विदर्भातून इंग्लंड मधील मॅनचेस्टर पर्यंत कापूस वाहून न्यायच्या. जसजसा काळ लोटला तसतशी या रेल्वेमधून प्रवाश्यांची वाहतूकही सुरु झाली. या ट्रेन GIPR (Great Indian Peninsular Railway) मार्फत चालवल्या जायच्या, पुढे स्वातंत्र्यानंतर त्याचे Central Railway (CPRC) असे नामकरण झाले. हे तेव्हा घडलं जेव्हा भारतीय रेल्वे राष्ट्रीयकृत झाली.

 

british-raliway-marathipizza01

स्रोत

१९५१ नंतर जेव्हा संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा एका छताखाली आणण्यात आल्या, तेव्हा एक रेल्वे लाईन मात्र उरली. त्याला शकुंतला रेल्वे असे म्हणतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही रेल्वे लाईन आपल्या महाराष्ट्रात आहे. काय म्हणता? अजूनही याबद्दल माहिती नाही, चला तर मग जाणून घेऊया.

१९१० मध्ये शकुंतला रेल्वे सुरु करण्यात आली. तेव्हा ही रेल्वे Central Provinces Railway company( CPRC) मार्फत चालवली जायची. GIPR च्या अंतर्गत येणारी प्रत्येक रेल्वे भारतीय रेल्वेच्या एकीकरणावेळी राष्ट्रीयकृत झाली, परंतु शकुंतला रेल्वे मात्र वेगळी राहिली. असे का? याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

british-raliway-marathipizza03

स्रोत

ही रेल्वे अजूनही Killick-Nixon या ब्रिटीश कंपनीच्या मालकीची आहे हे विशेष! याचा अर्थ हा की भारतीय रेल्वे रुळांवर एक खाजगी ब्रिटीश कंपनीच्या मालकीची रेल्वे धावते. आहे की नाही अविश्वसनीय??

विदर्भाची राणी शकुंतला हिच्या नावावर या रेल्वेला शकुंतला रेल्वे असे नाव देण्यात आले. ही रेल्वे लाईन उर्वरित जगासाठी जरी अज्ञात असली तरी यवतमाळ आणि अचलपूर मधील लोकांसाठी ही रोजची लाईफलाईन आहे. आजही एक पॅसेंजर ट्रेन म्हणून महाराष्ट्रातील यवतमाळ स्थानकापासून मुर्तीजापूर स्थानकापर्यंत १९० किमी अंतरापर्यंत ही ट्रेन प्रवाश्यांची ने-आण करते.

 

british-raliway-marathipizza02

स्रोत

आजही या रेल्वेला ब्रिटीश काळातील वाफेचे इंजिन जोडले जाते आणि या रेल्वे लाईनवरील सिग्नल देखील ब्रिटीश काळातील असून यावर Made In Liverpool असा उल्लेख आढळतो.

 

british-raliway-marathipizza05

 

स्रोत

जर तुम्हालाही ब्रिटीश काळातील रेल्वे प्रवासाचा फील घ्यायचा असेल तर एकदा तरी या रेल्वेने प्रवास जरूर करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?