'निसर्गाची रहस्यमयी किमया: बेलीज देशातील अद्भुत ब्लू होल!

निसर्गाची रहस्यमयी किमया: बेलीज देशातील अद्भुत ब्लू होल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ब्लू होलबद्दल जनसामान्यांना किती कल्पना आहे याबद्दल खात्री नाही, पण ज्यांना विज्ञान वगैरे गोष्टींची आवड आहे त्यांना या ब्लू होलबद्दल नक्कीच माहिती असणार!

ब्लू होल एक कुंडच्या आकाराचे असते जे खोल समुद्रात निळ्या पाण्यात अगदी मधोमध तयार होते. अश्याप्रकारचा एक ब्लू होल मध्य अमेरिकेतील बेलीज नामक देशाच्या समुद्रात पाहायला मिळतो. या ब्लू होलला UNESCO ने World Heritage Site चा दर्जा देखील दिला आहे.

The-Great-Blue-Hole-marathipizza00

स्रोत

या ब्लू होलचा जेव्हापासून मनुष्याला शोध लागला तेव्हापासून त्यांचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे ब्लू होल काही लहान नसतात ते तब्बल 400 फुट किंवा त्यापेक्षा जास्त खोल असू शकतात. याच कारणामुळे जगभरातील साहसी स्विमरचे स्वप्न असते की एकदातरी या ब्लू होल मध्ये उडी मारून त्याच्या तळाशी जाण्याचा अनुभव घ्यावा.

The-Great-Blue-Hole-marathipizza01

स्रोत

निसर्गाचे अद्भुत देणे म्हणून या ब्लू होलकडे पाहिले जाते. त्यांची सुंदरता इतकी जबरदस्त असते की त्यांना केवळ पाहताच राहावे असे वाटते. Explorer Jacques Cousteau याने १९७१ सालीजगतोल सर्वोतम Diving Place म्हणून बेरीज देशाच्या या ब्लू होलचा गौरव केला होता.

The-Great-Blue-Hole-marathipizza02

स्रोत

असं म्हणतात की आपण जेवढे या ब्लू होलच्या आता जाऊन तेवढे अधिक सुंदर दृश्य आपल्या नजरेस पडते. सोबतच अधिक खोल जात राहिल्यास पाणी देखील स्फटिकासारखे स्वच्छ असते. जेथे तुम्ही उघड्या डोळ्यांनी समुद्री सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता. पण अधिक खोल जाणे देखील धोकादायक ठरू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

The-Great-Blue-Hole-marathipizza03

स्रोत

बेलीज देशाच्या या ब्लू होलची निर्मिती कशी झाली? त्यामागे काय रहस्य आहे? याबद्दल आजवर अनेक संशोधन झाले. या खालील व्हिडीयोत याच ब्लू होल संदर्भातील काही अविश्वसनीय दावे करण्यात आले आहेत. जे तुमची उत्सुकता अजून ताणू शकतात.

The-Great-Blue-Hole-marathipizza04

स्रोत

बेलीज देशातील रहस्यमयी आणि अद्भुत ब्लू होल

कधी योग जुळला आणि बेलीजच्या आसपास भटकायला मिळाले तर या ब्लू होलला भेट द्यायला अजिबात विसरू नका!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?