कमी ऑक्सीजनची धोक्याची सूचना देणाऱ्या या आजाराची “ही” लक्षणं माहित आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि जग हादरुन गेलं. अचानक समोर आलेलं हे संकट, चीनमध्ये सुरु झालं आहे. वुहानमध्ये पडलेल्या ठिणगीचं गांभीर्य कुणालाही नव्हतं.
कुणालाही कल्पना नव्हती की ही वुहानमध्ये पडलेली ठिणगी हळूहळू जग जाळणारा वणवा होईल. वुहानमधून इटलीमधील मिलानला जाणाऱ्या विमानाने सतत प्रवास करणारे चायनिज कामगार या ठिणगीचे वाहक ठरले.
कारण जगातील जितके प्रसिद्ध ब्रँड आहेत जसं प्राडा, गुस्सी, वगैरे.. यांचे कारखाने मिलान येथे आहेत. इटलीच्या तुलनेत चीनमधील मनुष्यबळ जास्त आणि स्वस्तही आहे. बरेच चिनी मजूर इटलीत असतात.
तर कोरोना सुरु झाला चीनमध्ये पण मिलानमध्ये येणाऱ्या चीनी कामगारांनी तो इटलीत आणला आणि हे कोरोनाचं संकट इटलीला व्यापून गेलं. बघता बघता हा रोग इटलीवर एखाद्या काळ्या ढगासारखा पसरला आणि खूप लोक बळी पडले.
एक तर या रोगावर कसलंही औषध उपलब्ध नाही. साध्या तापानं सुरु झालेलं हे प्रकरण पार जीव घेऊनच थांबायचं. संसर्ग कोणापासून होतो हे समजत नव्हतं.
नुसता ताप आला असं म्हणेपर्यंत एकाएकी शरिरातील ऑक्सिजन लेवल कमी होऊन रुग्ण दगावायचा. संपूर्ण इटली म्हणता म्हणता या रोगाने जग पादाक्रांत केलं. सगळीकडं कोविडचे रुग्ण सापडू लागले.
किड्यामुंगीसारखी माणसं मरु लागली. जगभर कोविडच्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला.
लाॅक डाऊन करुन दवाखान्यात कोविड रुग्णाच्या उपचारांची सोय करायला तयारी करता यावी, संसर्ग होऊ नये म्हणून लोकांना घरी थांबण्याचं आधी आवाहन मग सक्ती करण्यात आली.
तरीही रुग्ण सापडू लागले. वृध्द लोकांसाठी तर कोविड १९ जीवघेणाच ठरला.
साधा सर्दी खोकला ताप ही लक्षणं,प्रचंड डोकेदुखी, घसा दुखणं, खवखवणं, नंतर अन्नाची चव जायची, वास यायचा नाही असं होत शरिरातील ऑक्सिजन लेवल कमी होऊन रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो.
मग व्हेंटिलेटरची गरज भासते. ही परिस्थिती फारच गंभीर झाली की रुग्ण दगावतो. पण केवळ कोविड १९ हा एकच रोग असा नाही ज्यात शरिरातील ऑक्सिजन लेवल कमी होते.
आणखीही एका रोगात ही लक्षणं आढळतात. या लक्षणांनी समजतं की शरिरातील ऑक्सिजन लेवल कमी होत आहे. कोणता आहे हा रोग?
वास्तविक मानवी शरीर हे घड्याळासारखं आहे. ज्याची टिकटिक जन्माला आलेल्या क्षणापासून सुरु होते. काळ सरकत जातो, टोले पडत राहतात. नवीन पेशींची निर्मिती होते. काटा पुढं सरकत राहतो. जुन्या पेशी मरतात.
पण, आपल्याला शरिरातील काही कमी जास्त बिघाड लक्षात येत नाहीत. सहसा आपणही नकळत दुर्लक्ष करतो. घड्याळ हळूहळू चालू लागतं.
ही आपल्याला दिलेली सूचना असते. आजारपणाची सुरुवात होते. आपण अनियमित पडलेले टोले गांभीर्याने घेतले नसले की घड्याळ दुरुस्त करायला घड्याळजीकडं दिलं जातं. कधी-कधी स्प्रिंग तुटते. घड्याळ कायमचं थांबतं.
सुरुवातीला किरकोळ वाटणारा आजार उग्र रूप धारण करून बळी घेऊनच शांत होतो. असा कोणता आजार आहे? त्याची लक्षणं पण कोरोनासारखी आहेत? त्याचं नांव आहे हायपोक्सिया.
हायपोक्सिया –
मानवी शरिराला फार कठीण असणारी गोष्ट म्हणजे जुनाट फुप्फुसाच्या रोगासह जगणं. जेंव्हा शरिरातील पेशींना, उतींना आणि शरिरांतर्गत अवयवांना पुरेसा आॅक्सिजन मिळत नाही तेंव्हा हा हायपोक्सिया आजार उद्भवू शकतो.
शरिरातील रक्तामध्ये ऑक्सिजन लेवल कमी होऊन ती शरिरातील इतर अवयवांना कशी घातक ठरु शकते.. खूपदा लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा रक्ताभिसरण नीट होत नसते.
पल्स आॅक्सिमीटर या उपकरणाच्या मदतीने ही क्रिया नीट चालते का समजून घेता येते.
हायपोक्सियाची लक्षणे –
१. घरघर लागणे.
२. सतत कफ असणे.
३. इंद्रियांची संवेदना कमी होणे.
४. श्वास कोंडल्यासारखा होणे.
५. त्वचा निळसर रंगाची होणे.
६. श्वास घ्यायला त्रास होणे.
७. श्वास कोंडून शरिराची तडफड होणे.
फुप्फुसाच्या जुनाट आजारांमध्ये एम्फीसिमा, ब्राँकाॅयटीस, यांमध्ये रक्तातील ऑक्सिजन लेवल अस्ताव्यस्त झालेली असते. त्यामुळे श्वास लागतो. श्वास कोंडल्यासारखा होणे हेच हायपोक्सियाचं मुख्य लक्षण मानलं जातं. तो हळूहळू वाढू शकतो.
जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तर रक्तातील ऑक्सिजन लेवल कमी होते. आपल्या शरिरातील अवयवांना, पेशींना उतींना प्राणवायू आवश्यक असतो.
श्वासोच्छवासावाटे मानवी शरीर ऑक्सिजन घेत असते व कार्बन डायऑक्साइड सोडत असते. हा ऑक्सिजन रक्तातील पेशी, व इतर अवयवांपर्यंत रक्ताभिसरणामार्फत पोहोचवला जातो.
त्यावरच आपलं शरीर कार्यान्वित असतं. शरिरातील ऑक्सिजन लेवल ही ९५% हून अधिक असणं हे उत्तम आरोग्यदायी असण्याचं लक्षण मानलं जातं.
पण ९० पेक्षा कमी असलेली ऑक्सिजन लेवल ही थोडीशी घातक असते. ही हळूहळू कमी होत गेली की रुग्ण गंभीर होतो आणि दगावू शकतो.
ही कमी झालेली ऑक्सिजन लेवल डाॅक्टर बाहेरुन ऑक्सिजन देऊन वाढवू शकतात पण त्यालाही मर्यादा असतात. मग तो ऑक्सिजन लेवल नैसर्गिक रित्या मिळवण्यासाठी काय करावं?
१. पोफळी, मनीप्लँट, स्नेक प्लँट, जरबेरा यांची लागवड करुन घरातल्या घरात नैसर्गिक आॅक्सिजन मिळू शकतो.
२. ताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.
३. व्यायाम करणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळं शरिरातील पेशीना, ऑक्सिजन लेवल व्यवस्थित मिळते. शरीरही निरोगी राहते. योगा करणं, सकारात्मक विचार करणं या सर्व गोष्टी उपयुक्त आहेत.
४. चालण्याचा व्यायाम हा सोपा पर्याय आहे. त्यानं तुमच्या शरिरातील ऑक्सिजन लेवल वाढते व प्रतिकारशक्ती पण वाढते.
५. भरपूर पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरिरातील कोरडेपणा कमी होऊन ऑक्सिजन लेवल वाढायला मदत होते.
६. चौरस आहार घ्यावा. षड्रसयुक्त अन्न हे शरिरासाठी उपयुक्त आहे. ताज्या, उकडलेल्या भाज्या, हिरव्या शेंग वर्गातील भाज्या जसं घेवडा, गवार, बीन्स यांचा मुबलक प्रमाणात वापर करावा.
शिजवलेला बटाटा लीनची पाने यात प्रोटीन असतात. त्याचा फायदा होतो. मिठाचा मर्यादित प्रमाणात वापर करा. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो.
सर्वात महत्वाचे, कोणताही व्यायाम प्रकार, आहार घेण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांशी अवश्य बोला. आपणच आपले डाॅक्टर होऊन आपल्या आरोग्याशी खेळू नका कारण जान है तो जहान है!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.