राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्रा

===

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना १९८८ साली करण्यात आली. देशातील राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणे, देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम हे प्राधिकरण करतं.

भारतात आजवर ५,४७२,१४४ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये ९७,९११ किमी अंतराचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. भारताचे रोड नेटवर्क हे जगातील दुसरे सर्वात मोठे रोड नेटवर्क आहे.

 

national-highway-marathipizza01

स्रोत

गुगल मॅप्स वापरताना आपल्याला अनेकदा AH, NH आणि SH यांसारखी सांकेतिक चिन्हे दिसतात. त्यापैकी National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग होय आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. जो आशिया मधील देशांना जोडतो.

उत्तर-दक्षिण (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ४००० किमी! पूर्व पश्चिम (पोरबंदर ते सिलचर) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ३३०० किमी!

सुवर्ण चौकौन मार्ग (The Golden Quadrilateral -GQ) जो दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील मुख्य शहरांबरोबरच पुणे, बंगलोर आणि अहमदाबाद या शहरांना देखील जोडतो. या रस्त्याचे एकूण अंतर आहे ५८४६ किमी!

 

national-highway-marathipizza02

स्रोत

राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात?

सर्व उत्तर-दक्षिण दिशेच्या महामार्गांना सम संख्या क्रमांक दिला जातो.

उदा, NH 8: दिल्ली ते मुंबई.

आणि सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या महामार्गांना विषम संख्या क्रमांक दिला जातो.

उदा: NH 13: तवांग ते आसाम

सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसाठी एक अंकी किंवा दोन अंकी संख्या वापरली जाते.

जसजसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तसतसे उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा पश्चिम भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा पूर्व भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

म्हणजे, समजा NH 4 हा पूर्व भारतामध्ये आहे, तर NH 34 हा पश्चिम भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते सम संख्या असल्यामुळे उत्तर-दक्षिण जाणारे असणार.

त्याचप्रकारे जसजसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसे पूर्व-पश्चिम राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा दक्षिण भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा उत्तर भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

म्हणजे – समजा NH 7 हा उत्तर भारतामध्ये आहे , तर NH 83 हा दक्षिण भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते विषम संख्या असल्यामुळे पूर्व-पश्चिम जाणारे असणार.

 

national-highway-marathipizza03

स्रोत

तीन आकडी क्रमांक असणारे महामार्ग मुख्य महामार्गाचे उपमार्ग असतात.

उदा. १४४, २४४, ३४४ हे महामार्ग NH 44 चे उपमार्ग आहेत. या उपमार्गांना देण्यात आलेल्या क्रमांकामध्ये जर पहिला क्रमांक हा विषम असेल तर समजावं की तो रस्ता पूर्व-पश्चिम दिशेला स्थित आहे. जर पहिला क्रमांक हा सम संख्या असेल तर समजावं की रस्ता उत्तर-दक्षिण दिशेला स्थित आहे.

A,B,C,D हे तीन आकडी क्रमांक असणाऱ्या उप महामार्गांच्या नावाशी जोडले जातात. ज्यावरून उपमहामार्गांच्या भागांचे संकेत मिळतात. उदा. 966-A, 527-B

 

national-highway-marathipizza04

स्रोत

भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांची यादी

national-highway-marathipizza05

स्रोत

ही आहे राष्ट्रीय महामार्गांची राज्यानुसार यादी

national-highway-marathipizza06

स्रोत

तर हे आहे राष्ट्रीय महामार्गांना दिल्या जाणाऱ्या क्रमांकांच्या मागील माहित नसलेलं पण आता माहित झालेलं गुपित!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात? जाणून घ्या…

  • February 26, 2019 at 5:24 am
    Permalink

    best information

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?