' अँड्रॉईड फोनच्या सर्वात महत्वाच्या सॉफ्टवेअरचे कर्ता-धर्ता कोण? वाचा रंजक इतिहास!

अँड्रॉईड फोनच्या सर्वात महत्वाच्या सॉफ्टवेअरचे कर्ता-धर्ता कोण? वाचा रंजक इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एक वेळ अशी होती की नोकिया आणि सॅमसंगच्या साध्या मोबाईल फोनने धुमाकूळ घातला होता.

अँपलने आपला आयफोन बाजारात आणून टचस्क्रीन मोबाईल मध्ये क्रांती आणली आणि हळूहळू कि – पॅड फोन मागे पडून टचस्क्रीन मोबाईल फोन मार्केट मध्ये यायला लागले.

आयफोन आपली स्वतःची स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टीम आयओएसच्या अंतर्गत फोन डेव्हलप करू लागली तर सॅमसंगने बाजारात नवीन आलेल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा हाथ धरला.

 

android inmarathi

 

फोन जगतात बादशाह असलेला नोकिया विंडोज सोबत गेला. नोकिया मोबाईल फोनच्या रेस मधून बाहेर गेला कळलं ते कळलंच नाही.

आयफोनने आपल्या ब्रँडच्या नावावर आपला कस्टमर बेस तयार करुन सेफ गेम खेळला. यामध्ये बाजी मारली ती सॅमसंगने.

ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीमला कस्टम डिझाईन करून सॅमसंगने आपला मोठा वेगळा कस्टमर बेस तयार केला. मोबाईल जगतात अँड्रॉइडने घातलेला धुमाकूळ पाहता हळूहळू नवीन कंपन्या देखील अँड्रॉइड बेस फोन तयार करू लागले.

जवळपास ७५% फोन्स हे आज अँड्रॉइड वर चालत आहेत. तर आज याच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल आपण पाहणार आहोत.

अड्रॉइड आयएनसीची स्थापना केली ती २००३ मध्ये पॉलो अल्टो येथे अँडी रुबीन, रिच मिनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाइट या प्रोग्रामर मंडळींनी.

तेव्हा मार्केट मध्ये चलती असलेल्या सिमबीयन आणि विंडोज फोन साठी स्पर्धा म्हणून ही ओएस बाजारात आली. परंतु तिला हवा तसा प्रतिसाद सुरवातीला मिळाला नाही.

कालांतराने इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर रुबीनने खास कॅमेऱ्यासाठी अँड्रॉइड डेव्हलप करायला सुरुवात केली.

अँड्रॉइडच्या प्रवासात मोठा टर्न २००५ साली आला. जेव्हा गुगलने अँड्रॉइड आयएनसीला ५० मिलियन डॉलरमध्ये आपल्या अखत्यारीत आणले.

 

andy rubin inmarathi

 

आणि अँड्रॉइडचा भरभराटीचा प्रवास सुरु झाला तो इथून. एक पावरफुल्ल ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याच्या मागे असलेल्या गुगलला आयतीच एक चांगली कन्सेप्ट मिळाली.

गुगलने अँड्रॉइड अशी काही डेव्हलप केली की सामान्यतला सामान्य माणूस ती वापरू शकेल. आणि ओपन सोर्स असल्याने याला डेव्हलपमेंटला वाव सुद्धा तेवढाच दिला गेला.म्हणून खास करून तरुणाई मध्ये अँड्रॉइड फोन्सची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली.

गुगलने टेक ओव्हर केल्यानंतर सुद्धा गुगलच्या अँड्रॉइड डेव्हलपमेंट प्रोग्रामचे हेड अँडी रुबीन हेच होते. २०१३ साली त्यांनी गुगल सोडले आणि स्वतःच्या नवीन स्टार्टअप प्रोजेक्टच्या कामाला लागले.

रुबीनच्या गुगल सोडल्यानंतर अँड्रॉइडला लीड करायला आले, तेव्हाचे गुगल क्रोम आणि क्रोम ओएसचे हेड भारतीय मूळचे सुंदर पिचाई.

सुंदर पिचाई यांनी अँड्रॉइडची कमान हाती घेतल्यानंतर अँड्रॉइडने जी भरारी घेतली त्याने पिचाई यांना थेट गुगलच्या सीईओ पदावर नेऊन बसवले.

नवीन प्रोडक्ट आणि त्याच्या डेव्हलपमेंट मधला सुंदर पिचाई यांचा दांडगा अनुभव आणि एक्स्पर्टाइजचा गुगलने पुरेपूर फायदा उचलून अँड्रॉइडला मार्केट मध्ये टॉपला आणलं.

 

sunder pichai inmarathi
indiatoday.in

 

अँड्रॉईड एक लिनक्स बेस सॉफ्टवेअर सिस्टम आहे. लिनक्स एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे आणि त्यामुळे ते विनामूल्य देखील आहे.

त्यामुळे इतर मोबाइल कंपनी देखील अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा आपल्या हिशोबाने वापर करू शकतात. अँड्रॉइडची विशेषता आहे त्याची केर्नल.

केर्नल म्हणजे अँड्रॉइडचा सेंट्रल कोअर होस्ट जो मूलत: एक स्ट्रिप कोड आहे आणि जो सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेट करायला मदत करते.

२००७ मध्ये जेव्हा अँपलने आपला आयफोन लॉन्च केला, तेव्हा सुद्धा गुगल अँड्रॉइड वरचं काम करत होती.

त्याच वर्षी नोव्हेंबर मध्ये गुगलने ‘ओपन हँडसेट अलायन्स’ तयार केली.

ज्यामध्ये गुगलने एचटीसी,मोटोरोला हे मोबाईल बनवणारे कंपनी,क्वालकॉम आणि टेक्सास इन्स्ट्रुमेंट या प्रोसेसर चिप बनवणाऱ्या कंपनी आणि टी मोबाईल जी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे यांच्या सोबत पार्टनरशिप घडवून आणली.

सप्टेंबर २००८ मध्ये अँड्रॉइड बेस पहिला मोबाईल लॉन्च झाला. मोबाईल जी १ किंवा एचटीसी ड्रीम जी १.

जो एक ३.२ इंच टचस्क्रीन मोबाईल होता. ज्याला क्वारिटी किपॅड सुद्धा दिला गेलेला. परंतु हा फोन सपशेल फेल गेला. अनेक टेक एक्सपर्टीजनी या फोनची थट्टा केली. आणि याचे मुख्य कारण होते फोनला नसलेला ३.५ ऑडिओ जॅक!

 

first android inmarathi

 

आजच्या घडीला ब्लुटूथ हेडफोनमुळे ३.५ जॅक नसल्यावर काही फरक नाही पडत पण तेव्हा फक्त फाईल ट्रान्स्फरसाठी वापरला जाणारा ब्लूटूथ एवढा प्रगत नव्हता आणि मोबाईल फ्लॉप व्हायला कारणीभूत ठरला.

हा फोन अँड्रॉइडच्या व्हर्जन १.० वर बेस होता. अँड्रॉइडचं व्हर्जन १.५ येई पर्यंत त्याला काही विशिष्ट नाव नव्हतं. आधीच्या दोन व्हर्जनचं नाव होतं अँड्रॉइड अल्फा आणि अँड्रॉइड बीटा.

अँड्रॉइडच्या १.५ व्हर्जनचं नाव ठेवलं गेलं ‘कपकेक’. अँड्रॉइडच्या व्हर्जन्सना स्वीट आणि डेझर्टचं कॉम्बिनेशन नाव द्यायचं क्रेडिट जात ते गुगलच्या प्रोजेक्ट मॅनेजर रायन गिबसन यांना.

गोड पदार्थांची नाव देण्याचं काय रहस्य आहे हे अजून कोणी सांगू शकलेलं नाही. व्हर्जन ४.४ किटकॅट जेव्हा लॉन्च केलं गेलं तेव्हा गुगलने अधिकृतपणे स्टेटमेंट दिलं,

‘या प्रोजेक्टमुळे आमचे जीवन गोड झाले,त्यामुळे अँड्रॉइडच्या प्रत्येक व्हर्जनला हे गोड पदार्थांचीच नावे देण्यात येईल.!’

अँड्रॉइडचे व्हर्जन आणि त्यांची नाव पुढीलप्रमाणे :

१.० अल्फा

१.१ बीटा

१.५ कपकेक

१.६ डोनट

२.१ इकलेअर

२.२ फ्रोयो

२.३ जिंजरब्रेड

३.२ हनीकोंब

४.२ जेलीबिन

४.४ किटकॅट

५.० लॉलीपॉप

६.० मार्शमेलो

७.० नोगट

८.० ओरिओ

९.० पाय

मात्र अँड्रॉइड व्हर्जन १० पासून याला अँड्रॉइड १० याच नावाने ओळखले जाईल अशी कंपनीने घोषणा केली आहे.

 

android 10 inmarathi

 

सप्टेंबर २०१९ मध्ये अँड्रॉइड १० गुगल पिक्सेल फोन थ्रू लॉन्च झाला आणि लवकरच इतर फोन साठी सुद्धा तो उपलब्ध झाला.

अँड्रॉइडचा तो जगप्रसिद्ध हिरवा लोगो डिझाईन केला आहे, तत्कालीन गुगलच्या डिझाईनर इरिना ब्लॉक यांनी.

लोगो हा रोबोट सारखा दिसावा एवढंच इनपुट गुगल कडून देण्यात आले होते. फायनल लोगो हा स्त्री-पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या बाहेर असलेल्या सिम्बल वरून डिझाईन केला गेला असे त्या म्हणाल्या.

कालांतराने अँड्रॉइडचा सिम्बल पण ओपनसोर्स झाल्यानंतर ‘क्रिएटिव्ह कॉमन्स ३.० अट्रिब्युशन लायसन्स’ अंतर्गत गुगलने कस्टम लोगो डिझाईनला प्राधान्य दिले.

तर, एक साधा स्टार्टअप म्हणून सुरवात झालेला अँड्रॉइड आज जगात लिडिंग स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

मोबाईलचं नव्हे तर आता अँड्रॉइड टॅब, अँड्रॉइड टीव्ही आणि गाड्यांच्या स्क्रीनमध्ये सुद्धा अँड्रॉइड वापरलं जात आहे.

 

android tv inmarathi

 

जोपर्यंत अँपल आपले आयफोन्स सध्याच्या मॉडेलच्या हिशोबाने स्वस्त मॉडेल बाजारात उतरवत नाही तोपर्यंत अँड्रॉइड हा ऑपरेटिंग सिस्टीमचा अनभिषिक्त सम्राट असणार आहे यात तिळमात्र शंका नाही.

अँड्रॉइड हा १०००० रुपयांच्या फोन पासून ते लाखाच्या घरात असलेल्या सॅमसंगच्या नोट २० पर्यंत वापरला जात आहे. यावरून अँड्रॉइडची मार्केट मध्ये असलेली चलती समजून येईल.

आणि हेच अँड्रॉइडला बाजारात शीर्ष स्थान देण्यास कारणीभूत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?