' फिटनेससाठी ट्रेडमिलचा वापर करणाऱ्या अनेकांना या यंत्राचा “हा” इतिहास माहितीच नसतो… – InMarathi

फिटनेससाठी ट्रेडमिलचा वापर करणाऱ्या अनेकांना या यंत्राचा “हा” इतिहास माहितीच नसतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वजन – आपल्या सर्वांना काळजीत टाकणारी गोष्ट. “काहीही करा, वजन वाढतंच” ही तक्रार आपण कित्येक लोकांकडून नेहमीच ऐकतो.

जेव्हापासून गोष्टी ऑनलाईन आणि कमी कष्टात सहज शक्य होऊ लागलेल्या तेव्हापासून आपल्या सर्वांची लाईफस्टाईल बदलली आणि ज्या गतीने कामं पटापट व्हायला लागली त्याच गतीने आपल्या वजनाचा काटा सुद्धा पुढे सरकायला सुरुवात झाली.

काही शिस्तशीर लोक याला अपवाद सुद्धा आहेत. पण, बहुतांश लोकांना मागील काही दिवसांपासून व्यसनमुक्ती प्रमाणेच वजनमुक्ती सुद्धा करावी लागत आहे हे आपण सोशल मीडिया वर ‘माझी आजची exercise reading’ या किंवा तत्सम हॅशटॅग च्या रूपाने बघतोच.

वजन कमी करण्यासाठी काही लोक मॉर्निंग रन सारखे नैसर्गिक उपाय सुद्धा करत असतात. हा उपाय करताना सातत्य असणं सर्वात गरजेचं आहे.

ते ज्यांना शक्य नसतात ते एक तर जिम मध्ये जाऊन घाम गाळतात किंवा आपल्या घरातच ट्रेडमिल सारखे उपकरण घेऊन येतात. ट्रेडमिल वर मनुष्य धावायला लागतो आणि स्वतःचं वजन नियंत्रित ठेवतो.

 

treadmill inmarathi

 

स्वतःला महत्व पटल्यावर कोणतीही व्यक्ती घरातील प्रत्येक व्यक्तीला ट्रेडमिल वापरण्यासाठी उद्युक्त करत असते आणि त्याने स्वतःला दिलेल्या शिक्षेत भागीदार वाढवत असते. शिक्षा?

होय, ट्रेडमिल वर धावणे ही एकेकाळी ब्रिटिश राजवटीत शिक्षा असायची. अमेरिकेने शोध लावलेल्या ट्रेडमिल या गोष्टीचा ब्रिटिश लोकांनी असा सुद्धा वापर केला होता हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

जाणून घेऊयात ही दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट.

१८१७ चा तो काळ होता. विलियम क्यूबिट हे तेव्हा पोलीस होते. ते एक सिव्हिल इंजिनियर होते.

कोणत्याही गुन्ह्यामुळे तुरुंगवास भोगत असणाऱ्या प्रत्येक कैद्याने रोज कमीत कमी ६ तास ट्रेडमिल वर चालावं असा कायदा विलियम क्यूबिट याने आमलात आणला होता.

ही शिक्षा आमलात आणण्यामागे एकच हेतू होता तो म्हणजे कैद्यांना टॉर्चर करणे आणि या मार्गाने त्यांना कायम त्यांनी केलेल्या गुन्ह्याची आठवण करून देणे आणि त्यांनी परत कोणताही गुन्हा करू नये.

 

treadmill old inmarathi

 

ही शिक्षा १८९५ पर्यंत सुरू होती आणि त्यामुळे जगभरात लोकांमध्ये ट्रेडमिल बद्दल एक वेगळीच भीती निर्माण झाली होती.

या ट्रेडमिल वर एका वेळी २४ कैद्यांना उभं केलं जायचं आणि रोज दहा तास त्या ट्रेडव्हील वर चालायला सांगितलं जायचं.

हे धोरण अमेरिकेत सुद्धा आमलात आणण्याचा विचार सुरू होता. पण, १८२७ मध्ये बोस्टन च्या Prison Discipline Society ने हे जाहीर केलं की, “ट्रेडमिल मुळे काहीच फायदा साध्य होत नाहीये.

ट्रेडमिल हे कोणत्याही कैद्याला त्याच्या सुटकेनंतर या ट्रेडमिल चा काहीच फायदा होणार नाही हे नक्की.

 

treadmill prisoners inmarathi

 

या सर्व चर्चेनंतर असं ठरलं की, फर्निचर, शु, कपडे तयार करणं हे काम कैद्यांना देण्यात यावं असा एक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आणि तो निर्णय आज ही जगभरातील कारागृह पाळतात असं म्हणता येईल.

काही दशकांनी ट्रेडमिल हे  हेलथकेअर या क्षेत्राचा अविभाज्य घटक झाले आणि त्याद्वारे लोकांच्या हृदयाची स्थिती तपासली जाऊ लागली.

१९५२ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन चे कार्डीओलॉजिस्ट डॉक्टर रॉबर्ट ब्रूस यांनी सर्वात पहिल्यांदा ट्रेडमिल चा वापर हृदय आणि फुफूसाची कार्यक्षमता व्यायाम करताना चेक करण्यासाठी केला.

पेशंटचा ECG रिपोर्ट आल्यावर त्याने ट्रेडमिल वर चालून दाखवणे ही पद्धत तेव्हापासून सुरू झाली.

 

treadmill inmarathi 2

 

१९७० च्या दशकापर्यंत ट्रेडमिल जीम किंवा आपल्या घरापर्यंत पोहोचले नव्हते. ट्रेडमिल ला घरापर्यंत येण्यासाठी बिल स्टुब या इंजिनियर ने पुढाकार घेतला आणि वैयक्तिक वापर आणि सामान्य माणसाच्या बजेट मध्ये येईल असं ट्रेडमिल तयार केलं.

पुढील दहा वर्षात बिल स्टुब यांनी ट्रेडमिल विकण्याचा दणक्यात बिजनेस केला. २००८ उजाडेपर्यंत फक्त अमेरिकेतील ५ करोड लोकांनी ट्रेडमिलला आवडीने त्यांच्या घरात स्थान दिलं होतं.

आज ट्रेडमिल हे सर्वात जास्त विक्री होणारं व्यायामाचं उपकरण आहे. ‘चला ट्रेडमिल वर चालूया किंवा पळूया’ ही टॅगलाईन लोकांनी खूप छान आत्मसात केली आहे.

ट्रेडमिल वर चालणं हे कधी खूप वेदनादायी तर कधी खूप त्रासदायक आहे. जगभरात किती तरी लोक हे ट्रेडमिल वापरताना जखमी झाले आहेत, काहींनी प्राण सुद्धा गमावले आहेत.

ज्यांना याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ट्रेडमिल बद्दल लिहिलेलं डॉक्टर केनेथ एच. कूपर यांनी लिहिलेल्या The Aerobics या पुस्तकात मिळू शकेल.

PaceMaster 600 हे नाव देण्यात आलेल्या पहिल्या ट्रेडमिल ला जगभरातील कित्येक लोकांना निरोगी राहण्यास मदत केली आहे.

कोणतीही वस्तू वापरण्यासाठी ती वस्तू आपली गरज होईपर्यंत वाट पहायची गरज नाहीये. आपल्या जीवनशैलीत आपल्या निरोगी तब्येतीला महत्व दिल्यास कोणालाही ट्रेडमिल वर ‘डॉक्टरांनी सांगितलं आहे’ म्हणून चालावं लागणार नाही.

 

treadmill featured inmarathi

 

ट्रेडमिल वर चालताना आणि आयुष्य जगताना ‘आपली गती ही आपल्या नियंत्रणात असावी’ हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे असं आवाहन सर्व हेल्थ एक्स्पर्ट कडून सध्या करण्यात येत आहे. चला, त्यांचं ऐकूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?