'बॉलिवूडच्या रंगीत दुनियेचं "हे" वास्तव जाणीवपूर्वक लपवलं गेलं आहे...नेहमीच...!

बॉलिवूडच्या रंगीत दुनियेचं “हे” वास्तव जाणीवपूर्वक लपवलं गेलं आहे…नेहमीच…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी, मग त्यात सीबीआय, इडी आणि एनसीबी सारख्या मोठ्या संस्थांचा या केसशी आलेला संबंध या गोष्टींची चर्चा सध्या सुरु आहेच. रिया चक्रवर्तीची चौकशी आणि तिने सुद्धा बॉलीवूड आणि ड्रग यांचा दृढ संबंध असल्याचं सांगणं… मुळात सुशांत सिंगच्या मृत्यूभोवती फिरणारी ही केस आता एका वेगळ्याच वळणावर येऊन उभी आहे.

खरंतर बॉलीवूड आणि अंमली पदार्थांचे सेवन ही बाब आपल्यासाठी नवी नाही. मनोरंजन सृष्टीवर शिंतोडे उडवणाऱ्या अनेक रेव्ह पार्टीज, पेज थ्रीचं वास्तव या सगळ्यांवर अनेकदा चर्चा झाली आहे. ती आजही होते आहे. ही चर्चा थांबणार नाहीच.

खुद्द बॉलीवूडमध्ये सुद्धा ‘पेज थ्री’, ‘फॅशन’ अशा सिनेमांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यातून बॉलीवूडची ही काळी बाजू प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाच आहे.

 

fashion-movie-inmarathi

 

जेव्हा खुद्द बॉलीवूड किंवा त्यातील तारेतारका याविषयी उघडपणे बोलू लागतात, तेव्हाच लक्षात येतं, की परिस्थिती खरोखरंच भीषण आहे.

आज आपण अशाच काही व्यक्ती आणि आणि घटनांविषयी जाणून घेऊयात, ज्यांचा संबंध या मनोरंजन विश्वाशी आहे आणि ड्रग्सशी सुद्धा…

संजय दत्त आणि ड्रग्स

सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंझत असलेला अभिनेता संजय दत्त याच्या ड्रग कनेक्शनविषयी माहित नाही, अशी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. त्याने स्वतः याविषयी कबुली दिली होती, हेसुद्धा तुम्हाला माहित असेल.

 

 

संजय दत्त याने स्वतःच दिलेल्या माहितीनुसार जगात असा एकही अंमली पदार्थ नाही, ज्याचे सेवन त्याने केले नाही.

एकदा या दलदलीत शिरल्यानंतर त्यातून बाहेर पडणे खूपच कठीण जाते. मात्र संजय दत्त याने पुनर्वसन केंद्रांच्या साहाय्याने त्याची ही वाईट सवय सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. या अभिनेत्याच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा या घटना पाहायला मिळतात.

रील आणि रिअल लाईफमध्येही ड्रग्सचा संबंध

संजय दत्तच्या भूमिकेत पाहायला मिळालेला रणबीर कपूर सुद्धा ड्रगच्या विळख्यात सापडला असल्याचं आपल्याला ठाऊक आहेच.

 

ranbir-inmarathi

 

वयाच्या १५व्या वर्षीच त्याला ड्रग्सचे व्यसन लागले असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. कॉलेजच्या वयातच, चुकीच्या संगतीमुळे तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता.

ऋषी कपूर यांची पत्नी, म्हणजेच रणबीरची आई नितु कपूर हिने त्याला या विळख्यातून बाहेर पडण्यास मदत केली. ऑस्ट्रियामधील पुनर्वसन केंद्रात उपचार घेऊन त्याने या व्यसनावर मात केली. आज एक आघाडीचा अभिनेता म्हणून रणबीरने नाव कमावले आहे.

विकी कौशल सुद्धा सुटला नाही

संजूबाबाच्या सिनेमातही उत्तम अभिनयाचं प्रदर्शन करणारा अभिनेता विकी कौशल याचं नाव सुद्धा ड्रग्सशी जोडलं गेलं आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या घरातील एका विडिओची मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. विकी, रणबीर, दीपिका पदुकोण, वरुण धवन अशी मंडळी नशा करत असल्याचं यात पाहता येत होतं.

 

vicky-kaushal-inmarathi

 

हे आरोप स्पष्टपणे नाकारून, ‘ती केवळ एक नाईट आऊट होती’ असं स्पष्टीकरण कारण जोहर याने नंतर दिलं आहे. मात्र मागील वर्षी घडलेली ही घटना मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा बोट उचलणारी होती.

 

karan-johar-home-party-inmarathi

मराठी अभिनेत्रीचा मुलगा प्रतीक

हिंदी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील हीच मुलगा प्रतीक बब्बर याने सुद्धा त्याने ड्रग्स घेतले असल्याचं मान्य केलं आहे. वयाच्या १३व्या वर्षीच ड्रग घेतले आणि त्यानंतर तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता.

 

pratik-smita-inmarathi
indianexpress.com

 

अर्थात या व्यसनावर मात केल्यानंतर आज तो एक उत्तम अभिनेता म्हणून तो हिंदी चित्रपट सृष्टीत स्थिरावू पाहत आहे. ड्रग्सच्या विळख्यात अडकू नका असं तो आता इतरांना आवर्जून सांगतो.

विजय राज आणि हनी सिंग

गली बॉय सिनेमातील अभिनेता विजय राज याला २००५ साली दुबई एअरपोर्टवर पकडण्यात आलं होतं.

गायक यो यो हनी सिंग सुद्धा पुनर्वसन केंद्रात राहून आलेला आहे. आज व्यसनमुक्त झाल्यानंतर त्याच्या रॅप्सची चव त्याने इतरांना दाखवण्यास सुरुवात केली आहे.

 

honey-singh-inmarathi

 

फर्दिन खान याला अटक

२००१ साली कोकेन बाळगल्या प्रकरणी अभिनेता फर्दिन खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या प्रसिद्धीवर आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. याचा त्याच्या कारकिर्दीवर सुद्धा परिणाम झाला आहे.

 

fardeen-inmarathi

 

स्त्रिया सुद्धा मागे नाहीत

ड्रग्सच्या या विळख्यात महिलावर्ग सुद्धा अडकलेला दिसून येतो.

अभिनेत्यांच्या पत्नी

शाहरुख खान याची पत्नी गौरी खान आणि हृतिक रोशनपासून वेगळी झालेली सुझान यांचेही ड्रगशी कनेक्शन असलेले समोर आले आहे. गौरी खान हिला बर्लिन विमानतळावर गांजा बाळगल्याप्रकरणी अडवण्यात आले होते.

 

shahrukh-gauri-inmarathi

 

हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटांनंतर, सुझान खान सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेली असल्याचे सांगण्यात येते.

गीतांजली आणि मनीषा सुद्धा चर्चेत होत्या

मॉडेल गीतांजली नागपाल ही सुद्धा अंमली पदार्थांचे सेवन करत होती. नशेच्या आहारी गेलेली गीतांजली दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळी बगीचे आणि मंदिरांमध्ये आढळून आली आहे.

अभिनेत्री मनीषा कोईराला तिच्या कारकिर्दीत यशस्वी झाली होती. मात्र या यशाच्या बरोबरीनेच तिच्या आयुष्यात अंमली पदार्थांचा प्रवेश सुद्धा झालेला होता.

तिला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा द्यावा लागला. यानंतर मात्र, तिने ड्रग्सच्या वाईट परिणामांविषयी उघडपणे बोलण्यास सुरुवात केली.

 

manisha koirala inmarathi

 

थोडक्यात काय, तर ग्लॅमरने भरलेलं आयुष्य जगणाऱ्या या बॉलीवूडमधील मंडळींचं ड्रग्सचं कनेक्शन या आधी सुद्धा उघड झालेलं पाहायला मिळालं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?