' मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळतो चक्क "गांजा"? विश्वास बसत नसेल तर हे वाचाच

मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळतो चक्क “गांजा”? विश्वास बसत नसेल तर हे वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही संकल्पना लवकर आपल्या पचनी पडतच नाहीत. त्यातही विशेषत: धर्म, रुढी-परंपरा, देव-देवता यांचा विशेष संबंध असतो त्याठिकाणी जर अगदीच निषिद्ध मानल्या गेलेल्या पूर्वापार गोष्टींना सहज फाटा देऊन काही गोष्टी जर बेधडकपणे होताना त्या दिसत असतील तर मग काय खरं.. काय खोटं.. इथपासून ते आता तर अगदी विश्वासच उडत चाललाय अशा प्रतिक्रिया ऐकायला येतात.

अर्थात मनाला न पटणाऱ्या आणि अगदी बेकायदेशीर असणाऱ्या काही गोष्टी जर राजरोसपणे होत असतील आणि त्यावर जर कोणी फारसा आवाज उठवत नसेल तर मग नक्कीच याची कारणं काय हे शोधण्यास आपण प्रवृत्त होतो.

इथे सुरुवातीलाच एक सूचना देत आहोत : 

बेकायदेशीर गोष्टींना आम्ही कोणतेही समर्थन देत नाही, तसेच कारणं काहीही का असेना चुकीच्या गोष्टी सेवन करा असेही आम्ही म्हणत नाही. निव्वळ मनोरंजन याच हेतूने हा लेख इथे सादर करत आहोत.

दुसरीकडे सध्या आपल्या देशात ज्या एका गोष्टीने धुमाकूळ घातलाय ती म्हणजे ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाई आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनपासून ते दहशतवादाशी हे कुठवर जोडलं गेलं आहे का याचाही तपास मोठ्या यंत्रणांकडून सुरू आहे.

 

drugs inmarathi

 

एका सुपरस्टार अभिनेत्याच्या गुढ मृत्यूपासून सुरू झालेली ही कथा ड्रग्जचा विळखा किती प्रमाणात पडलाय आणि तो सतत का वाढतोय याची पाळंमुळं खणून काढली जात आहेत.

त्या पार्श्वभूमीवर जर कुठे असे आढळत असेल, की नशायुक्त गोष्टी चक्क देवाचा प्रसाद म्हणूनही वाटल्या जाऊ शकतात तर मग नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही आणि त्यावर आपण संशोधन करू लागतो.

साधारणपणे मंदिरांमध्ये किंवा कोणत्याही पवित्र स्थानावर किंवा प्रार्थनास्थळी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रसाद म्हणून काय मिळतं… लाडू, पेढे, खीर, शिरा, चणे-फुटाणे, खिरापत, पायसम, भाताचे प्रकार इ. असं काहीही मिळू शकतं.

पण तुम्ही कल्पना करा, की जर तुम्ही मंदिरातून बाहेर पडलात आणि तुमच्या हातावर प्रसाद म्हणून एखादी विशिष्ट पूड ठेवली गेली आणि नंतर तुमच्या असे लक्षात आले, की तो एक नशायुक्त अंमली पदार्थ होता…तर तुमची तत्काळ प्रतिक्रिया काय असेल… धक्का बसला ना.. पण हे खरंय.

 

ganja inmarathi1

 

 

दक्षिण भारतात विशेषत: कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये चक्क गांजा हा प्रसाद म्हणून वाटला जातो.

कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात तिंथिनी येथील मौनेश्वराच्या मंदिरात प्रत्येक जानेवारीत वार्षिक मेळा भरतो. त्यावेळी भगवान मनप्पाच्या पुजा प्रार्थनेनंतर तेथे जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून गांजाची छोटी-छोटी पाकिटे दिली जातात.

प्रत्येक भाविक त्याच्या इच्छेनुसार गांजाचे सेवन करतो. काहीजण तर धुम्रपानाच्या माध्यमातून याचे सेवन करतात. भगवान मनप्पाला प्रार्थना केल्यानंतर धूम्रपान करतात.

मनप्पा मंदिर समितीचे सदस्य गंगाधर नायक यांनीच ही माहिती एका राष्ट्रीय वृत्तपत्राला दिली आहे.

अन्य एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, उत्तर कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये गांजा पवित्र मानला जातो. शरण, शप्त, अरुडा आणि अवधूत परंपरेतील भक्तही गांजाचे सेवन करतात.

 

ganja inmarathi

 

यादगिर जिल्ह्यातील शिवयोगी आश्रमातील एका साधुने दिलेल्या माहितीनुसार,

जर दिवसातून एकदा योग्य प्रमाणात गांजाचे सेवन केले, तर मेडिटेशन करणे खुप सोपे होते, चित्त शांत रहाते आणि मन विचलीत होत नाही.

(आम्ही येथे फक्त माहिती देत आहोत, या वक्तव्यास पाठिंबा देणे हा आमचा उद्देश नाही.)

आणखी एक नेहमीच पाहिली जाणारी, सर्वपरिचित आणि सगळेजण सहजतेने, आवडीने पितात ती म्हणजे भांग. भारतात होळीच्या सणातील प्रसिद्ध आणि रंग खेळताना प्यायले जाणारे आवडीचे पेय म्हणजे भांग.

ती तयार होते कशी, कशापासून बनते, त्यात जर काही नशायुक्त पदार्थ असतो तर तो कोणता?… अर्थातच याचं उत्तर आहे ती कन्नाबिसची पाने. यालाच मरिजुआना म्हणून ओळखले जाते.

भगवान शंकराचे देखील भांग हे आवडते पेय आहे असे हिंदू धर्मात मानतात. दूध, मसाले आणि कन्नाबिसच्या पानांपासून ही तयार केली जाते. ज्याला प्रामुख्याने भांगेची गोळी म्हणून ओळखतात.

 

bhang inmarathi1

 

इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे,की कन्नाबिस किंवा मरिजुआना यावर भारतात पूर्णपणे बंदी आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एन.डी.पी.एस या कायद्यानुसार कन्नाबिस बाळगणे, वापरणे, विकणे, खरेदी करणे, व्यापार करणे आणि प्राशन करणे यावर कडक निर्बंध असून सक्तीने बंदी आहे, मात्र त्यापासूनच बनणारी भांग पिण्यावर आपल्याकडे बंदी नाही.

तर सर्वांनाच ही विनंती आहे, की नशायुक्त पदार्थांचे सोवन करणे हे आरोग्यासाठी हानीकारक आहेच, मात्र ड्रग्ज प्रतिबंधक कायद्यानुसारही त्यावर निर्बंध आहेत.

त्यामुळेच वरील माहिती केवळ मनोरंजन या हेतूने सादर केली असून, या लेखाच्या आधारावर कोणीही नशायुक्त पदार्थांचा वापर करू नये. तसे करण्यास आम्ही कोणतेही प्रोत्साहन देत नाही.

सध्या सुरू असलेल्या सुशांतसिंग राजपूतच्या गूढ मृत्यूप्रकरणी तपास करताना मुंबई, राज्यासह पूर्ण देशातच कुठे आणि किती प्रमाणात या ड्रग्जचा विळखा पडलाय याचा कसून शोध एनसीबी घेत असून त्यांची सर्वत्र बारीक नजर आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?