' शाम्पूची सवय वेळीच मोडा, या १५ गंभीर दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवा!

शाम्पूची सवय वेळीच मोडा, या १५ गंभीर दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अंघोळ करताना सुगंधित उत्पादनांचा वापर केलाच नाही तर आपल्या पैकी कित्येक लोकांना अंघोळ केल्या सारखेच वाटत नाही. आणि हे अगदी खरे आहे आणि योग्य सुद्धा, सुगंधित प्रसाधने आपल्याला ताजे तवाने करण्यास मदत करतात.

आपण अंघोळ सुद्धा याचसाठी तर करतो! शरीर निर्जंतुक करण्यासाठी व मन प्रसन्न ठेवण्यासाठी. कित्येक अत्यंत सुंदर सुवासिक, आकर्षक साबणे, बॉडी वॉश, शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत.

त्यांच्या अॅड सुद्धा इतक्या आकर्षक असतात की आपल्याला ती प्रसाधने वापरण्याचा मोह काही केल्या आवरत नाही.

 

shampoo inmarathi ad

 

हे सगळे शाम्पू आपण कोणती तरी टीव्ही वरील जाहिरात पाहून विकत घेतो किंवा त्यांचा सुगंध आपल्याला आकर्षित करत असतो व त्यात काय घटक आहेत ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.

आणि ही घोडचूक आहे हे आपल्याला जाणवतच नाही. औषध ज्याप्रमाणे तपासून घेतो त्याच प्रमाणे कुठलेही प्रसाधन तपासून घेणे आपले आपल्या शरीरा प्रती असलेले कर्तव्यच असते जे आपण बजावत नाही.

ह्याच हलगर्जी पणाचा आपल्याला काय त्रास होऊ शकतो ते जाणून घेऊया.

नियमित शाम्पू वापरण्याचे तोटे –

१) Sodium Lauryl Sulfate (SLS) –

SLS चा उपयोग मुख्यतः शाम्पू मध्ये फेस आणण्यासाठी करतात. हा तोच अॅक्टिव इन्ग्रेडीयंट आहे जो सगळ्यात जास्त टॉक्सिक असून गॅरेजची तेलकट फर्शी, व गाड्यांचे इंजिन्स पुसण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या पावडर किंवा डिटर्जंट मध्ये असते.

ग्रीज काढण्याचे केमिकल आपल्या केस धुण्याच्या शाम्पू मध्ये वापरले जाते. ह्याच शाम्पूचा नियमित वापर डोक्याच्या त्वचेला व केसाच्या मुळांना भरपूर ईजा पोचवतो.

ज्यामुळे केस गळणे, केस रुक्ष व राठ होणे, स्कॅल्पचे सेल्स डॅमेज होणं या सारख्या समस्या उद्भवतात.

२) डोळ्यांचे विकार –

शाम्पू मध्ये असलेल्या Formaldehyde मुळे डोळ्यांची आग होते. याच बरोबर शाम्पू च्या नियमित वापरणे मोठ्यांना मोतीबिंदू होतो व लहान मुलांच्या डोळ्यांची वाढ खुंटते. त्यांची दृष्टी नीट वाढत नाही. कमी होत जाते.

३) अस्थमा –

 

asthama inmarathi

 

शाम्पू मध्ये असलेल्या DMDM hydantoin in, Diazolidinyl Urea, imidazolidinyl urea, quaternium-15, and bronopol सारख्या अत्यंत हानिकारक केमिकल्स चा आपल्या शरीराशी नियमित संबंध आल्यामुळे छाती दुखणे, दमा, श्वास लागणे, पटकन दम लागणे यांसारखे विकार होऊ लागतात.

४) त्वचा विकार –

आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी निसर्गानेच तिला सक्षम बनविले आहे. त्या साठी, वेगवेगळ्या प्रकारचे तेल आपल्या त्वचेत नेहमीच तयार होत असते.

पण शाम्पूच्या किंवा इतरही सौंदर्य प्रसाधनांच्या नियमित वापरामुळे ही तेल बनण्याची प्रक्रिया विस्कळीत होते व शरीर निर्मित नैसर्गिक तेल तयार होणे कमी होते किंवा बंद होते.

ज्यामुळे खाज येणे, पुरळ, रॅशेस, त्वचा लालसर होणे, आग होणे, त्वचा फाटणे या सारख्या समस्या उद्भवतात.

५) रोग प्रतिकाशक्ती –

शाम्पू वारंवार वापरल्यामुळे त्यात असलेल्या विविध अत्यंत घातक घटकांमुळे, जे आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्रिया डिस्टर्ब करतात, यांमुळे आपली रोगप्रतिकरकशक्ती सुद्धा नाजूक होत जाते.

६) कॅन्सर –

शाम्पू मध्ये वापरल्या जाणाऱ्या Diethanolamaine (DEA) व नायट्रेट जे प्रिझर्वेटिव म्हणून वापरले जातात, यांच्या रिएक्शन मुळे Nitrosamines कंपाऊंड तयार होते जे कॅन्सरच्या पेशी वाढवण्यासाठी जबाबदार असते.

या शिवाय शाम्पूत असलेल्या पॅरॅबन मुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता दाट होते.

७) किडनी व लिव्हरच्या समस्या –

शाम्पूत इतके हानिकारक केमिकल्स असतात की आपल्या केसांना मजबूत ठेवण्या ऐवजी व आपल्याला काही फायदा पुरवण्या ऐवजी त्यात असलेले Diethanolamaine (DEA) or Triethanolamine (TEA) या घटकां चा आपल्या शरीराशी वारंवार संबंध आल्यास किडनी व लिव्हर वर परिणाम होतो व ते नाजूक होत जातात.

९) केस पिकणे –

 

grey hair inmarathi

 

आपण आपले केस सुंदर, काळे व घनदाट ठेवण्या करता शाम्पू ने नियमित स्वच्छ करत राहतो.

पण हा वापर रोज होऊ लागला किंवा वाढला तर केस काळे राहण्या ऐवजी लवकर पिकायला लागतात, पांढरे पडतात.

१०) कोंडा होणे –

शाम्पू चा सीमित वापर केल्यास केसांमधील अनावश्यक तेल, माती, मळ निघून जातो. ही तीच कारणे आहे ज्यामुळे कोंड्याचा त्रास होतो.

पण शाम्पू च्या अती वापरामुळे त्वष्टा रुक्ष होते, तिचा ओलावा संपतो व कोरड्या त्वचेवर कोंडा येऊ लागतो. हा कोंडा पुढे चेहऱ्यावरील पुरळ, पिंपल्स अशा समस्या निर्माण करण्याचे काम करतो.

११) सिंथेटिक परफ्यूम –

शाम्पू ला सुवास प्रदान करण्यासाठी त्यात अनेक प्रकारचे सिंथेटिक परफ्यूम वापरले जातात. त्यामुळे शाम्पू च्या अती वापरामुळे डोकेदुखी, वारंवार मळमळणे, उलट्या, मरगळ जाणवणे या सारखे दुष्परिणाम होऊ लागतात.

१२) सोडियम क्लोराईड –

शाम्पू ला गडद बनवण्यासाठी त्यात सोडियम क्लोराईडचा सुद्धा वापर केल्या जातो. ज्यामुळे डोक्यात फोड येणे, खाज येणे हे त्रास होऊ लागतात.

१३) सिंथेटिक रंग –

 

shampoo inmarathi

 

शाम्पू ला आकर्षक बनवण्यासाठी त्यात अनेक सिंथेटिक रंग टाकतात. जे मुख्यतः coal – tar आणि पेट्रोलियम पासून तयार केले जातात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो. आणि अनेक प्रकारच्या स्किन अॅलर्जीस होऊ लागतात.

१४) Dimethicone –

हे एक प्रकारचे प्लॅस्टिक आहे जे तुमच्या केसांना चमक देतं व मऊ बनवतं. हे तुमच्या डोक्याच्या त्वचेला चिकटून बसते व त्वचेची छिद्र बंद होतात.

ज्यामुळे मोकळ्या ऑक्सिजन चा नीट पुरवठा होत नाही व घामाच्या रूपातून अतील टॉक्सीक बाहेर पडत नाही. ज्यामुळे केस व त्वचा दोन्ही खराब होऊ लागते.

त्यामुळे कधीही आपलं शाम्पू नीट विचारपूर्वक निवडा. कितीही चांगलं शाम्पू निवडलं तरी त्यात केमिकल्स हे असतातच.

त्यामुळे जर या सुगंधाची सवय लागली असेल तर ती वेळीच मोडा व शाम्पू चा अगदी गरजेपुरता, कमीतकमी वापर करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?