' हॉस्पिटल सुरक्षारक्षक आहे चक्क एक मांजर, वाचा, मग विश्वास बसेल!

हॉस्पिटल सुरक्षारक्षक आहे चक्क एक मांजर, वाचा, मग विश्वास बसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्यात चिकाटी असावी लागते हे आपण नेहमीच वाचतो. बिजनेस च्या भाषेत सांगायचं तर ‘फॉलोअप’ केला की गोष्टी घडतात, लोकांचं मन परिवर्तन होतं.

आपण बघतो की, इन्श्युरन्स विकणारे सेल्स पर्सन मध्ये अशीच चिकाटी असते. यश मिळवण्यापेक्षा ‘नकार पचवण्यासाठी’ त्यांना आधी तयार केलं जातं.

आजकालच्या सोसायटी च्या दरवाज्यावर सर्रास एक पाटी पहायला मिळते : ‘सेल्समन ला प्रवेश नाही.’

तो सुद्धा एक माणूसच आहे आणि त्याला एक सेल्स टार्गेट दिलेलं असतं म्हणूनच तर तो दारोदारी जात असतो आणि ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.

 

salesman inmarathi

 

तो रोज त्या सोसायटी ला घिरट्या मारत असतो आणि एक दिवशी त्याला त्याची पहिली ऑर्डर ही मिळतेच.

माणसांना ही प्रयत्नांची सायकल त्यांच्या परिस्थतीने आणि मॅनेजमेंट ने शिकवलेली असते. पण, प्राणी सुद्धा हे जाणतात हे वाचून तुम्ही थक्क व्हाल.

मेलबर्न, ऑस्ट्रेलिया इथे घडलेली ही गोष्ट आहे. एलवूड नावाचं एक मांजर इपवर्थ हॉस्पिटल च्या भोवती एक वर्षभर फेऱ्या मारत होतं. जवळपास ठरलेल्या वेळी आणि पूर्ण हॉस्पिटलचं रक्षण करत होतं.

हॉस्पिटल मध्ये काम करणारे काही लोक एलवूड ला रोज बघायचे.

एलवूडचं सतत त्याच भागात घुटमळणं बघून एक दिवशी इपवर्थ हॉस्पिटल ने एक दिवशी एलवूड च्या गळ्यात सुद्धा एक एम्प्लॉयी ID चा टॅग लावायचं ठरवलं आणि त्यांनी तसं केलं.

एलवूड ही जून २०२० पडून इपवर्थ हॉस्पिटल ची सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहे. ती सर्वांचं हसून स्वागत करते आणि लोकांना प्रसन्न करते हे एक बोनस म्हणता येईल.

लाल आणि पांढऱ्या रंगाचं हे मांजर सध्या सर्व कर्मचाऱ्यांचं फेवरेट झालं आहे.

 

elwood security cat inmarathi
blog.epworth.org.au

 

Chantel Trolip या इपवर्थ हॉस्पिटल मध्ये पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, –

“मी जेव्हा एलवूड ला आधी बघितलं तेव्हा तिच्या गळ्यात कोणताही पट्टा नव्हता. मला वाटलं, ते इथे फिरत फिरत आलेलं मांजर असावं. काही दिवसांपूर्वी मला त्याच्या गळ्यात एक बेल्ट लावलेला दिसला. तेव्हा मला ते कोणीतरी पाळलेलं मांजर असावं असं वाटलं.

अचानक जून महिन्यात एलवूड च्या भोवती मला हॉस्पिटल चं ID कार्ड दिसलं आणि माझा मूड एकदम फ्रेश झाला. तो दिवस खरं तर बऱ्याच दुःखद घटनांचा होता. पण, या एका घटनेने माझा मूड पूर्णपणे बदलला.”

ऑगस्ट २०२० मध्ये इपवर्थ हॉस्पिटल ने जाहीर केलेल्या एका पत्रकात असं म्हंटलं आहे की, “एलवूड हा आमचा एम्प्लॉयी आहे. त्याचं काम हे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला greet करणे असं आहे.

इतर वेळी खोड्या करणारा हा बोका आता आम्हा सर्वांना खूप आनंद देत आहे आणि आमच्या सेक्युरिटी टीम ला त्याने सुंदर केलं आहे.

इथे गार्ड म्हणून काम करणं सुरु केल्यापासून एलवूड हा रोज संध्याकाळी रोड च्या पलीकडे जाऊन त्याच्या हक्काची झोप घेत असतो. हे बघणं खूप समाधानकारक आहे.”

प्राण्यांना नोकरी मिळण्याची ही पहिली वेळ नाहीये. ब्राझील मध्ये ह्युंदाई शोरूम ने सुद्धा सेक्युरिटी टीम मध्ये एक कुत्रा ठेवला आहे. या बातमीने मध्यंतरी सोशल मीडिया वर खूप लोकप्रियता मिळवली होती.

नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती ही कामाच्या ठिकाणी एक आनंदी चेहरा शोधत असते. एलवूड सारख्या प्राण्याकडून जर का प्रत्येक व्यक्तीचं स्वागत होत असेल तर त्याला रोज कामावर जाण्याची ओढ लागेल यात शंकाच नाही.

कारण की, सगळे जण फक्त कामाबद्दलच बोलायला लागले तर कामात काहीच मजा येत नाही हे आपण सगळे नक्की मान्य कराल.

कोणत्याही सेक्युरिटी गार्ड प्रमाणेच एलवूड हा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून असतो आणि कोणीही येत जात नसेल तर तो थोडा वेळ पटकन उन्हात थोडा वेळ घालवतो.

त्याचं रुटीन बऱ्यापैकी फिक्स आहे. येणाऱ्यांकडे लक्ष ठेवणे आणि कोवळ्या उन्हात जाऊन आळस देणे जे करताना मांजर खूप cute दिसतात.

 

elwood 2 inmarathi

 

एलवूड चं स्पेशल असण्याचं हे कारण सांगितलं जातं की, त्याला पण थोड्या वेळ कोणी पाठीवरुन हात फिरवला की बरं वाटतं. पण, कोणी जास्त वेळ टाईमपास करत असेल तर तो लगेच चिडतो.

रोजचं काम झाल्यावर जसे प्रत्येक जण आपल्या घरी जातात तसे एलवूड सुद्धा रोज रोड च्या पलीकडे जातो आणि रोज सकाळी तिथून कामावर येतो. एरिन्स्ट रोड वर तो त्याच्या जुळ्या भाऊ जेक सोबत राहत असतो.

एलवूड कधीच हॉस्पिटल च्या मध्ये जायचा प्रयत्न करत नाही ही त्याची सर्वात चांगली गोष्ट आहे. त्याचं अजून कारण म्हणजे, एलवूड ची उंची इतकी कमी आहे की, automatic doors चे सेन्सर त्याला सेन्स करतच नाहीत.

हॉस्पिटल मध्ये असलेली एक किडनी डिश ही एलवूड ला पाण्यासाठी देण्यात आली आहे.

एलवूड च्या येण्याने काय फरक पडला? असं मिस. ट्रोलीप यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की –

“एखादी व्यक्ती काही खोडी करण्याचा विचार जरी करत असेल तरी एलवूड ला बघून ती व्यक्ती विचार बदलेल हे नक्की. एलवूड चं म्याऊ म्हणणं इतकं गोड आहे की त्या आवाजाने आजारी मनुष्याला सुद्धा फ्रेश वाटायला लागेल.”

 

elwood 3 inmarathi

 

मांजरांच्या संवर्धनासाठी ब्राझील इथल्या वकिलांच्या असोसिएशन ने सुद्धा लेओन नावाची एक मांजर नोकरीवर ठेवली आहे. भटक्या मांजरांच्या वाढत्या तक्रारी बघून Order of Attorneys या संस्थेने हा निर्णय घेतला आहे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे.

प्राणी सुद्धा आपल्या जगाचाच भाग आहेत हे एकदा मान्य असलं की सर्वकाही शक्य होतं हे या सर्व उदाहरणांवरून ठळकपणे जाणवतं.

प्रत्येकवेळी फक्त ‘भटके प्राणी म्हणजे त्रास देणारे’ ही तक्रार करत बसण्यापेक्षा त्यांना जर का आपल्यात सामावून घेतल्यास गोष्टी सोप्या होतात हे एलवूड ने सिद्ध केलं आहे.

गरज आहे ती फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची. ते म्हणतात ना, ‘नजर बदलो, नजारे बदल जाएंगे’ तसंच काहीसं या बदला बद्दल सुद्धा म्हणता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?