' या देशात एकही डास नाही, हे कसं शक्य झालं? वाचा! – InMarathi

या देशात एकही डास नाही, हे कसं शक्य झालं? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात काही अशा गोष्टी आहेत किंवा असतात ज्यांच्या बाबतीत काही तर्क लावणेच शक्य होत नाही.. केवळ प्रश्न पडतात आणि ते पडत राहतात.

हे असे का असेल किंवा आहे, त्याची कारणे काय.. कायमस्वरुपी एखादी गोष्ट कशी असू शकते.. असे बरेच प्रश्न..

उदाहरणार्थ, एखाद्या भागातील प्रथा-परंपरा, एखाद्या ठिकाणच्या विचित्र चालीरिती, कमी जास्त तपमानामुळे एखाद्या प्रदेशात सापडणाऱ्या नैसर्गिक गोष्टी, वाळवंटातील ओअँसिस, अतिघनदाट जंगलातील सजिवांना, प्राण्यांना गिळणारी झाडे अशी बरीच उदाहरणे दिसतील.

आता जर तुम्हाला सांगितले की जगात एक अशी जागा आहे… जागा कशाला अख्खा देशच आहे जिथे एकही डास नाही. कसं वाटलं… ऐकून आश्चर्य वाटलं ना…. पण हे खरंय!

उत्तर अटलांटिक महासागरातील आइसलँड या युरोपियन देशात औषधालाही डास सापडत नाही.

 

no mosquito in iceland inmarathi1

 

भारतीयांना तर हे वाचून सर्वाधिक आनंद होईल. आपण सतत डासांनी हैराण असतो. कुठेही जा… डासांची भीती असतेच.

एक तर डासांच्या चावण्यामुळे येणारी प्रचंड खाज आणि विविध रोगराई पसरण्याची भीती. त्यामुळे अगदी घरात असो की बाहेर, प्रवासाला गेलो काय किंवा कोणाच्या घरी गेलो तरी जवळ ओडोमॉसची ट्यूब असतेच.

चला मग आता पाहूया, की आइसलँडमध्ये डास का सापडत नाहीत ते….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अद्यापही डासमुक्त असलेले जगातील एकमेव बेट अशी आईसलँडची ओळख आहे. कसं काय?

शास्त्रीय थिअरी काय सांगते….

 

mosquito-bite-inmarathi-Feature

 

आईसलँड हे काही अंटार्क्टिका सारखे अतिथंड नाही, की जेथे प्राणी, वनस्पती आणि मनुष्य हे फार काळ जगू शकत नाहीत. अगदी कडाक्याच्या थंडीतही इकडे माणसं, जलचर आणि उभयचर सहजपणे तग धरुन राहतात.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे साचलेले पाणी किंवा तळी, डबकी ज्या ठिकाणी डास आपली अंडी घालतात. तसे अनेक तलाव आणि तळी या बेटावर आहेत.

इथून पूर्वेला जवळच असलेल्या स्कँडिनेव्हियन देशांमध्ये डासांच्या विविध प्रजाती सापडतात, मग त्या आईसलँडपर्यंत का पोहोचू शकत नाहीत??

याविषयीचा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण तर्क….

 

no mosquito in iceland inmarathi2

 

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे, की आत्तापर्यंत या ठिकाणच्या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आलेत त्यानुसार, आइसलँडची उष्ण-दमट समुद्री हवा डासांच्या पैदाशीसाठी योग्य नसावी.

दुसरा सिद्धांत म्हणजे हे पूर्णपणे लाव्हारसाच्या उगमातून तयार झालेले बेट आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धाच्या जवळ असूनही बेटावरील नैसर्गिक गरमपणा आणि समुद्रातील थंड-उष्ण प्रवाह यामुळे वातावरणावर झालेला परिणाम डासांची अंडी जगवण्यास मदत करत नाही.

तिसरा सिद्धांत असा, की लाव्हामुळे येथील माती आणि पाण्याची रासायनिक रचना ही डासांच्या अंड्यासाठी पोषणासाठी योग्य नाही.

वरील सिद्धांत मांडताना आईसलँड विद्यापीठातील बायोलॉजिस्ट प्राध्यापक म्हणतात, “अजून तरी डासांच्या कुठल्याच प्रजातीला याठिकाणी तग धरता आलेला नाही.”

नजीकच्या भविष्यात ही परिस्थिती बदलू शकते का?

 

global warming inmarathi

 

दुसरीकडे याच विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात ही स्थिती बदलू शकते. ग्लोबल वार्मिंगमुळे मागील २० वर्षात येतील हवेचे सरासरी तापमान २ डिग्री फॅरनहाइटने वाढले आहे.

याच काळात विविध २०० प्रकारच्या किटकांच्या नव्या प्रजाती आईसलँडवर विकसित झालेल्या दिसतात.

जर ग्लोबल वॉर्मिंग असेच झपाट्याने सुरू राहिले, तर नजीकच्या भविष्यात आईसलँडमध्ये डास सापडतील असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

एक मजेशीर बाब

आईसलँडमध्ये येथील निसर्गाचा आणि त्यातील बदलांचा अभ्यास करणारी संस्था नेचर हिस्टरीच्या प्रयोगशाळेत एकमेव डास आढळतो. तो अल्कोहोलमध्ये जतन करुन ठेवलाय. याबद्दलचा मजेशीर किस्सा असा….

 

no mosquito in iceland inmarathi

 

प्राध्यापक गिसलासन हे १९८० साली ग्रीनलँडहून आईसलँडला परतत असताना विमानात त्यांना एक डास दिसला. त्यांनी तो पकडला आणि पूर्ण विमानप्रवासात जपून ठेवला.

आईसलँडला उतरल्यानंतर त्यांनी तो नेचर हिस्टरी संस्थेच्या प्रयोगशाळेत जमा केला.

एक नवा किटक किंवा अनमोल प्रजाती म्हणून आजही तो डास अल्कोहोलमध्ये जपून ठेवला आहे. सध्या तरी हा एकच डास आईसलँडवर उपलब्ध आहे.

तेव्हा जर तुम्हाला डासमुक्त प्रदेशाची सफर करायची असेल, तर आईसलँडची टूर तुम्ही नक्की नियोजीत करू शकता…पण शक्य तितक्या लवकर जा…. कारण अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जर खरोखरच भविष्यात तिकडेही डास जगू लागले तर मग काही खरं नाही!!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?